डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

‘द फॅमिली मॅन ३’मध्ये Jaideep Ahlawat याने ‘रुक्मा’ची भूमिका का स्वीकारली?
बॉलिवूडमध्ये आजही काही नेपो किड्स असे आहेत जे अंडररेटेड आहेत… आणि त्यापैकीच एक म्हणजे जयदीप अहलावत (Jaideep Ahlawat)… अनुपम खेर आणि किरण खेर यांचा मुलगा जयदीप बरीच वर्ष इंडस्ट्रीत काम करतोय.. पण त्याचं टॅलेंट सिद्ध करुन दाखवणाऱ्या फारश्या भूमिका त्याच्या वाट्याला आल्या नाहीत… पण ज्या आल्या त्याचं त्याने सोनं केलं यात शंका नाही… ‘पाताल लोक’ नंतर आता ‘द फॅमेली मॅन ३’ (The Family Man 3)मध्ये जयदीपने साकारलेली रुक्मा ही बूमिका प्रेक्षकांच्या मनात बसली आहे… दरम्यान, या चित्रपटात ही खलनायकाची भूमिका का स्वीकारली याबद्दल जयदीपने खुलासा केला आहे… काय म्हणाला तो जाणून घेऊयात…
‘मिड डे’शी बोलताना जयदीप अहलावत म्हणाला की, “नागालॅंडल्या धर्तीवर लोकांनी ‘पाताल लोक’मध्ये ‘हाथीराम’ म्हणून पाहिले होते आणि आता ‘द फॅमिली मॅन ३’मध्ये तिथेच तो ‘रुक्मा’ बनला. तो म्हणाला, “ही तीच जागा आहे जिथे मी आधी ‘हाथीराम’ म्हणून उभा होतो आणि नंतर ‘रुक्मा’ म्हणून. जागा तीच आहे, पण दोन्ही व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळ्या आहेत. इथे कला दिग्दर्शन खूप बदलले आहे. एकाच ठिकाणी असूनही, पूर्णपणे वेगळे जीवन जगणे हा एक मनोरंजक अनुभव आहे.” (Entertainement News)

पुढे तो म्हणाला की, “हे राज्य आता त्याचे दुसरे घर बनले आहे. मी कोहिमामध्ये इतके शूटिंग केले आहे की नागालँड सरकारने मला तिथे एक घर द्यावे! या भूमिकेमुळे, शेवटी मला अंतरात्मा किंवा परिणामांची चिंता न करता मोकळेपणाने जगण्याची संधी मिळाली.” ‘रुक्मा’ची भूमिका का साकारली? या भूमिकेबद्दल बोलताना त्याने कबूल केले की, “पहिल्या दिवशी मला आठवतंय की, मी विचार केला, माझी ही भूमिका ‘हाथीराम चौधरी’सारखी अजिबात नाहीये. तुम्ही हे कसं समजून घेता? मग मला जाणवलं की, समजून घ्यायची गरज नाही, तुम्ही फक्त दोन्ही भूमिकांचा आनंद घ्या. रुक्मासारखं पात्र साकारणं हा एका वेगळ्याच प्रकारचा, स्वातंत्र्य देणारा अनुभव होता.”
दरम्यान, ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या चाहत्यांसाठी ‘द फॅमिली मॅन ३’मध्ये जयदीप अहलावत आणि मनोज वाजपेयींचं एकत्र येणे आनंदाचा धक्का देणारं नक्कीच होतं.. मनोजसोबत काम करताना आलेल्या अनुभवाबद्दल जयदीप म्हणाला की, “मनोजसोबत काम करणं म्हणजे वेळेत मागे गेल्यासारखं आहे. ते एक शिस्त घेऊन येतात. इतक्या वर्षांनंतर त्यांच्यासोबत ॲक्शन सीन करणं रोमांचक होतं. त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असते आणि हा शो एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखा आहे.” (Manoj Bajapayee)
================================
हे देखील वाचा : Manoj Bajpayee : फॅमेली मॅनमध्ये ‘छावा’तील कलाकार असता श्रीकांत तिवारी
================================
दरम्यान, जयदीप अहलावत याने २००८ मध्ये ‘नर्मिन’ या शॉर्ट फिल्मपासून अभिनयाचा प्रवास सुरु केला होता… मात्र, २०१० मध्ये आलेल्या ‘खट्टा मीठ्ठा’ या चित्रपटाने त्याला विशेष ओळख मिळवून दिली… मग पुढे ‘आक्रोश’, ‘रॉकस्टार’, ‘कमांडो’, ‘आत्मा’, ‘गब्बर इज बॅक’, ‘बागी ३’, ‘थ्री ऑफ अज’, ‘जाने जा’, ‘ज्वेल थीफ’ अशा अनेक चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाचे पैलु प्रेक्षकांसमोर मांडले… लवकरच त्याचा आगामी ‘इक्कीस’ (Ikkis) हा चित्रपट येणार असून दिवंगत ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र (Dharmendra Singh Deol) यांचा हा शेवटचा चित्रपट आहे.. हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… (Jaideep Ahlawat Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi