
मिर्झा एक्सप्रेसचे जनक कवी, हास्यसम्राट Dr. Mirza Rafi Ahamd Baig यांचे निधन
“मुसलमान असूनही येते मला मराठी, ठोकू नका माई पाठ याच्यासाठी
जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा, पऱ्हाटीकून बोंडाचीच करानं आशा”….
आपल्या कवितेतून महाराष्ट्रभरात वऱ्हाडी भाषेचा गोडवा पोहोचवणारे ज्येष्ठ हास्यसम्राट आणि कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग सामान्य माणसांच्या समस्या कवितेतून मांडण्यासाठी प्रसिद्ध होते. वृत्तपत्रात स्तंभलेखन करत शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या यावर खास विनोदी शैलीमध्ये लिखाण करण्याची त्यांची खासियत होती. ‘जांगडबुत्ता’ शब्दाचे जनक असणाऱ्या बेग यांनी ‘मोठा माणूस’, ‘सातवा महिना’, ‘उठ आता गणपत’ अशा अनेक कवितांचं लिखाण केलं आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
डॉ.मिर्झा रफी अहमद बेग यांनी विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.. आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांचे एकूण २० काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपल्या ‘मिर्झा एक्सप्रेस ‘ या काव्य मैफिलीचे ६ हजारांवर सादरीकरण केले आहे. ‘मिर्झाजी कहीन ‘ हा त्यांचा स्तंभ तुफान लोकप्रिय ठरला होता.
================================
================================
मिर्झा यांचे २० काव्यसंग्रह असून ‘मिर्झा एक्सप्रेस’ या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता. शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या, आणि सामाजिक समस्यांवर व राजकीय विरोधाभासावर नर्म विनोदी शैलीमध्ये लिखाण करणे ही त्यांची खास हातोटी होती. मिर्झा यांच्या निधनाने वऱ्हाडी भाषेचा स्तंभ ढासळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi