Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Kudrat Movie : हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते….
अभिजात शास्त्रीय संगीत गाणारे गायक सहसा चित्रपटातील गाणी गात नाही. काही अपवाद नक्कीच आहेत पण त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. संगीतकार नौशाद यांनी बडे गुलाम अली खान यांच्याकडून मुगल-ए-आजम या चित्रपटासाठी ‘प्रेम जोगन बन के’ आणि ‘शुभ दिन आयो रे’ ही गाणी तब्बल पन्नास हजार रुपये देऊन गाऊन घेतली होती. त्यापूर्वी त्यांनी ‘बैजू बावरा‘ या चित्रपटात देखील पं डी व्ही. पलुस्कर आणि उस्ताद अमीर खान (आज गावात मन मेरो) यांच्याकडून गाणे गाऊन घेतले होते. (Indian Cinema)

‘बसंत बहार’ मध्ये शंकर जयकिशन यांनी पं. भीमसेन जोशी यांच्याकडून (केतकी गुलाब जुही) गाऊन घेतले. पण हे प्रमाण खूपच कमी होते १९८१ साली चेतन आनंद यांचा ‘कुदरत’ हा चित्रपट आला होता. पुनर्जन्मावर आधारीत कथानक असलेला हा सिनेमा मल्टीस्टारर होता. या चित्रपटाला संगीत राहुल देव बर्मन यांचे होते. या चित्रपटात ‘हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते ‘ हे tandom song होते. हे गाणे चित्रपटात एकदा पुरुष स्वरात तर एकदा स्त्री स्वरात येते. (Cult classic movies)

पुरुष स्वरातील गाणे राजेश खन्ना वर चित्रित होणार असल्याने किशोर कुमार गाणार होते. स्त्री स्वरातील गाण्यासाठी संगीतकार आर डी बर्मन यांना कुणीतरी क्लासिकल बेस असलेला स्वर हवा होता. त्या पद्धतीने त्यांचा शोध सुरू झाला. त्या काळात बेगम परविन सुलताना यांचं शास्त्रीय संगीताच्या दुनियेत खूप मोठं नाव होतं. त्यांनी हे गाणे गावे असे पंचम यांना वाटत होते. पण सिनेमासाठी गायला त्या तयार होतील का ही शंका मनात होती. त्यांनी बेगम परवीन सुलताना यांचे पती दिलशाद खान यांना संपर्क केला. ते देखील कलकत्त्याचे आहेत हे कळाल्यानंतर पंचम यांना बरे वाटले. (Bollywood masala)
================================
हे देखील वाचा: Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!
=================================
प्रत्यक्ष भेटल्यानंतर मात्र त्यांना प्रचंड आश्चर्य वाटलं. कारण हे दिलशाद खान दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचे झेवियर कॉलेजमधील क्लासमेट होते. मग दोघांची चांगलीच गप्पांची मैफिल जमली. पंचम यांनी आपल्या गाण्याचा विषय काढल्यानंतर दिलशाद खान यांनी सांगितले ,” तूच तिला फोन करून विचार.” त्यावर पंचम म्हणाले,” पण मला भीती आहे तिने नाही म्हटले तर?” त्यावर दिलशाद खान म्हणाले,” अरे ती तुझ्या गाण्याची प्रचंड मोठी फॅन आहे. तू विचारून तर बघ.” संध्याकाळी पंचम यांनी बेगम परवीन सुलताना यांना फोन केला आणि गाण्याबाबत विचारले. परवीन सुलताना यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी हे गाणे गायचे कबूल केले. एवढी मोठी क्लासिकल सिंगर आपल्याकडे गाते आहे म्हटल्यानंतर पंचम यांनी गाण्यावर खूप मेहनत घेतली. (Entertainment news update)

मिश्र भैरवी रागातील हे गाणे ठुमरी स्टाईलने परवीन सुलताना यांच्याकडून गाऊन घ्यायचे ठरले. या गाण्यासाठी हेवी ऑक्रेस्ट्रा वापरायचे ठरवले. या गाण्याच्या रेकोर्डिंगच्या आठवणी शेअर करताना बेगम परवीन सुलताना यांनी दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले,” पंचम यांनी हे गाणे मिश्र भैरवी रागात बांधल्याने गाताना खूप मजा आली. ठुमरी शैलीत मी गायले. या गाण्यासाठी तब्बल १०० व्हायोलीनचा वापर केला गेला होता. संतूरवर शिवकुमार शर्मा होते. बासरी हरिप्रसाद चौरसिया यांनी वाजवली, तर सरोदवर सरोज जरीन दारूवाला होत्या. सारंगी साठी पंडित रामनरायण यांना निमंत्रित केले होते. म्हणजे त्या काळातील सर्वोत्कृष्ट वादकांचा मोठा ताफा पंचम यांनी या गाण्यासाठी उभा केला होता. मजरुह सुलतानपूरी यांचे शब्द होते.” (Bollywood update)
============
हे देखील वाचा : Kishore Kumar : किशोर कुमार ‘हे’ गाणं गातांना का नर्व्हस होते !
============
परवीन सुलताना यांनी शब्दांमधील भावना लक्षात घेत अतिशय तादात्म्य होऊन त्यांनी हे गाणं गायलं. चित्रपटात हे गाणे एका अतिशय कृशियल प्रसंगात येते. चित्रपटात हे गाणे अरुणा इराणी यांच्यावर चित्रित झाले होते. पंचम यांच्या सुरांनी आणि बेगम परवीन सुलताना यांच्या स्वराने हे गाणे कल्ट क्लासिक बनले. या गाण्यासाठी बेगम परवीन सुलताना यांना त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार देखील मिळाला! (Entertainment news)
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News