
Kishore Kumar : ‘दुखी मन मेरे सुन मेरा कहना..’ या गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!
कधी कधी चित्रपटातील गाणे कोणी गायचे यावर वाद होतात भारतीय सिनेमाच्या गोल्डन इरा मध्ये तर असे काही किस्से घडले आहेत की अक्षरशः टॉस करून गाणे कोणी घ्यायचे यावर निर्णय घेतला गेला पण म्युझिक रूममध्ये संगीतकार हा बॉस असतो त्याचा निर्णय अंतिम असतो एकदा एका गाण्याच्या वेळी असाच वाद निर्माण झाला होता संगीतकार आला हे गाणे किशोर कुमार यांच्याकडून गाऊन हवे होते तरी इतर सर्वांना हे गाणे तलत मेहमूद यांनी गावे असे वाटत होते पण शेवटी संगीतकाराचाच शब्द फायनल ठरला आणि ते गाणे किशोर कुमार यांच्या स्वरात रेकॉर्ड झाले आज हे गाणे कट क्लासिक म्हणून लोकप्रिय आहेत शिवाय किशोर कुमारच्या टॉप टेन गाण्यां पैकी एक आहे कोणतं होतं ते गाणं आणि कोणता होता तो चित्रपट आणि संगीतकार सोडून इतरांना तलत चा स्वर का हवा होता खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे.
देव आनंद आणि किशोर कुमार यांच्यात खूप चांगले ट्यूनिंग आणि निरोगी नाते होते. खरंतर किशोर कुमार हे पन्नास च्या दशकात देव आनंदचा आवाज बनले आणि त्यांनी त्या काळात अनेक हिट गाणी दिली जी आज कल्ट क्लासिक मानली जातात. पण एका गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी जिथे देव आनंद यांनी किशोर कुमारला यांचा स्वर चक्क नाकारला होता! पण संगीतकार एस डी बर्मन आपल्या निर्णयावर ठाम होते त्यांनी रेकॉर्डिंग रूममध्ये सर्वांना कडक आदेश दिला, ‘जर तुम्हाला हे गाणे चित्रपटात हवे असेल तर ते फक्त किशोर कुमारनेच गायले पाहिजे, इतर कोणीही नाही.’

हा प्रसंग ‘फंटूश’ (१९५६) चित्रपटातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान घडला. चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन आनंद होते आणि चित्रपटाचे मुख्य कलाकार देव आनंद, शीला रमाणी आणि के एन सिंग हे होते. एस डी बर्मन चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते आणि गीतकार साहिर लुधियानवी होते. चित्रपटात एकूण आठ गाणी होती आणि एस डी बर्मन यांनी किशोर दा आणि आशा जी यांच्या कडून सर्व गाणी गाऊन घ्यायचे ठरवले होते. या चित्रपटात तीन सोलो गाणी पुरुष स्वरात होती त्यापैकी दोन गाणी किशोर कुमार यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आली तिसऱ्या गाण्याच्या वेळी मात्र वाद निर्माण झाला. हे गाणे किशोर कुमार यांनी गाऊ नये असे देव आनंद आणि इतर सर्व कृ मेंबर्सला वाटत होते. यामध्ये दिग्दर्शक चेतन आनंद यांचा देखील समावेश होता त्यांना हे गाणे तलत मेहमूद यांच्या स्वरात हवे होते पण देव आनंदने प्रत्येक वेळी विनंती केली तेव्हा बर्मन दादांनी त्यांना नकार दिला. गाणे होते ‘दुखी मन मेरे सुन मेरा कहना जहा नही चैना वहा नही रहना..
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!
=================================
एके दिवशी दुपारी मन्ना डे काही कामासाठी एका स्टुडिओमध्ये गेले होते. जिथे त्यांना चेतन आनंद, देव आनंद, किशोर कुमार आणि एसडी बर्मन एकत्र बसलेले आढळले, पण खोलीत शांतता होती. मन्ना डे यांना काहीतरी गडबड असल्याचे समजले आणि किशोर कुमार हळू हळू त्यांच्याकडे येत असल्याचे आढळले. मन्ना डे यांनी किशोर कुमार यांना या विषयावर विचारले. किशोर कुमार यांनी त्यांना सांगितले की, हे एका गाण्यामुळे झाले आहे. हे गाणे कुणी गावे यावर वाद चालू आहे. बर्मन दादा यांना हे गाणे माझ्याकडून गावून घ्यायचे आहे. परंतु इतर कोणालाही असे नको आहे. खरं तर, मला असेही वाटते की हे गाणे माझ्या प्रकृती चे नाही. मला वाटतं गोल्डन मीन म्हणजे जर तुम्ही कृपया गाणे गायले तर मी तुमचा आभारी राहीन आणि हा प्रश्न पण निकाली निघेल!” मन्ना डे एकही शब्द बोलू शकण्या पूर्वीच एसडी बर्मन मागून गर्जना करत म्हणाले, ‘मन्ना, तुम्ही किशोरचे काही ऐकू नका. त्यालाच हे गाणे म्हणायचे आहे, इतर कुणाला ही नाही’.
चेतन आनंदने बर्मन दादांकडे पाहिले आणि नम्रपणे विचारले, ‘दादा तुम्हाला या गाण्यात किशोर का हवा आहे? या चित्रपटात सर्व गाणी त्यानेच गायली आहेत. तलतला दुःखी गाणे म्हणू द्या. किशोरने कधीही दुःखी गाणी गायली नाहीत. तो उत्साही आणि रोमँटिक गाण्यांमध्ये खूप चांगला आहे’. देव आनंदला बोलण्याची संधी मिळाली आणि तो म्हणाला, ‘बर्मान दादा, तुम्ही एका गाण्यासाठी तलत मेहमूदला घेतले होते , तुम्हाला आठवते, जाये तो जाये कहाँ, त्याने किती सुंदर गाणे गायले होते?’ एस डी बर्मनने देव आनंदकडे पाहिले आणि उत्तर दिले, ‘तुम्हाला आठवते, किशोरने किती सुंदर गाणे गायले होते. मुनीमजी मधील ‘ जीवन के सफर में राही…. माझ्याशी वाद घालू नको देव. मला माहित आहे की मला काय करायचे आहे. जेव्हा तलत मेहमूदची आवश्यकता होती तेव्हा मी त्याला गाण्यास सांगितले. जेव्हा किशोरची आवश्यकता होती तेव्हा त्याला गाणे गायचे असते. आणि कृपया विसरू नका, ही सर्व गाणी मी कंपोज केली आहेत या माझ्या रचना आहेत. ही सर्व गाणी सुपरहिट होतील . किशोरचे हे गाणे दुखी मन मेरे सुन मेरा कहना तर इतिहास रचेल’. तुम्ही पहाल.! ही सर्व चर्चा ऐकत असलेले साहिर लुधियानवी मध्येच हस्तक्षेप करत देव आनंदला म्हणाले, ‘बर्मन दादांना निर्णय घेऊ द्या. त्यांचा निर्णय नेहमीच आपल्या सर्वांसाठी सर्वोत्तम राहिला आहे.’
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
बर्मन दादांनी किशोर कुमारला गाणे रेकॉर्ड करण्यासाठी थेट रेकॉर्डिंग रूममध्ये जाण्यास सांगितले. किशोर कुमार खोलीत प्रवेश करण्यापूर्वी, बर्मन दादांनी देव आनंदकडे पाहिले आणि म्हणाले, ‘मी किशोरला लक्षात ठेवून हे गाणे रचले आहे. किशोरशिवाय कोणीही या गाण्याला न्याय देऊ शकत नाही.’ किशोर कुमार ला देखील बर्मन दादांच्या शब्दांनी आत्मविश्वास आला. ते क्षणभर थांबले हसले आणि नंतर रेकॉर्डिंग सुरू केले. रेकॉर्डिंग संपल्यावर, कोणीही काही बोलण्यापूर्वी, देव आनंद आनंदाने बाहेर उडी मारून आला आणि त्याने किशोर कुमारला मिठी मारली. तो म्हणाला, ‘अरे किशोर, तू हे गाणे इतके उत्तम कसे गायलेस?’ त्यांच्या मागे असलेले एसडी बर्मन देव आनंदच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले की “जेव्हा मी गाण्यासाठी कोणाची निवड करतो तेव्हा; नेहमी लक्षात ठेवा की मी गाणी अशा प्रकारे रचतो जेणेकरून हे गाणे फक्त एका विशिष्ट गायकाला शोभेल आणि इतर कोणालाही शोभणार नाही!” खमाज रागात बांधलेलं ‘दुखी मन मेरे सुन मेरा कहना..’ हे गाणं किशोर कुमारने आपल्या दर्द भऱ्या स्वरात अतिशय अप्रतिमरीत्या गायलं. आज जवळपास साठ वर्षे झाली या गाण्यातील दर्द रसिकांच्या काळजाला भिडतो.
https://youtu.be/YIJPe8TAtxU?si=GfgxDpxyzVEx0xv7 (गाण्याची लिंक)