Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Aamir Khan आणि पाकिस्तानबद्दलची ‘ती’ विधानं!

Govinda वर चित्रित एका सॅड सॉंगच्या निर्मितीचा भन्नाट किस्सा!

Amruta Subhash हिच्या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर ‘जारण’

Aamir Khan : “बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा ‘पाकिस्तान’चं उघडपणे नाव माझ्याच चित्रपटात

Marathi Movies : थिएटर गाजवल्यानंतर ‘हे’ मराठी चित्रपट ओटीटीवर रिलीज

Khushboo Movie : बेचारा दिल क्या करे…!

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Javed Akhtar : “हिंदी प्रेक्षकांचा चित्रपटाशी संबंध…”; जावेद स्पष्टच म्हणाले

 Javed Akhtar : “हिंदी प्रेक्षकांचा चित्रपटाशी संबंध…”; जावेद स्पष्टच म्हणाले
मिक्स मसाला

Javed Akhtar : “हिंदी प्रेक्षकांचा चित्रपटाशी संबंध…”; जावेद स्पष्टच म्हणाले

by रसिका शिंदे-पॉल 12/03/2025

थ्रिलर, अॅक्शन, रोमॅंटिक-कॉमेडी या पठडीतील चित्रपट अलीकडे प्रेक्षकांना पाहायला फार आवडतात. पण बॉलिवूड सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचीच कुठेतरी नक्कल करत असल्यामुळे प्रेक्षकांचा कल दाक्षिणात्य चित्रपट पाहण्याकडे अधिक वळला आहे. परिणामी एखादा सुपरस्टार नसूनही बऱ्याच साऊथ फिल्म्स ५०० कोटींच्या पुढे कमाई करतात. यावरच दिग्दर्शक जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि अभिनेता आमिर खान यांनी त्यांची मतं मांडली आहेत. नेमकं हिंदी चित्रपटांना अपयश कुठे येतं यावर जावेद काय म्हणाले जाणून घेऊयात…

गेल्या काही वर्षांत ‘जवान’, ‘पठाण’, ‘स्त्री’ यापलीकडे कोणते चित्रपट फारसे बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकले नाहीत.  बरं, या चित्रपटांच्या दरम्यान इतर अनेक अभिनेत्यांचे चित्रपट येऊन गेले पण त्यांचा टिकाव फारसा लागला नाही. याबद्दल बोलताना जावेद (Javed Akhtar) म्हणाले की, “हिंदी चित्रपटांचा प्रेक्षकांशी असलेला संबंध तुटला आहे. डब केलेले दाक्षिणात्य चित्रपट उत्तरेत कोटींची कमाई करीत आहेत. काही दाक्षिणात्य कलाकार उत्तरेतील प्रेक्षकांना माहीतही नसतात. त्यांचे चित्रपट प्रदर्शित होतात आणि उत्तरेत त्या चित्रपटांची कमाई ६००-७०० कोटी होते.” (Javed Akhtar)

यावर आमिर खानने (Amir Khan) आपलं मत मांडता म्हटलं, “चित्रपट निर्मात्यांच्या भौगोलिक पार्श्वभूमीचा बॉलीवूडचे चित्रपट अपयशी ठरण्यामागे काहीही संबंध नाही. त्याबरोबरच दक्षिण विरुद्ध उत्तर, असाही मुद्दा नाही. आपण ज्या समस्येचा सामना करीत आहोत ती काहीतरी वेगळी आहे. आपण लोकांकडे जातो, त्यांना विनंती करतो की, कृपया आमचा चित्रपट पाहा. जर तुम्ही तो पाहिला नाहीत, तर आठ आठवड्यांत आम्ही तो तुम्हाला तुमच्या दाराशी आणून देऊ. म्हणजेच तो चित्रपट ओटीटीवर आणू. हे आपलं बिझनेस मॉडेल आहे. आठ आठवड्यांनंतर तुम्ही आधीच जे सबस्क्रिप्शन घेतलेलं असतं, त्यातून चित्रपट घरबसल्या पाहू शकता.” (Bollywood Masala)

==================

हे देखील वाचा : Amir Khan : मुन्नाभाईतून संजयला रिप्लेस करणार होता आमिर खान?

==================

पुढे आमिर म्हणाला, “माझ्याकडे आधी पर्याय नव्हता म्हणून मी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायचो. आता ते फॅन्सी वाटतं म्हणून मी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतो. पण ओटीटीमुळे आपण कुठेही बसून कुठलाही चित्रपट पाहू शकतो. त्यामुळे थिएटरला जाण्याची गरज उरलेली नाहीये. आपण आपले स्वतःचे व्यवसाय मॉडेलच बिघडवले आहे. बॉलीवूडच्या चित्रपटांना अपयश येण्यामागे बदललेलं व्यवसाय मॉडेल हे एक कारण असूच शकतं”. (Bollywood update)

आता आगामी बिग बजेट चित्रपट हिंदीतले पाहायला गेलो तर ‘ब्रम्हास्त्र २’, ‘कल्की २’, ‘रामायण’ असे काही मोजकेच चित्रपट आहेत. पण त्यातही काही दाक्षिणात्य कलाकार गेस्ट अपिरन्स देत असल्यामुळे त्यातही थोडा साऊथ भाग दिसतोच. पण बॉलिवूडला जर का टिपिकल हिंदी चित्रपट द्यायचे असतील तर आपल्या मातीशी, संस्कृतशी आणि लोकांना आपलेसे वाटतील असे चित्रपट दिले तरच पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांना प्रेक्षक येतील. (Big budget films)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor amir khan Bollywood Bollywood Chitchat bollywood movies bollywood update Celebrity Entertainment entertainment masala Featured Javed Akhtar jawan Marathi Movie pathan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.