Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

करीना कपूरच्या ‘द बकिंघम मर्डर्स’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर

 करीना कपूरच्या ‘द बकिंघम मर्डर्स’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर
मिक्स मसाला

करीना कपूरच्या ‘द बकिंघम मर्डर्स’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर

by Jyotsna Kulkarni 03/07/2024

बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर ही नेहमीच तिच्या अभिनयाने, तिच्या सौंदर्याने, तिच्या व्यक्तिमत्वाने सगळ्यांनाच आकर्षित करत असते. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून तिने आतापर्यंत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मागील दोन दशकांहून अधिक काळ ती बॉलिवूडवर राज्य करत आहे. आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सतत लाइमलाईट्मधे राहणारी करीना कपूर लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (The Buckingham Murders)

‘क्रू’ या सिनेमात झळकल्यानंतर करीनाच्या फॅन्सला तिच्या आगामी सिनेमाची खूपच उत्सुकता लागली होती. क्रू सिनेमातील तिच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले. आता लवकरच ती ‘द बकिंघम मर्डर्स’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या सिनेमाची सर्वत्र खूपच चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या नावावरूनच हा सिनेमा एका मर्डर कथेवर आधारित असल्याचे लक्षात येत आहे. (The Buckingham Murders)

The Buckingham Murders Release Date Announced

‘द बकिंघम मर्डर्स’ या सिनेमाची मागील वर्षापासूनच चर्चा आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२३ साली ‘द बकिंघम मर्डर्स’ या सिनेमाचा ‘बीएफआय लंडन’ या फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमियर झाला होता. या फेस्टिवलमध्ये चित्रपटाला भरपूर प्रशंसा मिळाली आणि करीनाच्या भूमिकेचे, अभिनयाचे खूप कौतुक देखील झाले होते. तेव्हा पासूनच ‘द बकिंघम मर्डर्स’ या चित्रपटाबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती.

हंसल मेहता दिग्दर्शित ‘द बकिंघम मर्डर्स’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना बालाजी मोशन पिक्चर्स यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “आम्हाला ‘द बकिंघम मर्डर्स’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना खूपच आनंद आणि उत्सुकता जाणवत आहे. हा सिनेमा येत्या १३ सप्टेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.” या पोस्टसोबतच करीना कपूरचे एक पोस्टर देखील सोबत शेअर केले गेले आहे. (The Buckingham Murders)

The Buckingham Murders Release Date Announced

करीना कपूरचे शेअर करण्यात आलेले पोस्टर खूपच बोलके आणि आकर्षक आहे. ‘द बकिंघम मर्डर्स’ या सिनेमात बेबो एका गुप्तहेरांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या पात्राचे नाव असेल भामरा. आता ती नक्की या सिनेमात कोणते कोडे सोडवणार आणि कसे ते सिनेमा पाहिल्यानंतर समजेलच. तत्पूर्वी आधी सांगितले जात होते की, हा सिनेमा आधी ओटीटीवर प्रदर्शित केला जाईल, मात्र आता मिळणारी माहिती हा सिनेमात चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार असे सांगत आहे. लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झाल्यानंतर ‘द बकिंघम मर्डर्स’ या सिनेमाची २०२३ मध्ये संपन्न झालेल्या मुंबई फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रिनींग देखील झाली होती. (The Buckingham Murders)

=================

हे देखील वाचा : https://kalakrutimedia.com/most-awaited-mirzapur-season-3-release-date-out-marathi-info/

=================

या सिनेमाचे खास वैशिट्य म्हणजे ‘द बकिंघम मर्डर्स’ चित्रपटाच्या निमित्ताने करीना निर्माती म्हणून तिचे पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची ती सह-निर्माती आहे. तिने शोभा कपूर, एकता कपूर यांच्यासोबत मिळून बालाजी टेलीफिल्म्स आणि टीबीएम फिल्म्स ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दरम्यान या सिनेमात करिनासोबत ऐश टंडन, रणवीर बराड़ आणि कीथ एलन आदी दमदार कलाकार अभिनय करताना दिसणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: 'द बकिंघम मर्डर्स' 'द बकिंघम मर्डर्स' चित्रपट 'द बकिंघम मर्डर्स' प्रदर्शन Bollywood Celebrity hansal mehta kareena kapoor The Buckingham Murders The Buckingham Murders release date करीना कपूर खान
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.