Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian singer mukesh

    Mukesh यांनी गीतकार नक्ष लायलपुरी यांना गुमनाम जिंदगीतून कसे बाहेर काढले!

    vidhu vinod chopra and lal krishna advani

    राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत वाद का घातला होता?

    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dadasaheb Phalke यांच्या आधीही मराठी माणसाने चित्रपट तयार केला होता!

जेव्हा Amitabh Bachchan , स्पायडर मॅन आणि टायटॅनिकचा हिरो एकत्र

Tere Naam पाहिला तर ही GenZ पोरं रडून रडून… ‘सैयारा’

Mukesh यांनी गीतकार नक्ष लायलपुरी यांना गुमनाम जिंदगीतून कसे बाहेर

Sonakshi Sinha चा चित्रपट ‘सैयारा’मुळे चांगलाच आपटला; १ कोटींचाही टप्पा

Son Of Sardar 2 :”मी संजय दत्तच्या जागी आलो कारण…”;

जगातल्या सर्वात महागड्या Avatar : Fire and Ash चित्रपटाच्या ट्रेलरची

कथा कल्पना एकच, चित्रपट मात्र तीन, त्यात Sholay देखिल…

२०२५ मध्ये MAMI Mumbai Film Festival होणार नाही!

Akshay Kumar ७०० स्टंटमॅन्ससाठी ठरला देवमाणूस!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Jay Bhim Panther :समाजातील प्रत्येक संघटनेच्या जडणघडणेचा संघर्ष

 Jay Bhim Panther :समाजातील प्रत्येक संघटनेच्या जडणघडणेचा संघर्ष
मिक्स मसाला

Jay Bhim Panther :समाजातील प्रत्येक संघटनेच्या जडणघडणेचा संघर्ष

by रसिका शिंदे-पॉल 05/04/2025

दलित, जातीभेद या विषयीच्या संघर्षाची दमदार कथा ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, चित्रपटाविषयीची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Jay Bhim Panther)

भदंत शीलबोधी थेरो यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनद्वारे निर्मिती होत असलेला ‘जयभीम पँथर’ एक संघर्ष हा महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आयु. रामभाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट, मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा या निर्मिती संस्थेचा मानस आहे. (Jay Bhim Panther)

‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ चित्रपटात अभिनेता  गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, मिलिंद शिंदे, अभिजीत चव्हाण, सोनाली पाटील, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, संजय कुलकर्णी, प्रवीण डाळिंबकर, विनय धाकडे, प्रियांका उबाळे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.(Marathi upcoming movie)

दलित, शोषित बहुजन समाजातील घटकांवर  अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या प्रत्येक बहुजन संघटनेची, आणि त्यांच्या संघर्षाची सर्वसमावेशक कहाणी ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ हा चित्रपट मांडतो. जातींमधील संघर्ष, दलितांमधील अत्याचार, बहुजन राजकारण, शिक्षण याचं चित्रण करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या विचारांचे सामाजिक महत्त्व हा चित्रपट अधोरेखित करतो. 

============

हे देखील वाचा: Mahaparinirvan Movie Song: बाबासाहेबांच्या जयंती निमित्त ‘महापरिनिर्वाण’ सिनेमातील ‘जय भीम’ हे स्फूर्तीदायक गाणं प्रदर्शित

============

आजच्या काळात राजकारण बदलत असताना, जातीय संघर्ष वाढत असताना एक वेगळा सर्वसमावेशक विचार देण्याचा प्रयत्न ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ हा चित्रपट करत असल्याचं ट्रेलरवरून दिसतं आहे. अनुभवी अभिनेत्यांचा अभिनय, कसदार लेखन दिग्दर्शनांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणेल यात शंका नाही. ११ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.(Marathi films)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: anand shinde Celebrity News chinmay udgirkar Entertainment gaurav more Jay Bhim Panther marathi upcoming film Milind Shinde sonali patil
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.