
Jolly LLb 3 : डबल जॉली, डबल ट्रबल; कधी येणार चित्रपटाचा टीझर?
प्रेक्षकांना जिका सीरीयस कोर्टरुम ड्रामा पाहायला आवडतो तितकाच कॉमेडी पण महत्वाचा विषय मांडणाला कोर्टरुम ड्रामा देखील पसंतीस येतोच… याच पठडीतील २ चित्रपट येऊन गेले ते म्हणजे ‘जॉली एल.एल.बी १’ (Jolly llb 1) आणि ‘जॉली एल.एल.बी २’ (Jolly llb 2)… दोन्ही चित्रपटांतील कमाल अभिनेत्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेडं केलं होतं… अर्शद वारसी आणि अक्षय कुमार या दोन्ही अभिनेत्यांनी उत्कृष्ट अभिनय साकारला होता… आणि आता लवकरच हे दोन्ही जॉली एकत्र येत प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत… ‘जॉली एल.एल.बी ३’ चित्रपट रिलीज होणार असून या चित्रपटाची मोठी अप़डेट समोर आली आहे… (Bollywood News)

जगप्रसिद्ध कोर्टरूम कॉमेडी चित्रपट सीरिज जॉली एलएलबी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यावेळी डबल डावपेच आणि विनोदाचा डबल डोस मिळणार आहे. कारण, ‘जॉली एलएलबी ३’ (Jolly llb 3) मध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) हे दोन्ही अवलिया अभिनेते एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेते सौरभ शुक्ला देखील दिसणार असून त्यांचा एका मजेशीर व्हिडीओ रिलीज झाला आहे…

‘जॉली एलएलबी ३’मध्ये अर्शद वारसी हा जगदीश त्यागी आणि अक्षय कुमार हा जगदीश्वर मिश्रा या लोकप्रिय भुमिकेत दिसणार असून न्यायाधीश त्रिपाठी अर्थात सौरभ शुक्ला यांचा एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सौरभ शुक्ला (Saurabh Shukla) दोन्ही जॉली एकत्र आल्यानंतर काय होणार याची लोकांना कल्पना देताना दिसत आहेत… मिळालेल्या माहितीनुसार, ‘जॉली एलएलबी ३’चा अधिकृत टीझर १२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून १९ सप्टेंबर २०२५ रोजी Jolly LLB 3 चित्रपट रिलीज होणार आहे. (Bollywood upcoming movies 2025)
================================
हे देखील वाचा : Hema Malini to Rekha : बॉलिवूडच्या ‘या’ स्टार्सना सरकारही देतंय पगार!
=================================
२०१३ मध्ये आलेल्या ‘जॉली एलएलबी’ या सुभाष कपूर दिग्दर्शित चित्रपटात अर्शद वारसी, बोमन इराणी, अमृता राव आणि सौरभ शुक्ला यांच्या मुख्य भूमिका होत्या. ४ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग ‘जॉली एलएलबी २’ २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात अक्षय कुमार, सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी, अन्नु कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या.. आता हे दोन्ही जॉली एकत्र आल्यानंतर काय धमाल उडते हे पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक उत्सुक आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi