दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
विद्या बालन आणि शेफाली शाह अभिनीत, अॅमेझॉन ओरिजिनल ‘जलसा’चा ट्रेलर प्रदर्शित!
१८ मार्चला होणार विशेष प्रीमियर
मुंबई, ९ मार्च २०२२: रोमहर्षक आणि सूडाच्या चित्तथरारक घटनाक्रमात, प्राइम व्हिडीओने आज त्याच्या आगामी ड्रामा-थ्रिलर जलसा या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण केले आहे. विद्या बालन आणि शेफाली शाह या आपल्या काळातील दोन उत्कृष्ट अभिनेत्रींच्या अतूलनीय अभिनयाच्या जुगलबंदीने नटलेला हा चित्रपट मानवी भावनांच्या चित्तवेधक कथेचे प्रतिबिंब दाखवतो. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित, जलसा ची निर्मिती भूषण कुमार, कृष्णन कुमार, विक्रम मल्होत्रा, शिखा शर्मा आणि सुरेश त्रिवेणी यांनी केली आहे. या चित्रपटात मानव कौल, रोहिणी हट्टंगडी, इक्बाल खान, विधात्री बंदी, श्रीकांत मोहन यादव अशी तगडी स्टारकास्ट आणि त्यांच्या जोडीला नव्या दमाचे सूर्या काशीभटला आणि शफीन पटेल यांसारख्या अभिनेते देखील आहेत. अॅमेझॉन ओरिजिनल मुव्ही जलसा १८ मार्च रोजी भारतासह इतर २४० देशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रीमियरसाठी सज्ज आहे.
जलसाचा आकर्षक ट्रेलर आपल्याला माया (विद्या बालन) आणि रुक्साना (शेफाली शाह) या दोन मुख्य पात्रांची ओळख करून देतो, हे कथानक त्यांच्या सभोवतालची अराजकता, रहस्ये आणि खोटेपणा , सत्य आणि फसवणूकव यामुळे त्यांच्या सभोवतालच्या जगाला गोंधळात टाकणारी जीवन बदलणारी घटना तसेच विमोचन आणि प्रतिशोधाचे द्वंद्व युद्ध याभोवती फिरते. उत्कंठावर्धक कथानक, उत्कृष्ट अभिनय याद्वारे जलसा पूढे सरकतो, हा चित्रपट तुम्हाला मंत्रमुग्ध करेल.
दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांनी सांगितले की -“जलसा हा एक थरारपट आहे. या चित्रपटात विद्या व शेफाली आणि बाकीच्या कलाकारांच्या समर्थ, भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या अभिनयाने सजलेली रहस्ये, सत्य, विडंबन यांच्या मदतीने गुंफलेल आकर्षक कथा देण्याचा प्रयत्न केला आहे. एक आकर्षक आणि मोठ्या प्रेक्षक वर्गाला खिळवून ठेवेल असा चित्रपट बनवायचा. मी माझे निर्माते, टी-सिरीज आणि अबंडंटिया मधील विक्रम मल्होत्रा यांचा आभारी आहे ज्यांनी जलसाला जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करून माझ्या व्हिजनवर तसेच प्राइम व्हिडिओवर विश्वास ठेवला आणि मला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल.”
=====
हे देखील वाचा: मार्चमध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ 4 बहुचर्चित चित्रपट!
=====
या चित्रपटात माया मेनन या पत्रकाराची भूमिका करणारी विद्या बालन म्हणाली- “मी करत असलेल्या प्रत्येक चित्रपटात, एक नवीन कथा सांगण्याचा आणि मी आत्तापर्यंत साकारलेल्या पात्रांपेक्षा वेगळी व्यक्ती बनण्याचा माझा प्रयत्न असतो आणि जलसाने ह्या सर्वच गोष्टींची पूर्तता केली आहे. जलसा ने मला गूढ आणि गहि-या विषयात डोकावण्याची संधी दिली आणि एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी हा खूप आव्हानात्मक, समृद्ध करणारा आणि परिपूर्ण करणारा अनुभव होता. तसेच सुरेशसोबत आमच्या मागील प्रोजेक्ट-तुम्हारी सुलू नंतर ह्या चित्रपटात एकत्र काम करणे खूप रोमांचक होते. अबंडंटिया एंटरटेनमेंट आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओसोबत काम करण्याची ही तिसरी वेळ आहे आणि मला असे म्हणायचे आहे की पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणेच हा अनुभव देखील विलक्षण होता. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर जलसा 18 मार्च रोजी प्रदर्शित झाल्यावर लोकांनी त्याचा आंनद लूटावा यासाठी मी खूप आतूर झाली आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आणि अनेक अप्रतिम अभिनेत्यांसोबत काम करणे, विशेषतः शेफाली शाह सोबत काम करणे हे माझ्यासाठी एक खास आकर्षण आहे.”
अभिनेत्री शेफाली शाह म्हणाली- “काही गोष्टी अशा असतात की, तुम्ही त्यात भाग घेऊ शकत नाही, जलसा माझ्यासाठी असाच एक अनुभव होता.माझ्या अलीकडच्या भूमिकेच्या विपरीत, जलसामधील रुक्सानाची माझी भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. तथापि, आईच्या अगतिकता आणि संदिग्धता इतरांसारख्याच असतात आणि त्यामधून जगणे खरोखरच एक कलाकार म्हणून पूर्ण होते. आपले परिश्रम एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील हे जाणून खूप आनंद झाला आणि मला खात्री आहे की त्यांना जलसा नक्कीच आवडेल.”
=====
हे देखील वाचा: विद्या बालन सगळ्यांपेक्षा वेगळी, म्हणूनच यशस्वी.
=====
जलसा हे अबंडंटिया एंटरटेनमेंट, विद्या बालन आणि प्राइम व्हिडिओ यांच्यातील तिसरे कोलॅबोरेशन आहे, जलसा हे प्राईम व्हिडिओ आणि अबंडंटिया एंटरटेनमेंट यांच्यातील दिर्घकालीन संबंधातील एक पुढील पाउल आहे, ज्यात शकुंतला देवी, शेरनी, छोरी, राम सेतू, यासह प्रचंड लोकप्रिय अॅमेझॉन ओरिजिनल सिरीज ब्रीद चे अनेक सीझन यांचा समावेश आहे. सुरेश त्रिवेणीने यापूर्वी विद्या बालनसोबत प्रेक्षकांच्या आवडत्या ‘तुम्हारी सुलू’साठी काम केले आहे आणि आता ही जोडी त्यांच्या दुसऱ्या चित्रपटासाठी एकत्र येत आहे. आणि पहिल्यांदाच, दोन पॉवर परफॉर्मर्स – विद्या बालन आणि शेफाली शाह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. जलसाचा जागतिक प्रीमियर अमेझॉन प्राइम व्हिडिओवर १८ मार्च रोजी भारतात आणि जगभरातील इतर २४० देशांमध्ये होणार आहे.