Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Kaun Banega Crorepati 17 Ishit Bhatt: दहा वर्षांच्या इशित भट्टनं अखेर मागितली माफी, म्हणाला…
‘कौन बनेगा करोडपती 17 ज्युनियर’ मध्ये नुकताच दिसलेला दहा वर्षांचा इशित भट्टचा वागणं सर्वांनाच धक्का देऊन गेला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून त्याने दाखवलेले उद्धट व उर्मट वागणं अनेकांना खटकलं. त्याच्या वागण्यावरून त्याचे संस्कार आणि वर्तन याबद्दल साऱ्यांनी चिंता व्यक्त केली. अशा परिस्थितीत, इशितने आता एक व्हिडीओ शेअर करत अमिताभ बच्चन यांच्याकडून माफी मागितली आहे. त्याने म्हटले की, हॉटसीटवर बसल्यानंतर जो वागणूक त्याने दाखवली, त्याबद्दल त्याला पश्चाताप आहे. इशित भट्टनं ‘कौन बनेगा करोडपती 17 ज्युनियर’ मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाबद्दल सार्वजनिकपणे माफी मागितली आहे. इशितने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, त्याला त्याच्या वागण्याबद्दल खूप पश्चात्ताप आहे आणि त्याचं उद्दिष्ट कोणत्याही प्रकारे बिग बींचं अपमान करणे नव्हतं. इशितने आपल्या वागण्या मागे काय कारण होतं हे देखील स्पष्ट केलं आहे.(Kaun Banega Crorepati 17 Ishit Bhatt)

इशित, जो गुजरातच्या गांधीनगर येथील रहिवाशी आहे, अलिकडेच ‘केबीसी’च्या हॉट सीटवर बसला होता. त्याच्या खेळण्याच्या किमान भागापेक्षा, त्याच्या असभ्य व वादग्रस्त वागणुकीमुळे तो जास्त चर्चेत आला. हॉट सीटवर बसल्यावर, अमिताभ बच्चन यांच्याशी तो जो पद्धतीने बोलत होता, त्यावर लोकांनी त्याला चांगलीच तिखट टीका केली होती. पण, आता इशितने हे कबूल करत त्याच्यावर आलेली टीका स्वीकारली असून, त्याच्या वागण्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘कौन बनेगा करोडपती 17 ज्युनियर’मध्ये इशित भट्टच्या वागण्याने सर्वांचा आश्चर्यचकित केलंच. हॉट सीटवर बसल्यानंतर त्याचं उर्मट आणि उद्धट वागणं नेहमीच चर्चेचा विषय बनलं. इशित संपूर्ण वेळ संयम गमावल्यासारखा वागत होता. जेव्हा अमिताभ बच्चन प्रश्न विचारायचे, तेव्हा इशित त्यांना उत्तर देण्यापूर्वीच पर्याय निवडून, उद्धटपणे उत्तर लॉक करण्याची मागणी करायचा.
===============================
===============================
अमिताभ बच्चन जेव्हा खेळाचे नियम समजावून सांगायला सुरुवात करत, तेव्हा इशित त्यांना थांबवून, “मला नियम समजावून सांगण्याची तसदी घेऊ नका, मला ते सर्व माहीत आहेत,” असं म्हणायचा. या प्रकारच्या वागण्यामुळे, त्याला टीकेचा सामना करावा लागला आणि लोकांनी त्याच्या संस्कारांबद्दल प्रश्न उपस्थित केले. इशित भट्टच्या असभ्य वागण्यामुळे त्याला आणि त्याच्या पालकांना सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला. नेटकऱ्यांनी त्याच्यावर ताशेरे ओढलेच, पण त्याचबरोबर त्याच्या पालकांच्या संस्कारांवरही प्रश्न उपस्थित केले. काही सेलिब्रिटींनी इशितला खरं तर जोरदार फटकारलं, आणि त्याच्या वागणुकीला अत्यंत निंदा केली.

या सर्व वादावर इशित भट्ट आता व्यक्त झाला असून , त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करून अमिताभ बच्चन यांच्याकडून सार्वजनिकपणे माफी मागितली आहे. इशितने व्हिडीओमध्ये म्हटलं की, त्याचं उद्दिष्ट कधीच बिग बींचं अपमान करणे नव्हते आणि त्याच्या वागण्याबद्दल त्याला पश्चात्ताप आहे. इशित भट्टने ‘कौन बनेगा करोडपती 17 ज्युनियर’च्या एका एपिसोडमधील अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा व्हिडीओ शेअर करत, त्याच्या वागण्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, (Kaun Banega Crorepati 17 Ishit Bhatt)
================================
हे देखील वाचा: Tharal Tar Mag Serial: पूर्णा आजी परत येणार; ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार भूमिका…
================================
“सर्वांना नमस्कार, ‘कौन बनेगा करोडपती’मधील माझ्या वागण्याबद्दल मी मनापासून माफी मागू इच्छितो. मला माहीत आहे की, माझ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे अनेक लोक दुखावले गेले, नाराज झाले आणि त्यांचा अपमान झाला, आणि मला त्याचा खूप पश्चात्ताप झाला आहे. मी त्या वेळी घाबरलो होतो आणि माझा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा होता… माझा असभ्य वागण्याचा हेतू नव्हता… मला अमिताभ बच्चन सर आणि संपूर्ण ‘केबीसी’ टीमबद्दल खूप आदर आहे…”शब्द आणि कृती, आपलं व्यक्तिमत्व कसं प्रतिबिंबित करतात, याबद्दल मी एक मोठा धडा शिकलोय, विशेषतः इतक्या मोठ्या व्यासपीठावर… मी भविष्यात आणखी विनम्र, आदरयुक्त आणि विचारशील राहण्याचं वचन देतो. ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि या चुकीतून मला शिकण्याची परवानगी दिली त्या सर्वांचे आभार…” इशितने आपल्या वागणुकीबद्दल खूपच संवेदनशीलतेने आणि कृतज्ञतेने दिलगिरी व्यक्त केली आहे. यामुळे त्याच्या फॉलोवर्स आणि नेटकऱ्यांमध्ये एक चांगली भावना निर्माण होण्याची शक्यता आहे.