जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Promo: पुन्हा एकदा दिसणार कौटुंबिक नात्यांचा सोहळा !
भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात एखाद्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एवढं खोलवर स्थान मिळवलं असेल, तर ती म्हणजे ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’. 2000 साली सुरू झालेली ही मालिका केवळ प्राइम टाइमवर गाजली नाही, तर भारतीय कुटुंबसंस्थेचं एक प्रतिकच बनली. तुलसी विराणी आणि विराणी कुटुंब हे प्रत्येक घरातलं एक नाव बनलं जणू ते आपल्याच कुटुंबाचा एक भाग झाले. (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Promo)

ज्या काळात भारतीय दूरचित्रवाणी वाहिन्या स्वतःची ओळख निर्माण करत होत्या, त्या काळात ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ने प्रेक्षकांना एक नवं जग दाखवलं जिथं नात्यांमधली गुंतागुंत, प्रेम, संघर्ष, त्याग आणि कुटुंबाच्या एकत्रतेचं दर्शन घडलं. एक अशी कथा, जी प्रत्येक वयोगटातल्या प्रेक्षकाला आपलंसं वाटली. आणि आज, तब्बल २५ वर्षांनंतर, हीच कथा पुन्हा नव्या रूपात परतत आहे. नुकताच या मालिकेच्या नव्या सीझनचा प्रोमो प्रदर्शित झाला असून, जुन्या आठवणींना उजाळा देत ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नवीन सादरीकरणात जुन्याच भावनांचा साठा आहे . नात्यांमधला गहिवर, संस्कारांचं प्रतिबिंब आणि कुटुंबसंस्थेची अमर्याद शक्ती दाखवणारा एक ठळक वारसा.

या पुनरागमनामागे आहे एकता कपूर ज्यांनी ही मालिका भारतात दैनंदिन मालिकांची क्रांती घडवणारी कलाकृती बनवली. आजही लाखो प्रेक्षकांच्या स्मरणात असलेली ही मालिका ‘स्टार प्लस’ या वाहिनीच्या ब्रँडचं अधिष्ठान होती, आणि आजही आहे. मालिकेचं हे पुनरावर्तन म्हणजे टीव्ही विश्वातलं एक ऐतिहासिक पाऊल आहे. विशेष म्हणजे, या नव्या पर्वात स्मृती इराणी साकारलेली ‘तुलसी’ ही भूमिकाही पुनरुज्जीवित होणार असल्याची चर्चा आहे – ज्या पात्राने लाखो प्रेक्षकांच्या मनात अनन्यसाधारण स्थान मिळवलं.(Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Promo)
====================================
हे देखील वाचा: महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून Prajakta Mali ची एक्झिट? नेमक कारण काय…
====================================
सध्या या नव्या पर्वात कोणते कलाकार झळकणार याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी निर्मात्यांनी आश्वासन दिलं आहे की, या मालिकेचा आत्मा – तिची संस्कृती, तिचं मूल्य कायम जपलं जाणार आहे. जुने प्रेक्षक जिथे जुन्या आठवणींत हरवणार, तिथे नव्या पिढीला एक ऐतिहासिक मालिका पहायची संधी मिळणार आहे जी एकेकाळी हजारो भाग गाजवणारी आणि टीआरपीत विक्रमी यश मिळवणारी होती. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ केवळ एक मालिका नाही, ती एक भावना आहे. जी एकदा पुन्हा नव्या रूपात, नव्या पिढीला भिडण्यासाठी सज्ज झाली आहे.