
मल्लिका शेरावत आता ‘Big Boss 19’ मध्ये सहभागी होणार? अभिनेत्रीने स्वतःच दिलं उत्तर…
प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणारा आणि टीआरपीच्या यादीत अग्रस्थानी असणारा शो ‘बिग बॉस’(Big Boss) लवकरच त्याच्या 19 व्या सीझनसह परत येत आहे. सुपरस्टार सलमान खानच्या होस्टिंगमध्ये रंगणाऱ्या या रिअॅलिटी शोची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, शोचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबत सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नसली, तरी संभाव्य स्पर्धकांची नावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(Big Boss 19)

याच दरम्यान अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) हिचे नाव ‘बिग बॉस 19’ (Big Boss 19)च्या स्पर्धकांमध्ये असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, या अफवांवर मल्लिकाने स्वतः प्रतिक्रिया देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर करत या बातम्यांचे खंडन केले आहे. तिने लिहिले आहे की, “सर्व अफवांना पूर्णविराम देत सांगते, मी बिग बॉस करत नाही आणि कधीही करणार नाही. धन्यवाद.”

याआधी मल्लिका शेरावत मागील एका सीझनमध्ये पाहुण्या कलाकाराच्या रूपात सहभागी झाली होती. त्या वेळी ती तिच्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती, जिथे तिच्यासोबत राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी हे कलाकार देखील होते. त्या एपिसोडमध्ये मल्लिका आणि सलमान खान यांच्यातील मजेदार केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि त्यांचे व्हिडिओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.(Big Boss 19)
===================================
हे देखील वाचा: Chala Hava Yeu Dya 2: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील वनिता खरातची ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये होणार एण्ट्री?
===================================
‘बिग बॉस 19’ चा नवा प्रोमोही नुकताच रिलीज झाला असून, त्यात शोचा नवीन लोगो झळकतो आहे. यंदाच्या सीझनमध्येही प्रेक्षकांना भरपूर नाट्य, संघर्ष, ट्विस्ट्स आणि भरगच्च मनोरंजन अनुभवायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. या वर्षी शोची थीम काय असेल, याची उत्सुकताही तितकीच वाढली आहे. स्पर्धकांच्या यादीविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, रिपोर्ट्सनुसार राम कपूर व गौतमी कपूर, धीरज धूपर, मुनमुन दत्ता, अनिता हसनंदानी, लता सभरवाल, आशिष विद्यार्थी, खुशी दुबे, गौरव तनेजा आणि अपूर्व मखिजा यांची नावे संभाव्य स्पर्धक म्हणून समोर येत आहेत. लवकरच निर्माते अधिकृत यादी जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे.