Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार Pooja Sawant

Dharmendra ने ‘त्या’ रात्री तब्बल शंभर पत्रे लिहून पोस्ट केली!

‘देवबाभळी’नंतर Paresh Rawal  यांना केल आणखी एका मराठी नाटकाच कौतुक;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

 अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?
बात पुरानी बडी सुहानी

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

by धनंजय कुलकर्णी 05/03/2026

ते १९७१ साल होते. हास्य अभिनेता मेहमूद “बॉम्बे टू गोवा” हा चित्रपट बनवत होते. त्यांनी या सिनेमा साठी अरुणा इराणीची नायिका म्हणून निवड केली. त्या काळात महमूद आणि अरुणा इराणीचे प्रेम प्रकरण चालू होते. अरूणा च्या प्रेमात महमूड पुरता पागल झाला होता त्यामुळे ती सिनेमाची नायिका बनली होती. पण इंडस्ट्रीचे वास्तव कठोर असते . अरुणा इराणी तोपर्यंत बहुतेक चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची (सेकंड लीड ) भूमिका साकारत होत्या आणि हा टॅग तिच्यासाठी शाप बनला होता. कोणत्याही मोठ्या प्रचलित बॅनर च्या सिनेमात तिला नायिका म्हणून घ्यायला कुणी तयार नव्हते! आता तिला हिरोईन म्हणून घेतले पण हीरो कोण?

अरुणा इराणी सोबत हीरो बनायला कुणी तयार नव्हतं. मेहमूद ची जितेंद्रशी खास  मैत्री होती. मोठ्या अपेक्षेने  त्याने जितेंद्रशी या भूमिकेसाठी संपर्क साधला, पण या भूमिकेसाठी जितेंद्र चा  स्पष्ट नकार होता. हा नकार पूर्णपणे योग्य होता. अरुणा इराणीने काही दिवसांपूर्वीच  “कारवां” मध्ये जितेंद्र यांच्यासोबत सेकंड लीड ची भूमिका साकारली होती. जितेंद्र ला आता पुन्हा तिच्यासोबत काम करायचे नव्हते. शिवाय, ‘फर्ज’ च्या जबरदस्त यशामुळे जितेंद्र स्टार बनले होते. अशा परिस्थितीत, कोणताही अभिनेता त्यांच्या करीयर मध्ये धोका पत्करू इच्छित नव्हता.अरुणा इराणीला पहिल्यांदाच मोठ्या बॅनर च्या सिनेमात प्रमुख नायिकेची भूमिका मिळाली होती पण आता तिच्या सोबत काम करायला कुणी राजी नव्हते! महमूद करिता आता समस्या नायक शोधण्याची होती.

दरम्यान, एक अभिनेता होता जो मुंबई सोडण्याच्या तयारीत होता.अमिताभ बच्चन. एकामागून एक अपयश, खचत चाललेला  आत्मविश्वास आणि रिकामे खिसे. सलग आठ दहा फ्लॉप नंतर कोणतीही नायिका त्याच्या सोबत काम करायला तयार नव्हती. अनेक निर्माते त्याला सिनेमातून काढून टाकत होते. काळ अमिताभ करिता खूप कठीण चालला होता. अमिताभ  तेंव्हा मेहमूदचा भाऊ अन्वर अली ( के ए अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ ते दोघे एकत्र होते) सोबत राहत होता आणि घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. त्याने सामान बांधायला सुरुवातही केली होती. तेव्हाच नशिबाने वळण घेतले. अन्वर अली मेहमूदला म्हणाला, “अमिताभ ला एक संधी द्या.”

मेहमूदकडे फारसे पर्याय नव्हते. अरूणा इराणी ला नायक मिळत नव्हता.  आता कुणी हिरोईन अमिताभ सारख्या फ्लॉप हीरो सोबत काम करायला तयार नव्हती. प्रॉब्लेम दोन्ही कडे सारखे होते.  मेहमूद ने  अमिताभ बच्चन ला “बॉम्बे टू गोवा” चा नायक बनवले.  कदाचित अरुणा इराणीला त्या क्षणी वाईट वाटले. कारण तिची पहिली मुख्य भूमिका, आणि एका अशा नायकाच्या विरुद्ध ज्याच्या नावावर अनेक अयशस्वी सिनेमे होते. पण तोच चित्रपट नंतर तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. चित्रपट हिट झाला.आणि अमिताभ च्या यशाची खरी कहाणी येथून सुरू झाली. प्रकाश मेहरा चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अमिताभ बच्चनच्या फायटिंग  दृश्याने भारावून गेले. त्यावेळी ते त्यांच्या “जंजीर” चित्रपटासाठी योग्य चेहरा शोधत होते. अमिताभच्या नजरेत त्यांना अँग्री यंग मॅन दिसला. सलीम जावेद /प्राण यांनी हा सिनेमा बघितला होता व त्यानीच प्रकाश मेहरा ला हा सिनेमा बघण्याचा हट्ट केला.   

इथूनच अमिताभ चा प्रवास जंजीर पर्यन्त पोचला आणि या सिनेमा पासून तो सुपर स्टार बनला. अरुणा इराणी मेहमूद सोबतच्या रिलेशन बाबत बोलताना म्हणाली होती ,” आम्ही एकत्र खूप चित्रपट केले. आम्ही खूप चांगले मित्र होतो. त्या वेळी मुमताज नायिका बनली होती आणि शुभा खोटेचे लग्न झाले होते. निर्मात्यांनी मेहमूद सोबत काम करण्यासाठी अनेक मुलींची पारखणी केली. त्यात  माझी निवड केली. सहसा, कॉमेडीमध्ये ट्यूनिंग जुळायला वेळ लागतो. कॉमेडी करणे कठीण आहे, पण मी त्यांच्याकडून खूप काही शिकले. मेहमूद माझे गुरू होते, त्यांनी मला टाइमिंग शिकवले.”

================================

हे देखील वाचा : Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून टीका केली होती?

================================

अरुणाने कबूल केले की, नंतर जेव्हा मेहमूदने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटासाठी तिला कास्ट केले, “माझे दोन चित्रपट — कारवाँ आणि बॉम्बे टू गोवा — दोन्ही थिएटरमध्ये चालले होते आणि दोन्ही ज्युबिली हिट झाले होते आणि त्याबद्दल मला खूप चांगली दाद  मिळाली… पण (त्यानंतर) मला काम मिळाले नाही. आणि याचे कारण असे होते की मी मेहमूदशी लग्न केले आहे अशा अफवा होत्या. पण तसे काही नव्हते. आम्हीही दोघे मूर्ख होतो की आम्ही ते स्पष्ट केले नाही. आम्ही मीडियाला बोलावून ते स्पष्ट करायला हवे होते. आम्ही मित्र होतो, पण त्यापलीकडे काहीही नाही आणि त्या अफवेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत माझा मार्ग बदलला.”

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bachchan aruna irani Bollywood Celebrity Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.