Big Budget Films : आगामी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची यादी!

Karisma Kapoor : बबिता कपूरमुळे करिश्मा कपूरच्या पायाला झालेली दुखापत?
हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर कुटुंबाची मोठी मुलगी करिश्मा कपूर (Karishma Kapoor) हिने आपल्या नृत्य, अभिनय आणि सौंदर्याने इंडस्ट्रीमध्ये आपलं अनोख स्थान निर्माण केलं. अनेक दिग्गज कलाकारांनी करिश्माने कौतुक करत ती कपूर कुटुंबातील मुलगी असूनही तिने कधीच मोठेपणाचा बडेजाव दाखवला नाही. प्रत्येक चित्रपटासाठी तिने मेहनत केली. आजवर तिने तिच्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केले. तिची प्रत्येक गाणी सुपरहिट ठरली.
गोविंदा (Govinda) आणि करिश्मावर चित्रित झालेल्या ‘गोऱीया चुरा ना मेरा जिया’ या गाण्याचा खास किस्सा नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य (Ganesh Acharya) यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला. महत्वाचं म्हणजे या गाण्याच्या शुटवेळी आई बबितामुळे (Babita Kapoor) करिश्मा यांच्या पायाला दुखापत झाली होती. वाचा हा खास किस्सा… (Bollywood classic hits)

हिंदी चित्रपटसृष्टीतील ९०च्या दशकातील करिश्मा टॉपची अभिनेत्री होती. तिने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दित अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अभिनयासोबत करिश्मा (Karishma Kapoor) एक उत्तम डान्सर होती. गोविंदा आणि करिश्माच्या जोडीने संगीतप्रेमींसाठी लिस्टच दिली आहे. त्यापैकी एक गाणं म्हणजे ‘गोरीया चुरा ना मेरा जिया’. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करत होते गणेश आचार्य. त्यांनी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं,या गाण्याच्या शूटिंगदरम्यान करिश्माची आई बबिता कपूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.(Bollywood gossip)

कुली नं १ मधील या गाण्यात एक गुडघ्याची मुव्हमेंट होती जी करिश्माने करावी यासाठी तिची आी बबिता कपूर यांनी तिला पुश केलं होतं. सुरुवातीला ती गुडघ्यांवर मुव्हनेंट करणारी स्टेप फक्त गोविंदासाठी होती. तो सीन गोविंदा एकट्याने करणार होता, पण बबिताजींनी त्यात हस्तक्षेप केला आणि म्हटले, ‘तो हे एकटा का करतोय?”, त्यावर मी त्यांनासमजावून सांगितलं की, ‘करिश्माने शॉर्ट्स घातले आहेत, ही गुडघ्याची मुव्हमेंट आहे.’ तेव्हा त्या जोरात बोलल्या, ‘ती ते करेल. तिला दाखवा, तिला ते करायला लावा.'” दुर्दैवाने, डान्सच्या त्या मुव्हमेंटमुळे करिश्माच्या गुडघ्यांना दुखापत झाली होती.
===========================
हे देखील वाचा: Dulhan Hum Le Jayenge चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण
===========================
शूटिंग दरम्यान तिच्या गुडघ्यांना जखम झाल्याचं सांगत आचार्य पुढे म्हणाले की “मी इतका घाबरलो होतो की मी माझ्या असिस्टंटला स्टेप्स दाखवण्यास सांगितले आणि बिचारी करिश्मा ती करायला नकार देऊ शकली नाही. तिने तेच शॉर्ट्स घालून केले आणि गाणे संपल्यानंतर, तुम्ही पाहू शकता की तिच्या गुडघ्यांना जखमा झाल्या होत्या. गोविंदाजींच्या गुडघ्यांवर पॅड होते, पण करिश्माकडे कोणतीही सेफ्टी नव्हती.” ते पुढे म्हणाले, “म्हणूनच करिश्मा कपूर आज जी आहे ती आहे. तिने अविश्वसनीय मेहनत केली आणि तिची आई बबिताजींनी तिच्या आणि करीनाच्या कारकिर्दीत मोठी भूमिका बजावली.”

करिश्मा आणि गोविंदा यांनी एकत्रित ‘राजा बाबू’, ‘हिरो नं १’, ‘हसिना मान जायेगी,’ ‘साजन चले ससुराल’, ‘शिकारी’, ‘दुलारा’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. इतकंच नाही तर या चित्रपटतील प्प्रत्येक गाणी सुपरहिट झाली आहेत.
रसिका शिंदे-पॉल