Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

 Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’  हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
बात पुरानी बडी सुहानी

Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

by धनंजय कुलकर्णी 23/06/2025

अभिनेता, गायक, दिग्दर्शक, संकलक, संगीतकार अशी चौफेर मुसाफिर करणारे आणि रसिकांच्या हृदयात कायम विराजमान असणारे कलावंत म्हणजे किशोर कुमार! आज किशोरला आपल्यातून जाऊन ३५ वर्ष जरी झाली असली तरी जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतसे किशोर कुमारची लोकप्रियता दिवसा गणिक वाढत आह. किशोर कुमार यांनी तसं कुठलंही औपचारिक शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल् नव्हतं.असं असताना देखील त्यांनी कितीतरी शास्त्रीय रागावर आधारित गाणी आपल्या अंगभूत शैलीमधून साकार केलेली आहे. कुठलंही विधिवत शिक्षण नसताना त्यांनी ज्या पद्धतीने ही गाणी गायली आहेत त्यावरून त्यांना या शास्त्रीय गायनाची दैवी देणगी असावी असेच वाटते.

किशोर कुमार यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पन्नासच्या दशकातच सुरुवात केली होती. दिग्दर्शन क्षेत्रात त्यानी पहिल्यांदा उडी घेतली १९६१ साली आलेल्या झुमरू या चित्रपटातून . हा चित्रपट म्हणजे सबकुछ किशोर कुमार असाच होता. या चित्रपटातील एक गाणं आज देखील प्रचंड लोकप्रिय आहे ते म्हणजे ‘कोई हमदम रहा कोई सहारा न रहा हम किसी के ना रहे कोई हमारा ना रहा ‘ पण तुम्हाला माहिती आहे का? हे गाणं झुमरूमध्ये यायच्या आधी पंचवीस वर्ष १९३८ साली आलेल्या बॉम्बे टॉकीजच्या ‘जीवन नैय्या’ या चित्रपटात किशोर कुमार यांचे मोठे बंधू अशोक कुमार यांनी गायले होते. तो काल गायक-अभिनेत्याचा होता. पार्श्वगायनाचे तंत्र आले होते पण बरेच निर्माते हिरोलाच गायला सांगत. १९३५ साली जेव्हा या गाण्याच्या रिहर्सल जेव्हा घरी चालायच्या तेव्हा किशोर कुमार अवघा सहा सात वर्षाचा होता. पण त्याच्या कानावर या गीताची सुरावट पक्की बसली होती.

बॉम्बे टॉकीज मध्ये गीतकार/अभिनेता असलेले कश्यप यांनी हे गाणं यांनी लिहिलं होतं. तर त्याला संगीत सरस्वती देवी
यांचं होतं. आवाज अर्थातच दादा मुनी अशोक कुमार यांचा. ही सुरावट किशोर कुमार ला अफाट आवडली होती. अनेक वर्ष ते गाणे ते गुणगुणत . १९६१ साली जेव्हा त्यांनी पहिल्यांदा चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं; त्यावेळी त्यांनी हीच सुरावट /हेच गाणं वापरायचं ठरवलं. संपूर्ण गाणं नाही फक्त त्याचा मुखडा आणि चाल त्यांनी वापरायचे ठरवले. गाण्याचा मुखडा तोच ठेवून हे गाणं मजरूह सुलतानपूरी यांनी पुन्हा लिहिले. किशोर कुमार जेव्हा हे गाणं गाणार होता तेव्हा त्यांनी अशोक कुमार यांच्याशी या गाण्याबाबत चर्चा केली. त्यावेळी अशोक कुमार हसत हसत म्हणाले ,” देख किशोर ये गाना राग झिंझोटी पर आधारीत है. इसमे १४ मात्रा है आडा चार ताल है. क्या इतना कठीण गाना ग सकेगा तू? तुने तो क्लासिकल सिंगिंग कि तालीम भी नही ली है. मुझे लगता इस झमेले तू मत पड.”

किशोर कुमार यांना आपल्या मोठ्या भावाच्या सल्ल्याचा थोडासा राग आला पण त्यांनी ठरवलं की हे गाणं गाऊन दाखवायचंच. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा अशोक कुमार कडे गेले आणि म्हणाले,” दादा, इस झिंझोटी राग १४ मात्रा और आडा चार ताल की तो ऐसी की तैसी! मै मेरे हिसाब से गाना गाऊंगा और देखना ये गाना आपके गाने से ज्यादा सुपरहिट हो जायेगा!” अशोक कुमार यांनी हसून त्याला शाबासकी आणि शुभेच्छा दिल्या. किशोर ने मग चंग च बांधला खूप जीवापाड मेहनत घेतली. त्यानंतर किशोर कुमारने झिझोटी रागावरचं हे गाणं अतिशय भावस्पर्शी रीतीने गायले. यातील कडव्यातील आलाप तर इतके अप्रतिम गायले आहेत त्याला तोड नाही.

=============

हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !

=============

किशोर कुमारच्या टॉप टेन गाण्यांमध्ये या गाण्याचा नक्कीच समावेश होतो. चित्रपटाला चांगले यश मिळालं . हे गाणं आज देखील कल्ट क्लासिक म्हणून लोकप्रिय आहे. किशोर कुमार भलेही म्हणत असला की मला क्लासिकल म्युझिकची काहीही जाण नाही पण त्याने कितीतरी गाणी शास्त्रीवर रागावर आधारित म्हटली आहेत. झिंझोटी राग जो या गाण्यात वापरला आहे त्यावर आधारित किशोर कुमारची गाणी आहेत. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया, जिंदगी का सफर है ये कैसा सफर,घुंगरू कि तरहा बजता हि रहा हू मै…

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ashok kumar bollywod classic songs Bollywood Bollywood Chitchat bollywood tadaka bollywood update Celebrity Celebrity News Classic movies Entertainment entertainment news in marathi Indian Cinema Kishore Kumar Madhubala
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.