‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
Jiah Khan Case Verdict: जिया खान मृत्यू प्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता
दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल ‘जिया खान’च्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. जिया खान आत्महत्या प्रकरणात अभिनेता ‘सूरज पांचोली’ची‘ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली मुख्य आरोपी होता. जिया खानने 3 जून 2013 च्या मध्यरात्री वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी जुहूयेथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती.जिया खानच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती, तिच्या मृत्यूनंतर कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेत्री सुरत पांचोली विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टाच्या निर्णयापूर्वी सोशल मीडियावर ‘जस्टीस फॉर जिया खान‘ ट्रेंड झाला होता. जिया खानच्या मृत्यूच्या 10 वर्षांनंतर सीबीआय कोर्टाने आपला निकाल दिला आहे.(Jiah Khan Case Verdict)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिया खानचा मृतदेह सागर संगीत बिल्डिंगमधील तिच्या फ्लॅटमध्ये आढळला. आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा सूरज पांचोली याच्यासोबत जिया रिलेशनशीपमध्ये होती. जियाने एक सुसाईड नोट लिहिली होती, ज्यात सूरज पांचोलीचे नाव होते. त्यावेळी अभिनेता सूरज पांचोली बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणाच्या एका आठवड्यानंतर सूरजवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जियाची आई राबिया खान यांनी वारंवार युक्तिवाद केल्यानंतर आणि ३ जुलै २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.आपल्या चिठ्ठीत जियाने सूरजसोबतच्या जिव्हाळ्याच्या संबंधांबद्दल तसेच शारीरिक छळ आणि मानसिक छळाबद्दल सांगितले होते. सरकारी पक्षाने जियाची आई राबियासह २२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते, तर सूरजची बाजू वकील प्रशांत पाटील यांनी मांडली होती.
जिया खानची आई राबिया खानहिने कोर्टाला सांगितले होते की, तिच्या मुलीचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या आहे. यानंतर जिया खानची आई राबिया यांनी सीबीआय चौकशीची मागणी कोर्टाकडे केली होती. २०१४ मध्ये न्यायालयाने राबिया यांची या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मान्य केली होती. मे 2015 मध्ये सूरज पांचोलीच्या घरावर सीबीआयने छापा टाकला होता आणि एका महिन्यानंतर त्यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. जिया खान आत्महत्या प्रकरण 2021 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयात सोपवण्यात आले होते.(Jiah Khan Case Verdict)
=================================
हे देखील वाचा: लाखांची गाडी सोडून सारा अली खान ने केला चक्क मुंबई मेट्रोतून प्रवास !
=================================
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूरज आणि जिया फेसबुकच्या माध्यमातून 2012 मध्ये एकमेकांना भेटले होते. यानंतर हळूहळू दोघांची ओळख वाढत गेली आणि दोघं रिलेशनशीपमध्ये आले. दोघांच्या घरच्यांनाही या नात्याबद्दल सर्व काही माहित होते. जिया आणि सूरज या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.