IIFA Awards 2025 :‘अमर सिंह चमकिला’ ‘पंचायत ३’ने गाजवला सोहळा!

Kareena Kapoor ने 18 वर्षांनंतर Shahid Kapoor ला मारली मिठी; व्हिडीओ झाला व्हायरल
Kareena Kapoor आणि शाहिद कपूर शनिवारी जयपूरमध्ये बऱ्याच वर्षांनी एका कार्यक्रमात एकत्र पहायला मिळाले. एवढेच नाही तर दोघांनी एकमेकांना मिठी ही मारली आणि ते पाहुन आजूबाजूचे लोक बघतच बसले. करिना आणि शाहिदला एकत्र इतके खुश पाहून सगळेच खूश झाले होते. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कारांसाठी राजस्थानमधील जयपूरमध्ये अनेक जण जमले आहेत. आयफामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक स्टार्स ही तिथे दाखल झाले आहेत. आयफा हा चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो.(Shahid Kareena viral video)

आयफा २०२५ मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात शाहिद कपूर आणि करिना एकत्र दिसत आहेत. त्यामुळे आयफा 2025 पुरस्कारांमध्ये असे काही तरी दिसले आले आहे ज्याची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध एक्स कपल शाहिद कपूर आणि करिना कपूर यांची भेट आयफामध्ये झाली होती. येथे या एक्स कपलने एकमेकांना मनापासून मिठी मारली आणि बराच वेळ गप्पा मारताना दिसले. या जोडीला एकत्र पाहिल्यानंतर चाहते या जोडीला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये करण जोहर आणि कार्तिक आर्यन ही बॅकग्राऊंडमध्ये उभे असल्याचे दिसत आहे. शाहिदला मिठी मारल्यानंतर करिना असं काही म्हणते की कार्तिक ही हसू लागतो. बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांनी असा काही पाहिला नाही आणि त्यामुळे ते पाहून ते खूप खूश झाले आहेत आणि व्हिडिओवर उत्स्फुर्त प्रतिक्रिया ही देत आहेत.(Shahid Kareena viral video)
================================
================================
व्हायरल व्हिडिओमध्ये करीना आणि शाहिद अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटिझन्स म्हणत आहेत की, शाहिद हा खूपच वेगळा दिसत आहे, परंतु करिना कपूर व्हिडिओमध्ये खूप एक्साइटेड दिसत आहे. ‘जब वी मेट’ या सिनेमाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच हे जोडपे विभक्त झाले होते. काही वर्षांनी करीनाने अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. तसेच शाहिद कपूरने मीरा राजपूत सोबत लग्न केले असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.