“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

Special Ops 2 सीरीजचा ट्रेलर रिलीज, हिंमत सिंग नव्या मिशनवर असणार!
अभिनेते के.के. मेनन (Kay Kay Menon) यांची प्रमुख भूमिका असणारी वेब सीरीज Specials Ops 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीरीजच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनात अधिक उत्कंठा वाढवली होती. स्पेशल रॉ एजंट्सचं आयुष्य, त्यांचे मिशन्स यांनी पुरेपुर भरलेलं कथानक परत एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. दरम्यान, नुकताच या सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून रिलीज डेट ही जाहिर करण्यात आली आहे.(Web Series News)

के के मेनन यांनी स्पेशल ओप्स वेब सीरीजमध्ये हिंमत सिंग ही भूमिका साकारली आहे.. दुसऱ्या भागात हिम्मत सिंगची लढाई खलनायक ताहिर राज भसीनशी होणार आहे. विशेष म्हणजे या भागात आता प्रकाश राज यांचीही एन्ट्री झाली आहे… आता या भागात हिम्मत सिंग आणि त्याची टीम सायबर हल्ले-दहशतवाद या सगळ्याचा सामना कसा करणार हे पाहण्याची उत्सुकता अधिक वाढली आहे. (Entertainment news update)
================================
हे देखील वाचा: Special Ops 2 : हिम्मत सिंग ‘स्पेशल ऑप्स सीझन २’मध्ये कुणाशी भिडणार?
=================================
Raw च्या मुख्यालयात पुन्हा एकदा सर्व अधिकारी एका मिशनसाठी सज्ज होताना दिसणार आहेत. सीरीजच्या दुसऱ्या भागाची झलक शेअर करण्यात आली असून यात हिम्मत सिंग त्याच्या सर्व साथीदारांना घेऊन पुन्हा एकदा मिशन लीड करतोय. विनय पाठक, सय्यामी खेर हे हिम्मत सिंगचे सहकारी विविध ठिकाणी शत्रूंना नेस्तनाबूत करताना दिसत आहेत. जिओ हॉटस्टारवर ११ जूलै २०२५ रोजी रिलीज होणाऱ्या स्पेशल ओप्स २ सीरीजमध्ये के.के मेनन यांच्यासह विनय पाठक, सय्यामी खेर, ताहिरराज भासीन, दलीप ताहिल, गौतमी कपूर हे कलाकारही दिसणार आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi