अनाथ लहान मुलाच्या भावविश्वाचा उत्कट प्रवास मांडणारा ‘हा’ चित्रपट टॅक्स

Janhvi Kapoor हिला ३ मुलं का हवी आहेत?; तिनेच सांगितलं कारण….
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांचा ‘परम सुंदरी’ (Param Sundari) चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला… याच निमित्ताने दोघांनी कपिल शर्माच्या शो मध्ये हजेरी लावली होती… यावेळी भविष्यात जान्हवीने तिला ३ मुलं हवी असल्याची कबूली दिली… इतकंच नाही तर लग्नानंतर मुलाबाळांसह साऊथमध्ये सेटल होण्याचं तिचं स्वप्न असल्याचं देखील तिने म्हटलं आहे… आता तिला नेमकी तीनचं मुलं का हवी आहेत जाणून घेऊयात त्याचं कारण…(Entertainment News)

तर, जान्हवी कपूर (Actress Janhvi Kapoor) कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये सहभागी झाली होती… यावेळी जान्हवीने खुलासा केला की, तिला तीन मुलं हवी आहेत. त्याचं कारण सांगताना जान्हवी म्हणाली की, “३ हा आकडा माझ्यासाठी लकी आहे… आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे भांडण किंवा संवाद कायम दोघांमध्ये होतो… अशावेळी कुणीतरी तिसरं हवं जे मध्यस्थी करु शकेल… आणि मला याच कारमासाठी ३ मुलं हवी आहेत… जेणेकरुन एक मुल दोघांची बाजू सावरु शकेल…”, तिचं हे उत्तर ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला होता…(Janhvi kapoor movies)
============================
हे देखील वाचा : Janhvi Kapoor आणि Siddharth Malhotra यांच्या ‘परम सुंदरी’चं कलेक्शन झालं तरी किती?
============================

तसेच, या आधी जान्हवीने कोमल नाहटा यांच्या शोमध्ये सांगितले होते की, तिला लग्नानंतर पती आणि मुलांसोबत तिरुपती येथे स्थायिक होण्याची इच्छा आहे. त्यामुळे भविष्यात तिच्या संसाराचं हे चित्र पुर्ण होऊ शकेल का हे पाहावंल लागेल… जान्हवीच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, शिखर पहारियासोबत (Shikhar Pahariya) ती रिलेशनमध्ये असल्याचं सांगितलं जात असून लवकरच पंजाबी मुलगी मराठी कुटुंबाची सून होणाऱ असल्याचं सांगितलं जात आहे…‘धडक’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या जान्हवीने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केली आहे…(Entertainment news)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi