Pooja Sawant संक्रांतीसाठी आतुर असलेल्या पूजा सावंतने पोस्ट केला हलव्याच्या
Actor Yash कन्नड मालिकांचा हिरो ते ग्लोबल स्टार; जाणून घ्या केजीएफ अभिनेता यशचा अभिनय प्रवास
आपल्या भारतामध्ये हिंदीसोबतच जवळपास सर्वच प्रादेशिक भाषांमध्ये भरपूर चित्रपट तयार होतात. आपल्याला हिंदी आणि आपल्या प्रादेशिक भाषेतील कलाकारच माहित असतात. मात्र इतरही भाषांमध्ये काम करणारे असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्यामध्ये भरभरून प्रतिभा आहे. जे आपल्या मेहनतीने आणि प्रयत्नांनी आज यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहचले असून, त्यांचे नाव संपूर्ण जग ओळखते. (Entertainment News)
असाच एक अभिनेता म्हणजे यश. KGF फेम अभिनेता यश (KGF fame Yash) हा मूळचा कर्नाटकचा. कन्नड भाषेमध्ये त्याने बरेच काम केले. मात्र त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती KGF या सिनेमामुळे. आधी फक्त कर्नाटक आणि कन्नड लोकांनाच माहित असलेल्या यशला या चित्रपटाने जागतिक ओळख मिळवून दिली. आज अभिनेता यश हे नाव कोणाला माहित नाही असे लोकं शोधूनही सापडणार नाही. (KGF fame Yash News)
हा KGF सुपरस्टार अभिनेता यश आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. यशचा जन्म ८ जानेवारी १९८६ रोजी कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. त्याचे वडील कर्नाटक राज्य परिवहन बस सेवेत बस चालक म्हणून कार्यरत आहेत. तर आई पुष्पा गृहिणी आहेत. यशला नंदिनी नावाची एक लहान बहीणही आहे. यशने म्हैसूर येथून त्याचे १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा सुरुवातीपासूनच अभिनयाकडे कल होता. (KGF fame Yash Birthday)
१२ वी झाल्यानंतर यशने अभिनयात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरच्यांना तयार केले. आणि वयाच्या १६ व्या वर्षी तो बेंगळुरु येथे आला. या नवीन शहरात आल्यानंतर यशने लोकप्रिय बिनाका थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने बरेच लहान मोठे प्रोजेक्टसमध्ये काम केले. (KGF fame Yash Struggle)
सुरुवातीच्या काळात यश जेव्हा अभिनयाच्या दुनियेत स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला बॅकग्राउंड डान्सर आणि असिस्टंट डायरेक्टर अशी छोटी-मोठी नोकरी करून जगावे लागत होते, त्यासाठी त्याला दिवसाला फक्त पन्नास रुपये मिळायचे. तो अनेक वर्षे टीव्ही अभिनेताही होता. (Tollywood News)
अखेर त्याच्या प्रयत्नांना आणि मेहनतीला यश आले आणि त्याला ‘नंद गोकुला’ (Nand Gokula) या कानडी मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याच मालिकेतून त्याने खऱ्या अर्थाने मनोरंजनविश्वात पाऊल टाकले. याशिवाय तो इतरही अनेक मालिकांमध्ये झळकला. मालिकांमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर यशने त्यांचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला. (Sandlwood News)
यशने २००८ साली आलेल्या मोग्गीना मनसू या चित्रपटामधून पदार्पण केले. त्यानंतर तो राजधानी, मिस्टर अँड मिसेस रामाचारी आणि किरतका आदी अनेक सिनेमांमध्ये झळकला. यशाचा २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर अॅन्ड मिसेस रामाचारी’ (Mr. and Mrs. Ramchari) या चित्रपटाने त्याला मोठी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. सोबतच त्याला ‘रॉकींग स्टार’ ही नवीन ओळख देखील दिली. यशाचा ‘गुगली’ हा चित्रपट कन्नड इन्डस्ट्रीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. (Entertainment mix masala)
यश अभिनय क्षेत्रात नवनवीन शिखरं पादाक्रांत करत असतानाच २०१८ साल उजाडले. हे वर्ष त्याच्यासाठी संपूर्ण जीवनाला आणि करियरला कलाटणी देणारे ठरले. यावर्षात त्यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘KGF‘ प्रदर्शित झाला आणि यश संपूर्ण जगात लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाला. या सिनेमातील त्यांचा अभिनय, त्यांचा लूक, त्याची स्टाईल, सर्वच कमालीचे गाजले. या चित्रपटाने जगभरात २५० कोटींचा गल्ला जमवला. (Box Office Collection)
‘KGF’ आणि ‘KGF2‘ या दोन चित्रपटांनी यशला अफाट न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता मिळवून दिली. मोठे यश मिळून देखील यशाचे पाय कायम जमिनीवर असतात. यामागे तो त्याच्या पालकांचे संस्कार असल्याचे सांगतो. यावर्षी यशचे काही सिनेमे प्रदर्शित होणार आहे. यात ब्लॉकबस्टर चित्रपट KGF चा तिसरा भाग ‘KGF 3‘, ‘टॉक्सिक’ या सिनेमांचा समावेश आहे. यासोबतच यश बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. (Ankahi Baatein)
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, यश हा नितेश तिवारी तयार करत असलेल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा आगामी ‘रामायण‘ या सिनेमात रावणाच्या भूमिकेत दिसू शकतो. या रामायणमध्ये यश केजीएफपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. याबाबत चर्चा सुरू केली आहे. (Yash Bollywood Debut)
यशला KGF साठी १५ कोटी रुपये फी मिळाली. त्याच वेळी, KGF 2 साठी त्याने ही फी दुप्पट दुप्पट करत ३० कोटी रुपये घेतले. शुल्क आकारले होते. तर आता ‘रामायण’ चित्रपटातील त्याच्या फीबद्दल मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार यशने १०० ते १५० कोटी रुपये फी ची मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे.
आज यश ग्लोबल स्टार झाला असून, तो कोट्यवधी रुपये कमावत आहे. मात्र असे असूनही आजही यशचे वडील अरुण कुमार KSRTC परिवहन सेवेत बस चालवण्याचे काम करतात. याच कामामुळेच ते यशला आणि त्यांच्या कुटुंबाला सांभाळू शकले. ते ही नोकरी कधीच सोडणार नाही. असे देखील ते नेहमी सांगतात.
यशाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्याने त्याची सह-अभिनेत्री असलेल्या राधिका पंडितशी (Radhika Pandit) लग्न केले आहे. या दोघांनी काही मालिका आणि चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न केले. (Yash and Radhika)
यश आणि राधिका यांचा साखरपुडा १२ ऑगस्ट २०१६ रोजी गोव्यात झाला होता. त्यानंतर ९ डिसेंबर २०१६ रोजी त्यांनी बंगळुरूमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. यशने त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी संपूर्ण कर्नाटकाला आमंत्रित केले होते. आता या जोडप्याला दोन मुले आहेत. यशने आज जे विश्व घडवले आहे, ते त्याच्या मेहनतीमुळेच निर्माण झाले आहे.
=========
हे देखील वाचा : Sagarika Ghatge राजघराण्यात जन्म, राष्ट्रीय हॉकीपटू, क्रिकेटरशी लग्न असा आहे सागरिका घाटगेचा प्रवास
=========
एका मोठ्या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, यशकडे ४० कोटींहून अधिक संपत्ती आहे. त्याच्याकडे तीन कोटींचा बंगलाही आहे. यश आता एनजीओ चालवतो. ही संस्था अनेक गरजू लोकांना मदत करते. लोकांना शुद्ध पाणी प्यावे यासाठी त्यांनी करोडो रुपये खर्चून तलाव बनवला आहे.