जुनियर एनटीआरचा नवीन पोस्टर चाहत्यांच्या भेटीला
जुनियर एनटीआरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आणि पोस्टर निर्मात्यांनी रिलीज केले आहे. ‘देवरा’ हे त्याच्या चित्रपटाचे नाव असून कोराताला सिवा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एनटीआर आणि कोरातला सिवा यांचा हा सोबत दुसरा चित्रपट (New Movie) ठरणार असून याअगोदर त्यांनी जनता गॅरेजमध्ये सोबत काम केले आहे. आरआरआर स्टार एनटीआरचा हा कारकिर्दीतील तिसावा चित्रपट ठरणार आहे. ५ एप्रिल २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पोस्टरमध्ये एनटीआर समुद्रकिनारी दगडांवर उभा असलेला दिसून येत आहे. त्याच्या हातात रक्ताने माखलेलं शस्त्र आहे तर रागाने रोखलेली नजर त्याचा दरारा निर्माण करते. चित्रपटाची गोष्ट कशावर बेतलेली आहे याची अजूनतरी पुष्टी झालेली नाही परंतु समुद्राकाठी वसलेल्या गावांत घडणारी ही गोष्ट एक रीवेंज ड्रामा असणार असल्याचे सांगण्यात येते. याअगोदर एनटीआर सुपरहिट चित्रपट (New Movie) आरआरआर मध्ये झळकला होता तर कोरातला सिवा यांचा आचार्य प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आरआरआर स्टारर रामचरण आणि मेगास्टार चिरंजीवी ही बापलेकांची जोडगोळी यामध्ये झळकली होती.
चित्रपटामध्ये (New Movie) एनटीआर व्यतिरिक्त बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर झळकणार असून तिचा हा टॉलीवूडचा पहिला चित्रपट ठरणार आहे. सैफ आली खान आणि प्रकाश राज हे देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. कोसाराजू हरी कृष्णा आणि सुधाकर मक्कीलीनेनी हे चित्रपटाचे निर्माते आहेत. अनिरुद्धने संगीत दिलं आहे तर आर रतानावेलू यांनी सिनेमॅटोग्राफी सांभाळली आहे. साबू सिरील यांनी प्रोडक्शन डिझाईन केलं आहे तर श्रीकर प्रसाद एडिटिंग बघितल आहे.
जुनियर एनटीआर याव्यतिरिक्त प्रशांत नील यांच्यासोबत एका चित्रपटावर काम करतोय. प्रशांत नील यांनी याअगोदर केजीएफ १ आणि केजीएफ २ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘एनटीआर ३१’ असे या चित्रपटाचे (New Movie) तात्पुरते नाव ठेवण्यात आलेले आहे. केजीएफसारखीच भव्यता या चित्रपटादेखील प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
याबरोबरच एनटीआर ‘वार २’ मध्ये देखील ह्रितिक रोशन सोबत झळकणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनणारा हा चित्रपट यशराज स्पाय युनिव्हर्सचा पुढचा भाग असणार आहे. अयान मुखर्जी या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. अयान मुखर्जी यांनी याअगोदर ब्रह्मास्त्र, ये जवानी है दिवानी आणि वेक अप सिद यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
एनटीआरचे पूर्ण नाव नंदमुरी तारक रामाराव असे असून ते त्याच्या आजोबाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. त्याचे आजोबा प्रसिद्ध अभिनेते, फिल्ममेकर आणि राजकारणी होते. आंध्रप्रदेशचे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. (New Movie)
=======
हे देखील वाचा : बॉलीवूडच्या पहिला सुपरस्टार आणि त्यांचे राजकीय करियर!
======
एनटीआरचा आरआरआर लोकांनी डोक्यावर उचलून धरला होता. या चित्रपटामुळे त्याला फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात ओळख मिळाली होती. चित्रपटाने (New Movie) ऑस्कर आणि गोल्डन ग्लोबसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांना गवसणी घातली आहे. एक स्वतंत्रसैनिकाची भूमिका यामध्ये एनटीआरने बजावली होती. चित्रपटसमीक्षक तसेच चाहत्यांकडून त्याच्या कामाचे खुप कौतुक झाले होते. आता चाहत्यांना त्याच्या पुढच्या चित्रपटाची उत्कंठा लागून राहिली आहे.