Abhijeet Sawant : जुन्या गाण्याला नवा साज;अभिजीत चाहत्यांना देणार सरप्राईज

Housefull 5 : कॉमेडी आणि सस्पेन्सचा तडका; १८ कलाकार देणार मनोरंजनाची मेजवानी!
बॉलिवूडमध्ये मल्टी स्टार चित्रपट गेल्या काही काळात फारच येत आहेत. आणि त्यातही चित्रपटांच्या सीक्वेल्सचा अधिक सहभाग आहे. बॉलिवूडमधील विनोदी चित्रपटांच्या फ्रँचायझीमधील ‘हाऊसफुल’चा पाचवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ४-५ नव्हे तर तब्बल १८ कलाकार दिसणार आहेत. नुकताच बहुचर्चित णि बहुप्रितिक्षत ‘हाऊसफुल्ल ५’ चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. (Housefull 5 movie teaser)

‘हाऊसफुल्ल- ५’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित करण्यात आला असून या चित्रपटात धमाल कॉमेडीसह खुनाचा थरारही पाहता येणार आहे. टीझरच्या सुरुवात समुद्रात असलेल्या एका मोठ्या जहाजापासून होते आणि त्या जहाजावर नाच- गाणं सुरु असतं. सर्व कलाकार आपापल्या भूमिकेत दाखवले असून शेवटी एक कलाकार मुखवटा घालून दिसतो. आता हा कलाकार नेमका कोण आहे हे पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Bollywood news)

‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपटात १९ कलाकारांची फौज असून एका कलाकाराचा चेहरा मुखवट्याआड आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन Abhishek Bachchan), संजय दत्त, फरदीन खान, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, डिनो मोरिया, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, निकितिन धीर, रणजीत, आकाशदीप साबीर, जॅकलीन फर्नांडीज, नर्गिस फाकरी, चित्रांगदा सिंह आणि एस. शर्मा असे एकाहून एक सुपरस्टार आहेत. आता खुन कुणाचा झाला आहे आणि तो कोणी केला आहे याचा उलगडा ६ जून २०२५ रोजी होणार आहे. (Housefull 5 movie cast)