जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

Kantara Chapter 1 : ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’चं पोस्टर रिलीज; रुद्रावताराने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष!
बॉलिवूड चित्रपटांच्या गर्दीत सध्या प्रेक्षकांना साऊथ इंडियन चित्रपटांची चटक लागली आहे… कन्नड, तमिळ, तेलुगु भाषांमधील राजकीय किंवा थ्रिलर चित्रपट, सीरीज पाहण्याकडे प्रेक्षकांचा अधिक कल दिसून येतो… अशातच ३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘कांतारा’ चित्रपटाने तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं… ऋषभ शेट्टी याचं दिग्दर्शन असणारा हा कन्नड चित्रपट जरी केवळ त्यांच्या ग्रानीण संस्कृतीवर आधारित असला तरी तो प्रत्येक भारतीयाच्या मनाला भिडला… आता ३ वर्षांनी कांताराचा प्रीक्वेल येणार असून नुकतंच ‘कांतारा:चॅप्टर १’ (Kantara Chapter 1 Movie) चं पोस्टर रिलीज झालं आहे…

‘कांतारा’ चित्रटाने कन्नड चित्रपटसृष्टीला आणि ऋषभ शेट्टीला (Rishabh Shetty) जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली… इतकंच नाही तर २०२२ मध्ये आलेला हा चित्रपट कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता… आणि आता बऱ्याच काळापासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहात होते त्या ‘कांतारा:चॅप्टर १’ चा पोस्टर रिलीज झाला असून यात ऋषभचा रुद्द अवतार दिसतोय…(Kannada Films)

‘कांतारा:चॅप्टर १’च्या पोस्टरमध्ये ऋषभ शेट्टी धगधगत्या आगीत, एका हातात कुऱ्हाड आणि दुसऱ्या हातात कवच घेऊन युद्ध करताना दिसतोय. चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,”जिथे योद्धे जन्म घेतात आणि जिथे जंगलातील प्राणी गर्जना करतात.”(Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Ramayana Movie : ७ ऑस्कर पुरस्कार जिंकणारे नमित मल्होत्रा आहेत तरी कोण?
=================================
दरम्यान, इतका पावरफुल पोस्टर पाहिल्यानंतर ‘कांतारा:चॅप्टर १’ रिलीज कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागंल आहे… मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कांतारा चित्रपटाचं कथानकपंजुरली आणि गुलिगा या देवतांच्या उत्पत्तीवर आणि त्यांच्या परस्पर संबंधांवर आधारित असणार आहे. आता ऋषभ शेट्टीचा आणखी एक वेगळा अवतार पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढलेली दिसत आहे…(Entertainment Tadaka)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi