
Kiara Advani-Siddharth Malhotra यांनी जाहिर केलं लाडक्या लेकीचं नाव…
बॉलिवूडचं क्युट कपल सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचं आगमन झालं आहे… १५ जुलै २०२५ रोजी सिद्धार्थ-कियाराला कन्यारत्न प्राप्त झालं… तेव्हापासून तिची एक झलक दिसावी आणि तिचं नाव नेमकं कपलने काय ठेवलं आहे याची उस्तुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती… अशातच आता दोघांनी सोशल मिडियावर गोंडस परीची छोटीशी झलक दाखवत तिचं नाव जाहिर केलं आहे… (Bollywood Couple)

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी सोशल मिडियावर लेकीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे… या फोटोत दोघांनी त्यांच्या हातात लेकीचे पाय पकडले होते. आणि कॅप्शनमध्ये एका गोड नोट सह तिचे नाव जाहिर करत कॅप्शन लिहिलं आहे की, “आमच्या प्रार्थनेपासून ते आमच्या कुशीत… आम्हाला मिळालेला दैवी आशीर्वाद आमची राजकन्या, सरायाह मल्होत्रा Saraayah Malhotra”.. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव करत लेकीच्या नावाची प्रशंसा केली आहे…(Kiara-Siddharth Daughter Name)
================================
हे देखील वाचा : Don 3 : कियाराच्या जागी ‘ही’ अभिनेत्री दिसणार?; संजय लीला भन्साळींना केलं आहे असिस्ट
================================
दरम्यान, सिद्धार्थ आणि कियारा यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर दोघांनी एकत्र २०२१ मध्ये शेरशाह या चित्रपटात काम केलं होतं… तर, कियारा आई होण्यापूर्वी ‘वॉर २’ मध्ये दिसली होती… आणि सिद्धार्थ जान्हवी कपूरसोबत ‘परम सुंदरी’ चित्रपटात झळकला होता… लवकरच सिद्धार्थ ‘रेस ४’, ‘आँखे २’, ‘Vvan-Force of the forest’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे… तर कियारा ‘टॉक्सिक’ (Toxic: A Fairy Tale for Grown-Ups) चित्रपटात यश सोबत दिसणार आहे… खरं तर कियारा फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन ३’ (Don 3) मध्ये दिसणार होती, परंतु गरोदरपणामुळे तिने या चित्रपटातून माघार घेतली आहे… त्यामुळे आता रणवीर सिंग सोबत ‘डॉन ३’ मध्ये क्रिती सेनॉन किंवा शर्वरी वाघ दिसणार असं म्हटलं जात आहे… (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi