Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार शिंदे काय म्हणाले?

 Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार शिंदे काय म्हणाले?
मिक्स मसाला

Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार शिंदे काय म्हणाले?

by रसिका शिंदे-पॉल 04/08/2025

मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण याला दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी ‘झापुक झुपूक’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी दिली… महाराष्ट्रातील लाखो-करोडो लोकांचं रिल्सच्या माध्यमातून मनोरंजन करणारा सूरज चव्हाण चित्रपटसृष्टीत झळकला… खरं तर, सूरज चव्हाण याला प्रेक्षकांसहित बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्याने सॉफ्ट कॉर्नर दिला पण चित्रपटाच्या बाबतीत प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद काही मिळाला नाही आणि त्याचा ‘झापुक झुपूक’ फ्लॉप ठरला… यावर आता स्वत: दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया देत, “माझ्या विचारांमध्येच खोट असेल आणि सूरजला अभिनेता म्हणून लोकांना बघायचंच नसेल”, असं विधान त्यांनी केलं आहे… नेमकं ते काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात…(Marathi Entertainment News)

तर, मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वात सूरजला (Suraj Chavan) त्याचा फॅन फॉलोईंगचा प्रचंड फायदा झाला… मात्र, त्याच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटावेळी कदाचित त्याच फॅन्सने त्याच्याकडे पाठ फिरवली असं चित्र काहीसं दिसून आलं… जेव्हा खरं तर केदार शिंदे यांनी सूरज सोबत चित्रपट करणार असं बिग बॉसच्या मंचावर जाहिर केलं होतं तेव्हाच हा चित्रपट सुपरहिट जाणार असं सगळ्यांनाच वाटलं होतं… पण झालं त्याच्या उलटंच… ‘मुक्कामपोस्ट मनोरंजनला’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान चित्रपटाच्या अपयशाबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले की, “मला वाटतंय कदाचित माझ्या विचारांतच काहीतरी खोट असेल, सिनेमा लोकांनी पाहिलाच नाही… त्यांना सूरज चव्हाणला अभिनेता म्हणून बघायचाच नसेल… त्यांनी ती गोष्ट नाकारली…” (Marathi Movies)

================================

हे देखील वाचा: Suraj Chavan : “गावातल्या मुलाला स्वीकारणारच नाही का?”; केदार शिंदेंचा ट्रोलर्सला थेट प्रश्न

=================================

पुढे केदार असं म्हणाले की, “मूल जन्माला घातल्यानंतर दहा दिवसांनी समजतं की, त्याचा मृत्यू झालाय… तेव्हा जे दु:ख होतं, तेच दु:ख आपल्या एखाद्या कलाकृतीचं अपयश एका दिग्दर्शकाला पाहून होतं… ते दहा दिवस अत्यंत त्रासदायक असतात… जर ते नसेल तर मग आपण सृजनशील कलावतं नाहीत आहोत, आपल्याला त्याचं दु:ख व्हायलाच पाहिजे… पण, मी असा विचार नाही करू शकत की, प्रेक्षकांना अक्कल नाही… उलट ज्यांनी मला नाकारलं, त्यांच्याकडेच कदाचित जास्त अक्कल आहे… आता त्यांच्या मनात मी माझं स्थान कसं निर्माण करणार, याचेच माझ्याकडून प्रयत्न सुरू आहेत. ज्या चुका आधी केल्यात त्या पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेतो… कारण, यशाचा कोणताच फॉर्म्युला नाही…”

आता दिग्दर्शकांनीच अपयश स्वीकारल्यानंतर पुढे कुणी काय प्रतिक्रिया देणार.. पण काही दिवसांपूर्वीच अभिनेते मिलिंद गवळी यांनी देखील सूरजचा चित्रपट फ्लॉप का झाला याचं कारण सांगितलं होतं… ‘टेली गप्पा’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मिलिंद गवळी म्हणाले की, “’झापुक झुपूक चित्रपट खूप चालला. चालला म्हणजे बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन आणि त्यामुळे तो चित्रपट चालला की नाही? हे आपण नको बघूयात. पण ‘झापुक झुपूक’ लोकांना माहीतच नाही असं नाही. जे १५०-२०० चित्रपट येतात, ते कधी आले आणि कधी निघून गेले हे कळतसुद्धा नाही. पण, ‘झापुक झुपूक’ कधी आला आणि कधी निघून गेला असं झालं नाही. सूरज चव्हाणने हा चित्रपट केला आणि तो महाराष्ट्रभरात रिलीज झाला हे अनेकांना माहीत आहे”. (Latest Entertainment News)

पुढे गवळी म्हणाले की, “चित्रपटांचा प्रेक्षक आणि रील्सचा प्रेक्षक वेगळा आहे. त्याच्या रील्सला लाईक्स आणि कमेंट करणारे प्रेक्षक वेगळे आहेत आणि ते प्रेक्षक त्याचा चित्रपट बघायला आले हा; अगदी नाहीच आले असं नाही. बऱ्याच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट हाऊसफुल्ल होता आणि अनेकांनी सूरजचं कौतुकही केलं. कथा ऐकल्यानंतर अनेकांना वाटलं की, सूरज यात अभिनय करू शकेल की नाही. कारण तो काही Trained अभिनेता नाही. पण, त्याच्याकडून काम करून घेतलं गेलं आणि हे असं काम होतं की सूरजचं अनेकांनी कौतुक केलं. मलासुद्धा त्याचं काम आवडलं”.

================================

हे देखील वाचा: ‘गुलीगत धोका’ फेम सूरज चव्हाण आहे तरी कोण?

=================================

सध्या मराठीच काय पण हिंदीतही सोशल मिडिया इनफ्ल्युएन्सर्सना चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळताना दिसतेय.. आता इथे खरं तर हा देखील प्रश्न उपस्थित होतो की मग NSD असो किंवा इतर इन्स्टिट्यूट्समधून अभिनयाचं शिक्षण घेणाऱ्या नवोदित कलाकरांना संधी मिळणार का..? पण जेव्हा आपण सूरज चव्हाणचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवू तेव्हा हे देखील लक्षात येईल की नवोदित कलाकारांना संधी जरी मिळाली तरी त्याचं सोनं करण्यासाठी थिएटर्सचे शो आणि प्रेक्षकही असावे लागतात…  दरम्यान, मराठीतील दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ मध्ये सूरज चव्हाणसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे अशी तगड्या कलाकारांची स्टारकास्ट होती. (Zhapuk Zhupuk Movie Cast)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News Entertainment kedar shinde kedar shinde films marathi big boss season 5 marathi movies Suraj Chavan zhapuk zhupuk movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.