2024 Flashback : २०२४ मध्ये ‘या’ सिनेमांनी गाजवले बॉक्स ऑफिसवर वर्चस्व
अवघ्या काही तासातच आपण २०२४ या वर्षाला निरोप देऊन २०२५ (2025) या नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. २०२४ हे वर्ष बॉलिवूडची सरासरी असेच होते. अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे फ्लॉप ठरले तर कमी बजेट मात्र उत्तम कथानक असलेले सिनेमे तुफान गाजले. यावर्षी कॉमेडी, ऍक्शन, हॉरर, रोमॅंटिक अशा सर्वच स्वरूपाचे अनेक सिनेमे आले. आज २०२४ चा आढावा घेताना जाणून घेऊया २०२४ मधील टॉप गाजलेल्या सिनेमांबद्दल. (2024 Top Movies) (2024 Flashback)
स्त्री २ (Stree 2)
दिग्दर्शक अमर कौशिक (Amar Kaushik) यांचा ‘स्त्री २’ हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला प्रदर्शित झाला होता. २०१८ साली आलेल्या स्त्री (Stree) सिनेमाचा पुढचा भाग असलेल्या या सिनेमात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, तमन्ना भाटिया, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना आदींच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८७४. ५८ कोटींची तगडी कमाई केली. (Bollywood Tadka)
शैतान (Shaitaan)
अजय देवगण, ज्योतिका आणि आर. माधवन यांच्या भूमिका असलेला शैतान हा सिनेमा ८ मार्च २०२४ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाची कथा काळ्या जादूवर आधारित होती. सिनेमाचे आकर्षक म्हणजे या चित्रपटात आर. माधवनने खलनायकाची भूमिका साकारली होती. शैतान सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २११.०६ कोटींची कमाई केली केली आहे. (Entertainment mix masala)
फायटर (Fighter)
हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण फायटर या सुपरस्टार कलाकारांचा बहुचर्चित असणारा हा सिनेमा भरपूर गाजला. पहिल्यांदाच ही जोडी एकत्र दिसली. ‘फायटर’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित झाला. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमाने ३४६ कोटींची मोठी कमाई केली होती. (Box Office Collection)
भूल भुलैया 3 (Bhool Bhulaiyaa 3)
भूल भुलैया ३ सिनेमाची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता होती. पहिल्या दोन धमाकेदार भागानंतर या चित्रपटाचा तिसरा भाग कसा असेल याबद्दल सर्वच खूप आतुर होते. हा सिनेमा १ नोव्हेंबर २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन, तृप्ती डिमरी, राजपाल यादव, विजय राज, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा, मनीष वाधवा, रोज सरदाना, कांचन मलिक आदी अनेक मोठे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांचे होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४१७.५१ कोटींची कमाई केली. (Bollywood Masala)
आयएमडीबी (IMDb)च्या यादीनुसार हे २०२४ मधील या टॉप हिंदी चित्रपटांसोबतच ‘किल’, ‘सिंघम अगेन’, ‘लापता लेडीज’, ‘कल्की :२८९८ एडी’, ‘महाराजा’, ‘मंजुमेल बॉयज’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवल्याचे दिसत आहे.