Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मे महिन्यात ‘हे’ मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

 मे महिन्यात ‘हे’ मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
कलाकृती विशेष

मे महिन्यात ‘हे’ मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

by Team KalakrutiMedia 06/05/2023

मे महिना जसा जसा पुढे सरकू लागतो तसतसा उन्हाळा आपला तडाका दाखवायला सुरुवात करतो. मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या असतात. मुलांकडे वेळ असतो. परंतु त्यांना बाहेर नेऊन फिरवून आणण्याची, काहीतरी नवीन अनुभव घेत मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मात्र उन्हामुळे मिळत नाही. अशा मिळालेल्या मोकळ्या वेळात आपल्या कुटुंबासोबत कसा वेळ घालवायचा हा प्रश्न पडतो. तुमचा हाच प्रश्न सोडवायला हा लेख मदत करू शकतो. मे महिन्यातील रखरखत्या उन्हात मराठी चित्रपटांचा खजिना तुम्हाला थंडावा देऊ शकतो. मे महिन्यात कोणते चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, बघुया.

रावरंभा

अनुप जगदाळे यांचे लेखन दिग्दर्शन असलेला, शशिकांत पवार यांची निर्मिती लाभलेला रावरंभा हा ऐतहासिक चित्रपट १२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री मोनालिसा बागल यामध्ये रंभाच्या भूमिकेत झळकणार आहे तर सुप्रसिद्ध अभिनेता ओम भूतकर रावची भूमिका पडद्यावर रेखाटतांना दिसेल. दिग्दर्शक अनुप जगदाळे यांचा हा पहिलाच इतिहास पट असेल. आपल्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असेलला अभिनेता कुशल बद्रिके या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारतांना दिसेल. सोबतच अशोक समर्थ, शंतनू मोघे, अपूर्वा नेमलेकर, किरण माने, गिरीश कुलकर्णी यांसारख्या तगड्या कलाकरांची फळी या सिनेमात बघायला मिळणार आहे.(Marathi Movie)

फकाट

श्रेयस जाधव लिखित, दिग्दर्शित फकाट हा सिनेमा १९ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोन बेरोजगार दारुड्या मित्रांची गोष्ट असलेल्या या सिनेमात सुयोग गोऱ्हे, हेमंत ढोमे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासोबतच अविनाश नारकर, अनुजा साठे, रसिका सुनील, कबीर दुहान सिंग, नितीश चव्हाण आणि किरण गायकवाड आदी कलाकरांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय असे दिसून येते. झिम्मा या सुपरहिट सिनेमाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे या चित्रपटात भूमिका साकारताना दिसून येणार आहे.(Marathi Movie)

चौक

मुळशी पॅटर्न फेम अभिनेता देवेंद्र गायकवाड याचे लेखन, दिग्दर्शन असलेला चौक हा सिनेमा १९ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. सामान्या प्रेक्षकांना साद घालणारा चित्रपटाचा विषय असल्याने लोकांचा चांगला प्रतिसाद ट्रेलरला मिळत आहे. अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा अभिनेता देवेंद्र गायकवाड या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, खुद्द देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, उपेंद्र लिमये, अक्षय टंकसाळे, संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड, रमेश परदेशी, अंजली जोगळेकर, दिपकार पारकर, संदीप जुवाटकर, सागर पाबळे, शुभंकर एकबोटे, विनोद सातव, नचिकेत जोशी, यश रुईकर आदी कलाकरांची फळी या चित्रपटात झळकणार आहे.(Marathi Movie)

======

हे देखील वाचा : दगडी चाळ २: एक रंजक दंतकथा

======

मुसंडी

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकाच्या अवतीभोवती फिरणारे कथानक असलेला हा चित्रपट २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवाजी डोलताडे यांनी दिग्दर्शन तर गोवर्धन डोलताडे यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे. बबन फेम गायत्री जाधव, सैराट फेम तानाजी गलगुंडे, सुरेश विश्वाकर्मा आदी प्रसिद्ध कालाकरांसह रोहन पाटील, शुभांगी लाटकर, प्रणव रावराणे, शिवाजी डोलताडे आदी कलाकार सिनेमात झळकणार आहेत.(Marathi Movie)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress chowk Entertainment Musandi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.