सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”

पहिल्यांदाच दिसली ‘किंग’ची झलक, Shah Rukh Khanचा लूक पाहून चाहते झाले थक्क!
वयाची पन्नाशी गाठली असली तरी आजही शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची क्रेझ तरुणाईत तितकीच आहे जितकी त्याच्या तरुणपणात होती… ‘डंकी’ चित्रपटानंतर शाहरुख खान त्याच्या आगामी किंग चित्रपटाची तयारी करत आहे… विशेष म्हणजे यात तो लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे… आणि आता याच ‘किंग’ (King Movie) चित्रपटाच्या शुटींगचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे…

‘किंग’ चित्रपटाचं शूट काही महिन्यांपासून सुरु आहे… काही दिवसांपूर्वी याच चित्रपटाच्या शूटवेळी शाहरुखला दुखापत झाली होती…मात्र, असं असूनही हाताला पट्टी बांधून शाहरुख मुलगा आर्यन खान याच्या सीरिजच्या ट्रेलर लाँचला हजर राहिला होता… आता वळूयात किंग चित्रपटाकडे… तर, सध्या व्हायरल झालेल्या फोटोवरुन असं सांगितलं जात आहे की, या चित्रपटाचं पोलंडमधील वारसॉ येथे शूट सुरु आहे… व्हायरल झालेल्या ‘किंग’च्या या फोटोत शाहरुखचा खूँखार लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Shah Rukh Khan movies)

दरम्यान, शाहरुख खानने ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ अशा ३ सलग सुपरहिट चित्रपटांमधून वर्ष गाजवलं. विशेष म्हणजे ३० वर्ष इंडस्ड्रीत काम केल्यानंतर त्याला ‘जवान’साठी यंदा राष्ट्रीय पुरस्कारही घोषित झाला आहे. त्यामुळे २०२५ हे वर्ष देखील शाहरुख खानसाठी खास असणार आहे… आता त्याच्या आगामी किंग चित्रपटासाठी चाहते उत्सुक असून २०२६ मध्ये चित्रपट रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे…(Deepika Padukone)
====================================
हे देखील वाचा : Munjya 2 मधून शर्वरी वाघ हिचा पत्ता पट?
====================================
किंग चित्रपटात शाहरुखची लाडकी लेक सुहाना पहिल्यांदाच ती वडिलांसोबत ऑनस्क्रीन काम करणार आहे. शाहरुख आणि सुहानासोबत या चित्रपटात जयदीप अहलावत, अभय वर्मा, अभिषेक बच्चनआणि दीपिका पादुकोणचा कॅमिओ असल्याची चर्चा आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi