Big Budget Films : आगामी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची यादी!

Kareena Kapoor : बेबोला करायचं होतं ‘या’ राजकीय नेत्याला डेट!
किती अभिनेत्री आल्या आणि किती गेल्या तरी कपूर कुटुंबातील करिश्मा (Karishma Kapoor) आणि करिना (Kareena Kapoor) लोकांचे लक्ष वेधून घेणारचं… बेबो अर्थात करिना कपूर हिने सर्वच सुपरहिट चित्रपट जरी दिले नसले तरी तिची स्टाईल आणि अभिनय कायमच प्रेक्षकांना भावला…गेल्या अनेक दिवसांपूासून चर्चेत आहे… आधी घरात चोरी, सैफ अली खानवर 9Saif Ali Khan) झालेल्या हल्ल्यामुळे आणि त्यानंतर आयफा पुरस्कारावेळी तब्बल १८ वर्षांनंतर एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूर आणि करिनामध्ये झालेला संवाद सगळ्याच न्यूज चॅनलवर ब्रेकिंग न्यूज होती…खरं तर बॉलिवूडची गॉसिप क्वीन म्हणून ओळख असणाऱ्या करिनाचं शाहिदबरोबर (Shahid Kapoor) ब्रेकअप झाल्यानंतर सैफ सोबत सूर जुळले आणि दोघांनी शाही लग्न देखील केलं.. पण तुम्हाला माहित आहे का एका राजकीय नेत्यालाही करिनाला डेट करायचं होतं.. कोण होता तो? जाणून घेऊयात… (Bollywood gossip)
२००० मध्ये करिनाचा बॉलिवूडमधील ‘रेफ्युजी’ (Refugee) हा पहिला चित्रपट आला होता आणि याच निमित्ताने सिमी गरेवालने तिची मुलाखत घेतली होती.. यावेळी सिमीने जगातील एका पुरुषासोबत तुला डेटला जायची संधी मिळाली तर तो कोण असेल? असं विचारलं असता करिना म्हणाली होती, “मला राहूल गांधींना (Rahul Gandhi) डेट करायला आवडेल… मी त्यांचे फोटो पाहात राहत आणि ते पाहून त्यांना जाणून गेणं मनोरंजक असेल, मला त्यांना जाणून घ्यायला आवडेल… कारण जसं चित्रपटांचा माझ्या घरातून मला वारसा मिळाला आहे तसा राजकारणाचा वारसा राहूल गांधींना त्यांच्या घरातून मिळाला आहे… त्यामुळे दोन वेगवेगळ्या घराणेशाहीतून आलेल्या आम्हा दोघांचं संभाषण काय असेल हा विचार करता मला राहूल गांधीसोबत डेटला जायला आवडेल….” (Bollywood masala)

अर्थात त्यानंतर पुढे काही झालं नाही तो भाग वेगळा पण करिनाच्या (Kareena Kapoor) या उत्तराने गॉसिप क्वीनबद्दलच इंडस्ट्रीमध्ये गॉसिप नक्कीच झालं… पण त्यानंतर २००४ मध्ये शाहिद कपूर आणि करिनाचा ‘फिदा’ चित्रपट आला आणि दोघेही एकमेकांवर फिदा झाले… या दोघांच्या रिलेशनची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हार्ड कोअर पंजाबी गर्ल चक्क बॉयफ्रेंड शाहिदसाठी मांसाहार सोडून शाकाहारी झाली.. ‘कॉफी विथ करण’च्या (Coffee With Karan) फार जुन्या एपिसोड्समध्ये तिने याची कबूली दिली होती..
===========================
हे देखील वाचा: Kapoor Family : कपूर कुटुंबाच्या निळ्या डोळ्यांचं रहस्य काय आहे?
===========================
शाहिद-करिनाची जोडी त्यावेळी कायमच चर्चेत असायची… पण २००७ मध्ये त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांनी आपल्या वेगळ्या वाटा निवडल्या.. करिना सैफसोबत सध्या सुखाचा संसार करतेय तर शाहिद मीरासोबत आपलं आयुष्य जगत आहे.. (Entertainment news)

करिनाच्या आगामी प्रोजक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती ‘दायरा’ या चित्रपटात दिसणार असून सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे.. याशिवाय ‘टॉक्सिक’ या चित्रपटात पुन्हा एकदा कियारा अडवाणी (Kiara Advani) सोबत करिना काम करणार असून यात केजीएफ फेम यश देखील त्यांच्यासोबत झळकणार आहे.. आगामी वर्ष करिनाकडून वेगवेगळ्या भूमिका जरी देणारं असलं तरी आजही प्रेक्षकांना ‘जब वी मेट’ (Jab We Met) मधील ‘गीत’च अधिक आवडते आणि आठवते यात शंका नाही…
रसिका-शिंदे-पॉल