राजकुमार ने सलग तीन सिनेमे मेहुल कुमार सोबत कसे केले?
आपल्या अभिनयासोबतच बुलंद डायलॉगने प्रेक्षकांची प्रचंड वाहवा मिळवणारा कलाकार म्हणजे अभिनेता राजकुमार (Raaj Kumar)! त्यांचे अनेक डायलॉग आज देखील रसिक विसरलेले नाही. ‘हम तुम्हे मारेंगे. जरूर मारेंगे. लेकिन वो पिस्तोल हमारी होगी. जमीन हमारी होगी और वक्त हमारा होगा’ , ‘चिनॉय शेठ शीशे के घर मे रहने वाले दुसरो के घरे पर पत्थर नही फेका करते’ , ‘हम वही है तुम वही हो बदलता है रंग आसमा कैसे कैसे’, ‘आपके पाव देखे. बहुत हसीन है. इन्हे जमीन पार मत उतारियेगा मैले हो जाएंगे’ या डायलॉग सोबतच राजकुमार(Raaj Kumar) त्याच्या मुडी स्वभाव आणि फटकळ पणासाठी खूप (कु)प्रसिद्ध होते. परंतु असे असतानाही दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी ऐंशी च्या दशकामध्ये राजकुमार यांच्यासोबत सलग तीन सिनेमे केले. ‘मरते दम तक’, ‘जंगबाज’ आणि ‘तिरंगा’. मध्यंतरी दिग्दर्शक मेहल कुमार यांनी राजकुमार आणि त्यांच्या असोसिएशन बद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या.
राजकुमार(Raaj Kumar) सोबत त्यांचा पहिला चित्रपट होता १९८७ साली आलेला ‘मरते दम तक’. या चित्रपटातील भूमिका राजकुमार ने करावी अशी त्यांची खूप इच्छा होती. म्हणून त्यांनी राजकुमार यांना फोन केला. राजकुमार यांनी “कौन मेहल कुमार? जानी, हम किसी मेहुल वेहूल को नही जानते” म्हणून फोन ठेवून दिला. पण मेहुल कुमार यांनी हार मानली नाही. ते राजकुमार यांना भेटले. आणि स्क्रिप्ट त्यांच्या हातात दिली. उर्दू मधील स्क्रिप्ट बघून राजकुमार(Raaj Kumar) यांना कौतुक वाटले. त्यांनी पहिली दोन-तीन पाने वाचली आणि थेट शेवटचा क्लायमॅक्स वाचला आणि ते म्हणाले,” मला खूप आनंद वाटला . क्लायमॅक्स देखील तुम्ही डिटेल मध्ये लिहिला आहे. नाहीतर आजकाल सेटवर बसूनच सर्व गोष्टी केल्या जातात.” अशा पद्धतीने त्यांनी हा चित्रपट साइन केला.
या सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मढ आयलँड वर राजकुमार(Raaj Kumar) चक्क टॅक्सी मधून आले होते! हि बातमी सर्व सेटवर बातमी कळल्यावर सगळ्यांना खूप आश्चर्य वाटले. गमंत म्हणजे हा टॅक्सीवाला राजकुमार कडून एक पैसा घ्यायला तयार नव्हता. बांद्रा ते मढ शंभर रुपये बिल झालं होतं. पण राजकुमार त्याला पाचशे रुपयांचे नोट देत होते. त्यावर तो टॅक्सीवाला म्हणाला ,”हा दिवस माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा दिवस आहे की तुम्ही माझ्या टॅक्सीत बसला होता त्यामुळे मला तुमच्याकडून एक पैसाही नको.” पण राजकुमार(Raaj Kumar) यांनी बळेबळे त्याच्या खिशात पैसे दिले.
त्यानंतर मेहुल कुमार यांना राजकुमार(Raaj Kumar) म्हणाला ,” आज सिनेमाच्या शूटिंगचा पहिला दिवस आहे माझी गाडी खराब होती आणि पहिल्याच दिवशी उशीर व्हायला नको म्हणून मी टॅक्सीने इथे आलो!” या सिनेमा पासून या दोघांचे चांगले असोसिएशन झाले. ‘तिरंगा’ चित्रपटांमध्ये जेव्हा राजकुमार(Raaj Kumar) च्या सोबत दुसरा कलाकार कुणाला घ्यायचे असा प्रश्न मेहुल कुमार यांना पडला . तेव्हा मेहुल कुमार यांनी सरळ मद्रासला जाऊन रजनीकांत यांना विचारले. रजनीकांत यांना स्क्रिप्ट तर आवडले परंतु ते म्हणाले,”राजकुमार(Raaj Kumar) सोबत मी काम करू शकत नाही.” असेच उत्तर नसरुद्दीन शहा यांनी देखील दिले नंतर ही भूमिका नाना पाटेकर यांना ऑफर करण्यात आले.
हे देखील वाचा : बॉलीवूडमध्ये हॉरर मूव्हीजची सुरुवात करणारा ‘महल’
नाना पाटेकर यांनी सुरुवातीला ही भूमिका नाकारली कारण ते म्हणाले मी कमर्शिअल सिनेमा करत नाही फक्त आर्ट सिनेमा करतो. त्यावर मेहुल कुमार म्हणाले ,”आर्ट सिनेमातून समाधान मिळते. पण पैसा मिळत नाही. हा चित्रपट तुम्ही करा . तळागाळापर्यंतचे पब्लिक तुमचे फॅन होईल.” नाना पाटेकर ची सिनेमात एन्ट्री झाल्यानंतर राजकुमार(Raaj Kumar) म्हणाला “त्याला कशाला साइन केले? तो सेटवर खूप वादविवाद घालतो. प्रसंगी मारामारी देखील करतो असे मी ऐकले आहे.” त्यावर मेहुल कुमार म्हणाले,” काही काळजी करू नका मी आहे ना.” ‘तिरंगा’ सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान सुरुवातीला राजकुमार(Raaj Kumar) आणि नाना पाटेकर यांच्यात फारसा सुसंवाद होत नसेल परंतु नंतर ‘पीले पीले ओ मेरे जानी…’ हे गाणं शूट झाल्यानंतर मात्र दोघांनी आपापला अहंकार बाजूला ठेवून दोघे जानी दोस्त बनले!