हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!
ह्रतिक रोशन याच्या ‘वॉर २’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) याने प्रेक्षकांना त्याच्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांना वेडं केलं आहे… अयान मुखर्जी दिग्दर्शित स्पाय थ्रिलर वॉर २ मध्ये त्याची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली… दरम्यान, आता अशी माहिती मिळत आहे की या चित्रपटानंतर एनटीआर आता आणखी २ चित्रपटांमध्ये दिसणार आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, ‘वॉर २’ चित्रपटानंतर ज्युनिअर एनटीआर प्रशांत नीलसोबत १ चित्रपट आणि ‘देवरा २’ (Devara 1) वर काम लवकरच सुरू करणार आहे. दरम्यान, याबद्दल असं म्हटलं जात होतं की एनटीआर ‘वॉर २’ चित्रपटासोबत यशराजच्या अजून काही चित्रपटांसाठी लॉक झाला होता.. परंतु, तसं नसून तो त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामाला लागणार आहे… (Jr NTR Movies)
================================
हे देखील वाचा : Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?
=================================
‘वॉर २’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल बोलायचं झालं तर, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘वॉर २’ ने ५२ कोटी कमवत पहिल्या दिवसाची सुरुवात केली होती… त्यानंतर पहिल्या आठवड्याच्या शेवटी २०४.२५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात २७ कोटी कमवत आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण २३१.२५ कोटी कमावले आहेत…(War 2 box office collection)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi