Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

जॉनी लिव्हर-जेमी लिव्हर ही बापलेकीची जोडी पहिल्यांदा ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर एकत्र दिसणार
जनसामान्यांना फक्त खेळून पैसे कमवता येण्याचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात मराठी टेलिव्हिजन वर जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर ही बाप लेकीची जोडी पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारी हे दोघेही मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई साठी खेळणार आहेत. ते स्वतः मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष आहेत. कॉमेडी च्या भविष्यासाठी ते ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. बाप लेकीची हि जोडी पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजन वर एकत्र येणार असल्याने त्यांचे चाहते ही या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासोबत व्ही आय पी, नवीन प्रभाकर, नितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर हे विनोदी कलाकार देखील यावेळी कोण होणार करोडपती च्या मंचावर उपस्थित असणार आहेत. या विनोदवीरांच्या येण्याने कोण होणार करोडपती च्या मंचावर हास्याचे तुफान येणार यात काही शंका नाही.(Johny Lever with Daughter)

त्याव्यतिरिक्त जॉनी लिव्हर यांच्या येण्याने मंचावर एक वेगळीच एनर्जी पाहायला मिळणार आहे. जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांच्या सोबतच सचिन खेडेकर यांच्या विशेष गप्पारंगताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन प्रभाकर, व्ही आय पी, नितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर या कलाकारांचे विशेष परफॉर्मन्स कोण होणार करोडपतीच्या मंचावर पाहायला मिळणार आहेत. जॉनी लिव्हर मंचावर असणार आणि धमाल होणार नाही हे शक्यच नाही. त्यामुळे यावेळी ही जॉनी लिव्हर यांनी त्यांच्या धमाल तुफानी कॉमेडी अंदाजात विनोद निर्मिती केली. त्यांच्या परर्फोमन्सने सचिन खेडेकर आणि सगळ्याच प्रेक्षकांना खळखळून हसवलं.जेमी लिव्हर हिने देखील तिच्या अभिनयाची सुंदर अशी झलक दाखवली. तिने चक्क आशा भोसलेंच्या सुरेल आवाजाची नक्कल केली. सचिन खेडेकरांसोबत सगळेच प्रेक्षक थक्क झाले इतका हुबेहूब आवाज तिने काढला. त्याव्यतिरिक्त तिने सांगितले कि जॉनी लिव्हर यांच्या व्यक्तिरेखांतील बाझीगर चित्रपटातील बाबुलाल हि व्यक्तिरेखा तिच्या सगळ्यात आवडीची आहे. त्याची देखील हुबेहूब नक्कल तिने सादर केली.

नवीन प्रभाकर, व्ही आय पी, नितीन भांडारकर आणि दिवेश शिवणकर यांनी देखील आपली कला या मंचावर सादर केली. या खेळातून जिंकलेली रक्कम जॉनी लिव्हर आणि जेमी मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई यांना देणार आहेत. आता ते किती रक्कम जिंकणार हे आपल्याला जाणून घेण्यासाठी हा विशेष भाग पहावा लागेल. विनोदाचे किंग जॉनी लिव्हर आणि जेमी लिव्हर यांचा सहभाग असलेला ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.(Johny Lever with Daughter)
===========================
===========================
आता मिमीकरी आर्टिस्ट असोसिएशन मुंबई साठी खेळताना ‘कोण होणार करोडपाती’च्या खेळात ते किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्यामुळे त्यांचे चाहते ही या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.