या आहेत ८ बाबी ज्या किशोरी शहाणे बद्दल तुम्हाला कदाचीत माहीत नसतील….
किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी मराठी आणि हिंदीच नव्हे तर हॉलिवूडच्या सिनेमातही काम केलंय. अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर त्या छोट्या पडद्याकडं वळल्या. हिंदी मालिकेत त्यांच्या करिअरला उतरती कळा लागल्यावर, तिने पुन्हा मराठी मालिकाविश्वात पाऊल ठेवलं. त्यांच्याबद्दल या आठ बाबी आहेत ज्या आपल्याला माहीत देखील नसतील.
१ – त्यांचे शिक्षण आणि छंद– किशोरी शहाणे यांनी मुंबई विद्यापिठाच्या मिठीबाई महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी शिक्षण पुर्ण केले. या शिवाय जेवण बनवण्याची आणि खरेदीची त्यांना कायमच आवड होती.
२ – यासाठी ओळखल्या जातात …..तसे पाहता त्यांनी अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये आपली छाप सोडली. पण हिंदी मालिकांमधील “शक्ती- अस्तित्व के एहसास की” आणि “इश्क मे मरजावा” या मालिंकामधून त्यांना विशेष ओळख मिळाली.
३ – मराठी बीग बॅास २ मध्ये प्रवेश – भारतात सर्वज्ञात आणि सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या बीग बॅास या टेलिव्हीजन चॅनल च्या त्या स्पर्धक हात्या. ‘मराठी बीग बॅास २’ मधून लोकप्रिय स्पर्धक असल्याची पावती त्यांना मिळाली.
४ – चित्रपट सृष्टीमधील त्यांचे पहिले पदार्पण-तसे पाहता त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांचे चित्रपटामध्ये पदार्पण सन १९८७ मध्ये झाले होते. ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ हा त्यांचा पहिला सिनेमा.
५ – किशोरी शहाणे यांचा जन्म आणि कौटुंबिक पार्श्वभूमी- त्यांचा जन्म १९६८ मध्ये २३ एप्रिल रोजी महाराष्ट्रामध्ये झाला. त्या हिंदू धर्माच्या असून त्यांचे नागरिकत्व भारतीय आहे.प्रभाकर शहाणे (वडील) यांच्या कुटुंबात किशोरी यांनी जन्म घेतला आणि वंदना शहाणे या त्यांच्या आई आहेत.
६- मालिकांमधील त्यांचे पदार्पण – ‘घर एक मंदीर’ या मालिकेमधून किशोरी यांनी १९९४ साली मालिका क्षेत्रात पदार्पण केले.
७ – किशोरी यांचे नाटक क्षेत्रातील पदार्पण – किशोरी शहाणे यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. पण अवघ्या वयाच्या १४ व्या वर्षी इयत्ता नववीत असताना त्यांनी नाटक क्षेत्रात पदार्पण केले. ‘दुर्गा झाली गौरी’ हे त्यांचे पहिले लोकनाट्य.
८ – यांच्यासोबत पुढील आयुष्याची वाटचाल सुरू केली – हिंदी चित्रपट सृष्टीमधील दिग्दर्शक ‘दीपक बलराज विझ’ यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्या. त्यांना एक बॅाबी नावाचा मुलगा देखील आहे.
८० च्या दशकातील या किशोरी शहाणे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. सिनेसृष्टीतील त्यांचा आजवरचा प्रवास कौतुकास्पद आहे.
शब्दांकन- शामल भंडारे.