Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआर का चिडला?
सगळीकडे सध्या ह्रतिक रोशन आणि ज्यु. एनटीआर यांच्या ‘वॉर २’ (War 2 Movie) चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे… चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी अप्रतिम प्रतिसाद दिला असून यातील २ गाणी देखील ट्रेण्डींगवर आहेत… विशेष म्हणजे यातील जनाबे अली या गाण्यातील ह्रतिक रोशन (Hrithin Roshan) आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या डान्सची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली आहे… अशातच चित्रपटाचा ग्रँड प्रीमिअर हैद्राबादमध्ये पार पडला. यावेळी एनटीआर जरा चिडलेला दिसला आणि इतकंच नाही तर त्याने उपस्थित चाहत्यांना ताकिदही दिली… नेमकं झालं काय होतं जाणून घेऊयात…

ज्युनिअर एनटीआरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यात एनटीआर रागात दिसत आहे. जेव्हा अभिनेत्याने बोलण्यासाठी माइक हातात घेतला, त्यावेळी प्रेक्षकांचा गोंधळ सुरू होता. त्यावेळी गर्दीतील एका चाहत्याकडे बोट करून ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) म्हणाला, “मी इथून जाऊ का? मी आता काय म्हणालो? माइक खाली ठेऊन स्टेज सोडून जाण्यासाठी मला एक मिनिटही लागणार नाही. मी बोलू का? कृपया शांतता राखा”, असे म्हणत त्याने चाहत्यांना शांत राहण्यास सांगितले.(War 2 movie News)

यानंतर पुढे एनटीआरने हृतिक रोशनचे कौतुक करत म्हटलं की, “तुझ्याबरोबर ७५ दिवस काम करताना मी खूप काही शिकलो. तुझ्याबरोबर पुन्हा काम कऱण्यास मी उत्सुक आहे. मला तुझा भाऊ समजण्यासाठी, तशी वागणूक देण्यासाठी आणि खुल्या मनाने मला स्वीकारण्यासाठी, माझे स्वागत करण्यासाठी थँक्यू. मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला आहे. राजमौली सरांनी त्यांच्या चित्रपटांतून दक्षिण आणि उत्तरेतील सीमारेषा पुसल्या आहेत. पण, तरीही दाक्षिणात्य कलाकारांना एक शंका असते की त्यांना नॉर्थमध्ये स्वीकारले जाईल की नाही… पण, मला इतक्या छान पद्धतीने स्वीकारल्याबद्दल आणि पहिल्या दिवशी मिठी मारून स्वागत केल्याबद्दल मी आभारी आहे”.(Bollywood News)
================================
हे देखील वाचा : War 2 : ‘मैं इन्सान नही, जंग का हथियार हू’; ‘वॉर २’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
=================================
‘वॉर २’ हा ज्युनियर एनटीआरचा बॉलीवूडमधील डेब्यू चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले असून आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी (Kiara Advani) देखील मुख्य भूमिकेत आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.