Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा “या” चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे.
बॉलिवूड मधील स्टार कीड कंपूमध्ये आणखी एका स्टार कीडची भर पडली आहे. हा आहे बाबिल खान. दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कर्करोगानं इरफान खान यांचे निधन झाले. बाबिल खान (Babil Khan) याच्यावर मोठा आघात झाला होता. आपल्या वडीलांच्या अभिनयाचा चाहता असलेल्या बाबिल खाननं वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. अनुष्का शर्माच्या निर्मितीखाली होणा-या क्वाला चित्रपटातून बाबिल सिनेसृष्टीत दाखल होतोय. नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शि होणार असून याचा टिझर नुकताच सोशल मिडीयावर रिलीज झाला. त्यात बाबिलचा लूक इरफान खानच्या लूकसारखाच दिसत असल्याची प्रतिक्रीया इरफानच्या चाहत्यांनी दिली आहे.
इरफान खाननं (Irrfan Khan) आपल्या अभिनयानं केवळ भारतीयांचीच नाही तर जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. कर्करोगानं या गुणी अभिनेत्याचं अकाली निधन झालं. त्याची कमी कोणी भरुन काढू शकणार नाही. पण इरफान खानच्या चेह-याशी साधर्म्य असणा-या त्याच्याच मुलाची, बाबिल खानची सध्या चर्चा चालू आहे. अन्विता दत्त दिग्दर्शित क्वाला (Qala) या चित्रपटातून बाबिल बॉलिवूडमध्ये दाखल होत आहे. नेटफ्लिक्स आणि अनुष्का शर्माची निर्मिती संस्था, क्लीन स्लेट या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. या चित्रपटात बाबिल सोबत तृप्ति डिमरी, स्वस्तिका मुखर्जी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आई आणि मुलगी यांच्यातील राग, रुसवा आणि प्रेम यावर आधारीत हा क्वाला चित्रपट आहे. अन्विता दत्त यांनी नेटफ्लिक्स आणि अनुष्का शर्मा सोबत बुलबुल चित्रपट केला होता. त्यात तृप्ति डिमरी प्रमुख भूमिकेत होती.
बाबिलचे शिक्षण लंडनला झाले आहे. सोशल मिडीयावर ॲक्टीव्ह असणारा बाबिल आपल्या वडीलांसोबतचे फोटो कायम सोशल मिडीयावर शेअर करीत असतो. नुकताच फिल्मफेअर पुरस्कार सोहळा झाला. त्यात इरफान खान यांना मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ट्रॉफी देण्यात आली. या सोहळ्यात वडिलांच्या आठवणीत अश्रू ढाळणा-या बाबिलचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर आला होता. आता काही दिवसात क्वाला चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. बाबिलचे लूक्स जरी त्याच्या वडीलांसारखे असले तरी बाबिलचा अभिनय कसा आहे, याकडेच इरफानच्या चाहत्यांचे लक्ष असेल.
=====
हे देखील वाचा: द बिग बुल: अभिषेक बच्चनचा जलवा
=====