Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

काजोलच्या लेकीची लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

 काजोलच्या लेकीची लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री?
कलाकृती विशेष

काजोलच्या लेकीची लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

by Team KalakrutiMedia 18/11/2022

बॉलिवूडमध्ये काही मातब्बर घराणी आहेत.  यामध्ये देवगण आणि मुखर्जी कुटुंबाचा समावेश आहे.  याच देवगण आणि मुखर्जी कुटुंबातून आलेला अभिनयाचा वारसा पुढे चालवण्यासाठी एक नवा चेहरा तयार आहे.  हा चेहरा आहे, न्यासा देवगणचा(Nysa Devgan).  काजोल आणि अजय देवगणची मोठी लेक नुकतीच 19 वर्षाची झाली आहे.  काही वर्षापूर्वी काळी सावळी मुलगी म्हणून ज्या न्यासाची टिंगल केली जायची, तिच न्यासा आता वेगळ्या रुपात समोर आली आहे.  उजळ चेहरा आणि चेह-यावरचा आत्मविश्वास…अशी न्यासा अलिकडेच एका कार्यक्रमात दिसली.  तिच्या या नव्या रुपानं अनेकांना आर्श्ययचकीत केले असून न्यासा लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेईल, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 

काजोल आणि अजय देवगणची लेक न्यासा (Nysa Devgan)गेल्या काही दिवसापासून अचानक सोशल मिडीयावर चर्चेत आली आहे.  त्याचं कारण म्हणजे तिचा बदललेला लूक…न्यासा तिच्या शिक्षणाच्या निमित्तानं सिंगापूरला राहत होती. बॉलिवुड पार्ट्यांमध्ये ती फारशी दिसत नसे.अगदी एखाद वेळी न्यासा आई काजोलबरोबर दिसली होती.  तेव्हा तिच्या लूकमुळे ती अधिक ट्रोल झाली.  लेकीवर झालेल्या या टिकेमुळे देवगण कुटुंब व्यथित झालं होतं. कोजोलनं याबाबत आपली नाराजीही व्यक्त केली होती.  मात्र आता हिच न्यासा एकदम वेगळ्या स्वरुपात समोर आल्यामुळे सोशल मिडीयावर तिच्या लूकची चर्चा सुरु झाली आहे.  सावळ्या रंगाची न्यासा(Nysa Devgan) गोरी कशी झाली ही चर्चा सुरु होती, याला काजोलनच उत्तर दिलं असून लेकीचं कौतुकही तिनं  केलं आहे.  

बॉलिवूडमध्ये स्टार कीडमध्ये सध्या जान्हवी कपूर आणि सारा चर्चेत असतात.  त्यांच्यापाठोपाठ न्यासाही दिसण्यात वाहवा मिळवत आहे.  न्यासाच्या या बदलामागे तिची स्वतःची मेहनत असल्याचे काजोलनं सांगितलं आहे.  न्यासाचा(Nysa Devgan) बदललेला लूक बघून तिनं प्लॅस्टिक सर्जरी केली असावी असाही तर्क लढवला गेला. मात्र काजोलनं पुढे येत या सर्व शक्यता दूर करत न्यासाच्या(Nysa Devgan) खुललेल्या सौदर्याचे खरे कारण सांगितले आहे.  न्यासा सध्या आपल्या लूकबाबत अत्यंत जागरुक झाली आहे.  ती स्वतः सोशल मिडीयावर सक्रीय झाली आहे. आठवड्यातून किमान तीन वेळा ती चेह-याला आयुर्वेदीक मास्क लावते.  याशिवाय महत्त्वाचे म्हणजे वडील अजय देवगण यांच्याप्रमाणेच ती फिटनेसबाबत जागरुक आहे.  जिममध्ये वर्कआऊट करण्याबरोबर न्यासा योगावर अधिक भर देते.  न्यासा कोणत्याही दिवशी तिचा वर्कआउट चुकवत नाही, असेही काजोल सांगते.  

आत्तापर्यंत न्यासा लाइमलाइटपासून दूर होती.  मात्र गेल्या काही दिवसांमध्ये एका अनोळखी मुलासोबत हॉटेलमध्ये गेलेल्या न्यासाचे फोटो व्हायरल झाले.  सोबतच बॉलिवूड पार्ट्यांमध्ये शक्यतो न जाणारी न्यासा(Nysa Devgan) दिसू लागली.   यासर्वांत न्यासा आपल्या बदललेल्या लूकप्रमाणे अतिशय आत्मविश्वासात वावरत होती.  यावरुनच काजोल आणि अजय देवगण यांची ही मोठी लेक बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा सुरु झाली आहे.  

========

हे देखील वाचा : महाराज, चित्रपट आणि आपण!

========

अर्थात न्यासाच्या आधी सुहाना खान, खुशी कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर या स्टार कीडचीही बॉलिवडूमध्ये प्रस्थापित होण्यासाठी धडपड चालू आहे.  त्यांच्यामानानं न्यासा नवखी असली तरी तिची कौटुबिंक पार्श्वभूमी मात्र भक्कम आहे.न्यासाची आई काजोल ही बॉलिवूडमधली यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.  काजोलची आजी शोभना समर्थ या 80-90 दशकातील सौदर्यवती अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात असत.  काजोलच्या मुखर्जी कुटुंबाच्या अनेक पिढ्या बॉलिवूडमध्ये दबदबा ठेऊन आहेत.  काजोलचे वडील शोमू मुखर्जी बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक होते. तर आई तनुजा समर्थ प्रसिद्ध अभिनेत्री  आहेत. मुखर्जी कुटुंबाच्या तीन आणि समर्थ कुटुंबाच्या चार पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.   काजोलची धाकटी बहिण तनिषाही काही चित्रपटात दिसली.  बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये ती सहभागी झाली होती.   प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जीसुद्धा काजोलचे चुलत भाऊ आहेत.  अभिनेत्री राणी मुखर्जीसुद्धा काजोलची चुलत बहीण आहे.  राणीला एक भाऊ असून त्याचे नाव राजा मुखर्जी आहे.  काजोलचे काका अभिनेते जॉय मुखर्जी यांची तिन्ही मुले बॉलिवूडपासून लांब राहिली.  नूतन यांच्याव्यतिरिक्त काजोलची आणखी एक मावशी आहे.  त्यांचे नाव चतुरा असून त्यादेखील चित्रपटांकडे वळल्या नाहीत.   काजोल लग्न करुन देवगण कुटुंबात आली.  अजयचे वडील स्टंट दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते.  तर अजयची आई वीणा यांनी चित्रपटांची निर्मिती केली आहे.  अजयचे भाऊ अनिल देवगण हे दिग्दर्शक आहेत.  जीत, जान, इतिहास, प्यार तो होना ही था या सिनेमांचे अनिल सहायक दिग्दर्शक होते.  तर राजू चाचा, ब्लॅकमेल  या सिनेमांचे ते दिग्दर्शक होते. 

आता या देवगण आणि मुखर्जी घराण्यातील अभिनयाचा वारसा घेऊन अजय-काजोलची लेक न्यासा(Nysa Devgan) बॉलिवूडमध्ये एन्ट्रीसाठी सज्ज झाली आहे.  ती त्यांच्या घरच्या देवगण प्रोडक्शनमधून फिल्मी दुनियेत येणार की तिच्यासाठीही दिग्दर्शक करण जोहर काही खास प्रोजेक्ट करणार याचीच उत्सुकता आहे.  

सई बने

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.