दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
आशुतोष राणा यांना त्यांची आयडेंटिटी निर्माण करून देणारा ‘दुश्मन’ चित्रपट कसा मिळाला?
प्रत्येक कलावंताच्या आयुष्यात अशी एक जबरदस्त भूमिका असते जी त्याला आयुष्यभर त्याची ओळख म्हणून सांगितली जाते. अभिनेता आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी १९९८ साली ‘दुश्मन’ या चित्रपटात जबरदस्त खलनायक रंगवला होता. गोकुळ पंडित नावाचा. ही भूमिका आशुतोष राणाची सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक ठरावी इतकी जबरदस्त होती. हा रोल, ही भूमिका आशुतोषला कशी मिळाली? याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे.
स्वतः आशुतोष राणा यांनीच एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. आशुतोष राणा यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथून नाट्य शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर ते महानगरीत आले. इथे महेश भट यांनी ‘स्वाभिमान’ या दूरदर्शन मालिकेत त्यांना त्यागी ची भूमिका दिली. ही भूमिका खूप गाजली. महेश भट यांना देखील आशुतोषचा अभिनय खूप आवडत असे. याच काळात भट कॅम्पसच्या ‘दुश्मन’ या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन तनुजा चंद्रा करणार होती. यात टेरर खलनायकाची भूमिका आपल्याला मिळावी म्हणून आशुतोष राणा प्रयत्नशील होता.
तो महेश भट यांना भेटला देखील. पण महेश भट म्हणाले,” ही भूमिका तुला सूट होणार नाही. कारण तू हसताना एकदम लहान मुलासारखा दिसतोस. तुझं इनोसंट स्माईल या भूमिकेसाठी योग्य ठरणार नाही!” नंतर ही भूमिका मुकुल देव या त्या काळातील आघाडीच्या मॉडेलला देण्यात आली आणि त्याचे डबिंग मात्र आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांना देण्यात आले. खरंतर जी भूमिका करायची इच्छा होती त्या भूमिकेचे डबिंग करण्याची वेळ आशुतोष वर आली होती. पण त्यांनी ते काम आनंदाने स्वीकारले.
सिनेमाची तीन रील्स तयार झाले . याच काळात भट कॅम्पसचा ‘गुलाम’ हा चित्रपट देखील फ्लोअरवर होता. या चित्रपटातील एका सीनसाठी आशुतोष (Ashutosh Rana)ला विचारण्यात आले होते. आधी डबिंग मग एक सीन. पण आशुतोषने काही वाईट वाटून घेतले नाही. हा सीन आशुतोषने जबरदस्त केला. एकदा अजंठा थेटरमध्ये या सिनेमाची ट्रायल झाली. ही ट्रायल पाहायला दस्तूर खुद्द महेश भट, पूजा भट आणि तनुजा चंद्रा उपस्थित होत्या. त्यांना ‘गुलाम’ या चित्रपटातील आशुतोषची सिंगल सिंन असलेली भूमिका इतकी आवडली की त्यांनी त्या रात्रीचा निर्णय घेतला की ‘दुश्मन’ या चित्रपटातील प्रमुख खलनायक गोकुळ पंडितची भूमिका आशुतोष राणा यांना द्यायची!
त्या पद्धतीने त्यांनी मुकुल देव यांच्या जागी आशुतोष राणा यांची निवड केली. महेश भट यांनी आशुतोषला फोन करून आपल्या ऑफिसला बोलावले आणि म्हणाले, ”यापुढे तुला माझ्या बाबत कुठलीही तक्रार असणार नाही कारण आम्ही तुला ‘दुश्मन’ या चित्रपटातील प्रमुख खलनायकाची भूमिका ऑफर करत आहोत!” आशुतोष राणा कम्प्लीट मॅड झाला कारण ही भूमिका त्याच्या साठी ड्रीम रोल होता आणि तोच त्याला ऑफर झाला होता. तो इतका आनंदित झाला त्याने भट साहेबांनी विचारले,” तुम्ही खरंच सांगताय ना? मी आनंदाने जोरात ओरडू का? कारण मला इतका आनंद झाला आहे की तो ओरडल्याशिवाय व्यक्त होणार नाही!” भट साहेबांनी त्याला आनंदाने परवानगी दिली! नंतर तो म्हणाला, ”मी माझ्या घरच्यांना कळवू का? नक्की मलाच दिली आहे ना भूमिका?“
महेश भट म्हणाले, ”बिलकुल बिनधास्त फोन कर… साऱ्या जगाला ओरडून सांग मी महेश भट यांच्या सिनेमात काम करतो आहे!” तरी आशुतोष राणा याला शंका होतीस तो म्हणाला, ”सर, तुम्ही जर मला आधी रिजेक्ट केलं होतं माझं इनोसंट स्माईल आहे म्हणून त्याचं काय? “ त्यावर महेश भट म्हणाले, ”अरे तेच तर आता पाहिजे ना!” अशा पद्धतीने ‘दुश्मन’ या चित्रपटात आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांची एन्ट्री झाली. यात त्यांनी रंगवलेला सायको व्हिलन जबरा होता ही भूमिका करतानाच आशुतोष ने महेश भट यांना सांगितले, ”या भूमिकेसाठी मी शंभर टक्के अवॉर्ड जिंकून आणणार!” आणि झाले तसेच. ‘दुश्मन’ या चित्रपटाला फक्त एक फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले ते सर्वोत्कृष्ट खलनायकाचं आणि विजेते होते अशितोष राणा.
==========
हे देखील वाचा : राजेश खन्ना आणि अमिताभ या दोन सुपरस्टार्सला अक्षरशः डांबून शूटिंग पूर्ण केले!
==========
दुश्मन ही एक सायकॉलॉजिकल थ्रिलर मूव्ही होती. १९९६ साली आलेल्या हॉलिवूडच्या ‘आय फोर एन आय’ या चित्रपटाचा तो रिमेक होता. या चित्रपटात संजय दत्त. काजोल आणि आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. संपूर्ण चित्रपटांमध्ये आशुतोष राणाचा टेरर गोकुळ पंडित जबरा होता. या चित्रपटाला संगीत उत्तम सिंग यांनी दिले होते. ‘चिट्ठी ना कोई संदेश’ हे जगजीत सिंह यांचं गाजलेलं गीत या चित्रपटात होते. त्याचप्रमाणे ‘आवाज दो हमको’ हे उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी गायलेले युगल गीत त्या काळात खूप लोकप्रिय झालं होतं.