Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

“Chhaava चित्रपट फूट पाडणारा आहे, कारण…”; रेहमान यांनी स्पष्टपणे उत्तर

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

Rekha- नवीन निश्चलच्या ‘झोरो’ची पन्नाशी

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

‘हम ये वादा तुटने नही देंगे!’; Border 2चा ट्रेलर रिलीज!

Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kon Hotis Tu Kay Jhalis Tu मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण 

 Kon Hotis Tu Kay Jhalis Tu मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण 
Actress Girija Prabhu
टीव्ही वाले मिक्स मसाला

Kon Hotis Tu Kay Jhalis Tu मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण 

by Team KalakrutiMedia 10/04/2025

Star Pravah वर २८ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थातच गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव नव्या रुपात भेटीला येणार आहेत. मालिकेच्या कथानकाविषयी दिवसेंदिवस उत्कंठा वाढत चालली आहे. या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू कावेरी सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मुलींना स्वरक्षण हे यायलाच हवं आणि त्यासाठी योग्य प्रशिक्षण घ्यायला हवं या मताची असणारी कावेरी गावातल्या इतर मुलींनाही स्वरक्षणाचे धडे देते.(Actress Girija Prabhu)

Actress Girija Prabhu
Actress Girija Prabhu

या भूमिकेसाठी गिरीजा जवळपास महिन्याभरापासून लाठीकाठीचं प्रशिक्षण घेतेय. काठी कशी पकडायीच इथपासून सुरु झालेला गिरीजाचा प्रवास आता काठीचा उपयोग करुन स्वरक्षण कसं करायचं इथपर्यंत येऊन पोहोचला आहे.गिरीजाला नृत्यकला उत्तमरित्या अवगत आहेच. या मालिकेच्या निमित्ताने गिरीजा लाठीकाठीही शिकली. या अनुभवाविषयी सांगताना गिरीजा म्हणाली, ‘लाठीकाठी हा महाराष्ट्राच्या मातीतला पारंपरिक खेळ आहे.

Actress Girija Prabhu

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा खेळ प्रचलित आहे. स्वसंरक्षण हा मुख्य हेतू असलेला हा खेळ शारिरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. लाठीकाठीचं हे प्रशिक्षण फक्त मालिकेपुरतं नाही तर आयुष्यभर माझ्यासोबत राहिल. ही कला प्रत्येकाने शिकायला हवी असं यानिमित्ताने मी आवाहन करेन. मी अवगत केलेली ही कला मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू २८ एप्रिलपासून रात्री ८ स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.(Actress Girija Prabhu)

========================================

हे देखील वाचा: गौतमी पाटील आता गाजवणार छोटा पडदा; ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात पहायला मिळणार पाककौशल्य…

========================================

या मालिकेत सुख म्हणजे नक्की काय असतं मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता मंदार जाधव ही (Actor Mandar Jadhav) नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू या नव्याकोऱ्या मालिकेत मंदार यश धर्माधिकारी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मधील जयदीप-गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. महाराष्ट्राची ही लोकप्रिय जोडी कोण होतीस तू, काय झालीस तू या नव्या मालिकेतून कावेरी आणि यशच्या रुपात पुन्हा एकदा आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Actor Mandar Jadhav Actress Girija Prabhu Celebrity Entertainment kon hotis tu kay jhalis tu Marathi Serial Star Pravah
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.