Rohini Hattangadi : ‘गांधी’ चित्रपटातील कस्तुरबा गांधी ही भूमिका कशी

Dhadak 2 संदर्भात करण जोहरची मोठी घोषणा,जान्हवी आणि ईशानच्या जागी दिसणार ‘ही’ जोडी
दिग्दर्शक करण जोहरच्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते, त्याचे सर्वच चित्रपट हृदयस्पर्शी चित्रपटांपैकी एक आहे आणि ते पाहून तुमचे डोळे कधी भरून येतील, हे तुम्हालाही कळणार नाही. करण जोहरने नुकतीच आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे, दिग्दर्शक करण जोहरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या पुढच्या चित्रपटाची माहिती दिली आहे, तसेच चित्रपट स्टार्स आणि कथेबद्दलही त्याने सांगितले आहे. करण जोहरच्या या अपडेटमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे, तर चला जाणून घेऊया त्याने पोस्टमध्ये नेमके काय सांगितले आहे आणि चित्रपटाची कथा कशी असणार आहे.(Dhadak 2 Announcement)

करण जोहरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याचा पुढचा चित्रपट ‘धडक २‘ असेल, जो २२ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शाजिया इक्बाल यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. ‘धडक २‘ हा चित्रपट बनवण्यास नकार दिल्यानंतर बरोबर 1 वर्षानंतर करण जोहरने ही घोषणा केली आहे. त्याने पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, त्याची प्रॉडक्शन कंपनी धर्मा प्रॉडक्शन ‘धडक २’ बनवत आहे.

करण जोहरने इन्स्टाग्रामवर ‘धडक २’ बद्दल एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात चित्रपट कलाकार सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी एकमेकांच्या गळ्यात हात टाकून उभे असलेले दिसत आहेत. त्याचवेळी अभिनेता व्हॉइस ओव्हरमध्ये म्हणतो, ‘तू ज्या पद्धतीचे स्वप्न पाहत आहेस, त्यात माझ्यासाठी जागा नाही.’त्यावर तृप्ती त्याला म्हणते, ‘मग मला सांग निलेश, मी माझ्या भावनांचं काय करायला हवं?'(Dhadak 2 Announcement)
=============================
=============================
करण जोहरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘यह कहानी है थोड़ी अलग क्यूंकि एक था राजा, एक थी रानी – जात अलग थी…ख़तम कहानी. गेल्या वर्षी जेव्हा सिद्धांत आणि तृप्तीसोबत ‘धडक २‘ या चित्रपटाची बातमी समोर आली होती, तेव्हा करण जोहरने त्याचा स्वीकार केली नव्हता . त्याने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत धर्मा प्रॉडक्शन ‘धडक २’ नावाचा कोणताही चित्रपट बनवत नसल्याचे सांगितले होते.आणि आता अशी पोस्ट केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.