Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

Saiyaara चित्रपटाचा सीक्वेल येणार का?; दिग्दर्शक मोहित सुरींनी स्पष्टच सांगितलं….
काही दिवसांपूर्वी मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैय्यारा’ (Saiyaara) चित्रपट रिलीज झाला होता… या चित्रपटाने नव्या पिढीला अक्षरश: वेड लावलं आहे… Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या या चित्रपटाची प्रेमकथा आजच्या तरुणाईला फार आपलीशी वाटते… चित्रपटात अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या… प्रेक्षकांनी सैय्यारा चित्रपटाला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादानंतर आता याचा दुसरा भाग येणार का अशी चर्चा रंगली आहे… यावर चित्रपटाचे दिग्दर्शक नेमकं काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात…(Bollywood Sequels)

मोहित सुरी (Mohit Suri) यांनी ‘Instant Bollywood’ ला दिलेल्या मुलाखतीत ‘सैय्यारा’च्या सीक्वेलबद्दल स्पष्टपणे म्हटलं आहे की, “दुसऱ्या भागासाठी कोणतंही प्लॅनिंग केलेलं नाही. सध्या हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे, जो मला एन्जॉय करायचा आहे. चित्रपट अजूनही थिएटरमध्ये सुरू आहे आणि सध्या सीक्वलबद्दल कोणताही विचार केलेला नाही.” त्यामुळे दिग्दर्शकांच्या म्हणण्यानुसार सध्या तरी सैय्याराच्या सीक्वलच्या चर्चांना पूर्णविराम लागला दिला आहे…
====================================
हे देखील वाचा : Gen Z जनरेशनच्या डोळ्यात पाणी आणणारा Saiyaara ओटीटीवर कधी येणार?
====================================
दरम्यान, ‘सैय्यारा’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सैय्यारा चित्रपटाने २१.५ कोटींची ओपनिंग केली होती… त्यानंतर पहिल्या आठवड्यात १७२.७५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १०७.७५ कोटी, तिसऱ्या आठवड्यात २८.२५ कोटी, चौथ्या आठवड्यात १४.१ कोटी, पाचव्या आठवड्यात २.९५ कोटी, कमवत ४६ दिवसांमध्ये एकूण ३२९.२ कोटी कमावले आहेत… (Saiyaara box office collection)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi