Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

 Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!
मिक्स मसाला

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

by रसिका शिंदे-पॉल 22/05/2025

७८व्या कान्स फिल्म फेस्टिवलला (78th cannes film festival) जगभरातील कलाकारांनी हजेरी लावली आहे. यात भारतीय कलाकारांनी आपली संस्कृती जपत रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली होती. हिंदीसह मराठीतील दोन अभिनेत्रींनी कान्समध्ये उपस्थिती दाखवत मराठी चित्रपटसृष्टीचं प्रतिनिधित्व केलं. इतकंच नव्हे तर मराठीतील ४ चित्रपटांचं स्क्रिनिंगही कान्समध्ये संपन्न झालं. अशात हिंदीतील एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर उपस्थित प्रेक्षकांनी चक्क ९ मिनीटांचं स्टॅंडिंग ओवेशन दिलं. कोणता आहे हा चित्रपट जाणून घ्या…(Bollywood global news)

दिग्दर्शक नीरज घेयवान यांचा हिंदीतील चित्रपट ‘होमबाउंड’ (Homebound) यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात २१ मे रोजी प्रदर्शित करण्यात झाला. या चित्रपटात जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत असून करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रॉडक्शन्सने चित्रपटाची निर्मिती केली आहे. कान्समधील होमबाउंड’ चित्रपटाचा प्रीमियर एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. (Entertainment news)

==================

हे देखील वाचा : Ajay Devgan : ‘अजय ते विजय साळगांवकर’;बॉलिवूडमध्ये 9 मराठी पात्र साकारणारा देवगण!

==================

आनंद आणि अभिमानाची बाब म्हणजे कान्समध्ये होमबाउंड’ या भारतीय चित्रपटाने टॉम क्रुझच्या (Tom Cruise) चित्रपटालाही मागे टाकलं आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तब्बल ९ मिनिटे प्रेक्षक उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात चित्रपटाचं कौतुक करत होते. त्यामुळे ‘होमबाउंड’ला जागतिक स्तरावरील प्रेक्षकांची मिळालेली प्रतिक्रिया फार महत्वाची ठरली आहे.(Bollywood movies)

धर्मा प्रॉडक्शन्सने (Dharma Production) कान्समधील प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात संपूर्ण थिएटर टाळ्यांनी दुमदुमलेले दिसत असून प्रेक्षकांच्या प्रेमामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घेयवान आणि अभिनेता ईशान खट्टर अत्यंत भावूक झाले होते. ‘होमबाउंड’ला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय प्रतिसादामुळे प्रेक्षक आता हा चित्रपट भारतीय थिएटरमध्ये पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे.(Cannes film festival)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aishwerya rai bachchan Bollywood Chitchat bollywood movies bollywood update cannes 2025 cannes film festival chhaya kadam homebound ishan khattar karan johar neha pendse
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.