Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

सुपरस्टार Dev Anand पाहायचे ‘हा’ मराठी कार्यक्रम!

Dashavatar : मराठी चित्रपट ‘दशावतार’च्या फर्स्ट लूकला जागतिक स्तरावर पसंती; अमेरिकन यूट्यूबर्सने

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Promo: पुन्हा एकदा दिसणार

‘Chala Hava Yeu Dya 2′ च्या नव्या होस्टसाठी श्रेया बुगडेची खास

Ramayana : साई पल्लवीच्या भूमिकेबद्दल काय म्हणाल्या टेलिव्हिजनच्या ‘सीता माता’?

Dev Anand : ….तसं झालं असतं तर देव आनंद ‘तिसरी

Satyabhama Movie : सती प्रथेवर आधारलेला ‘सत्यभामा’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

OTT Release July :Special Ops 2 ते ‘आप जैसा कोई’;

Kantara Chapter 1 : ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’चं पोस्टर रिलीज; रुद्रावताराने

अभिनयापूर्वी आपल्याच वडिलांना Direct करणारा Ranbir Kapoor!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

जीवनात हि घडी अशीच राहू दे …..

 जीवनात हि घडी अशीच राहू दे …..
कलाकृती तडका फूल खिले गुलशन गुलशन

जीवनात हि घडी अशीच राहू दे …..

by धनंजय कुलकर्णी 28/09/2020

तुम्हा आम्हा रसिकांच्या जीवनातील ‘प्राणस्वर’ आज (२८ सप्टेंबर) 92 वर्ष पूर्ण करतो आहे. गेल्या चार पिढयांच भावविश्व या स्वराने समृध्द केले आहे. जगायला हूरूप देणाऱ्या आणि जीवनाला अर्थ देणाऱ्या ज्या मोजक्याच गोष्टी आज शिल्लक आहेत त्यात लताजींचा स्वर सर्वोच्च स्थानावर आहे.

लताच्या (Lata Mangeshkar) या प्रतिभाशाली व अलौकीक स्वराचं वर्णन करताना कवी कुसुमाग्रज यांनी म्हटले होते ‘सृष्टीतील कोकीळा फक्त वसंतातच गात असतात, पण या कोकीळेने मात्र प्रत्येक ऋतुला वासंतिक स्वरांचा रंग दिला आहे.’ तर दुसरे ज्ञानपीठ विजेते वि. स. खांडेकर यांनी लताच्या स्वराबाबत/गाण्यांबाबत बोलताना  ‘अबोलीचा रंग व बकुळीचा गंध लाभलेली अक्षय स्वरातील गाणी’ असे कौतुकोद्गार काढले होते. खांडेकरांना लताचे ‘ओ सजना बरखा बहार आयी’ (परख) हे गीत खूप आवडायचे.

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. लं नी ‘ या आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे नि लताचा स्वर आहे’ अशा शब्दात या स्वराला दाद दिली होती. त्यांना  लताजींचे ‘तू मेरे प्यार का’ (धूल का फूल) खूप आवडायचे, त्यांनी या हळुवार अंगाई गीताबाबत खूप छान लिहीलय! साहित्य सम्राट आ. अत्रेंनी या स्वराला ‘लोण्यात खडीसाखर मिसळलेला अवीट मधुर स्वर’ म्हटले! असा एकही रसिक नाही ज्याने लताजींच्या स्वरावर प्रेम केले नाही.

आज लताजींच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गायलेल्या मराठी गीतांवर नजर टाकून सरलेल्या काळातील मधुर आठवणींचा वर्षावात चिंब न्हाऊयात. लताजींनी मराठीत गायलेल्या एकूण गीतांची संख्या ४१० आहे.

Lata Mangeshkar - Photographer: Gautam Rajadhyaksha
Lata Mangeshkar – Photographer: Gautam Rajadhyaksha

लताजींच्या गायनाचा शुभारंभ मराठी संगीतकाराकडेच झाला. तो काळ मोठा विलक्षण होता. देशात स्वातंत्र्य लढयाचा अपूर्व उत्साह खळाळत होता. जगात दुसऱ्या महायुध्दाने थैमान घातले होते. सांस्कृतिक विश्वात याच प्रतिबिंब उमटणं स्वाभाविकच होतं. पुढे फाळणीची वेदना कळ देवून गेली. मराठी सांस्कृतिक विश्वात त्या वेळी भावगीतांचा जमाना होता. भाव गीतांचा बादशहा गजानन वाटवे तेंव्हा आपल्या गायकीने रसिकांच्या दिलात अढळ स्थान मांडून होते. याच काळात बबनराव नावडीकर, गोविंद पोवळे, माणिक वर्मा, सरोज वेलींगकर, सुधीर फडके ही मंडळी जनतेच्या समोर होती. वाटव्यांच्या भावगीतांनी अफाट लोकप्रियता मिळवली होती.

आणि याच काळात लताजींचा स्वर्णस्पर्शी स्वर रसिकांपुढे आला आणि स्वरानंदाचा अभिषेक सुरू झाला. गेली साठ पासष्ट वर्षे या स्वराने आम्हाला नवरसाची प्रचिती देण्याऱ्या गीतांची अनुभूती दिली. या स्वराने आम्हाला जगण्याचा अर्थ दिला व आमचं जीवन रसिलं/सुरीलं बनवलं. लताजींच्या मराठी गीतांचा आपण जेंव्हा विचार करू लागतो तेंव्हा त्यांनी वसंत प्रभूं कडे गायलेल्या गीतांना प्रामुख्याने आठवू लागतो.

एकीकडे ‘आशा भोसले-गदीमा-सुधीर फडके’ हे त्रिकूट रसिकांना प्रतिभेचे नवनवे अविष्कार देत होते आणि दुसरीकडे ‘लता-पी सवाळाराम-वसंतप्रभू’ हे त्रिकूट रसिकांच्या भावभावनांचे विश्व हळूवार पणे फुलवत होते. तमाम मराठी रसिकांचे भावविश्व या गीतांनी समृध्द बनलं.

या त्रयीची आठवण काढली की डोळयापुढे येते ‘गंगा यमुना डोळयात उभ्या का जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ हे गीत ! १९४९ सालचं हे गाण आजही पापण्यांच्या कडा ओलावते. ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनीया बाबा गेला, वैभवाने बहरून आला, याल का हो बघायला’ या गीतातील लताच्या स्वरातील कातरता तिचं पितृप्रेम व्यक्त करते. या त्रयीने हर तऱ्हेचे, प्रत्येक भावनांचे, प्रत्येक रसाचे गाणे दिले. लताजींच्या कोवळया स्वरातील ‘हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील कां ?’ ‘नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते फिरते’ या गीतातील कोवळया प्रेमाच्या अंकुराची नाजूकता लताजींनी लिलया टिपली आहे.

त्या काळातील प्रेमातील मुग्धता, त्यातील कोवळीक, आणि मुख्य म्हणजे ‘लज्जा’ हा जेंव्हा स्त्रियांचा मुख्य अलंकार होता त्या काळातली प्रेमाची आर्तता या साऱ्यात एक नादमय गोडवा होता अन या गोडव्याचाच प्रत्यय ठायीठायी येतो. ‘‘मधु मागसी माझ्या सख्या परी’, ‘लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची’, ‘सप्त पदीही रोज चालते’, या भावगीतांनी तमाम तरूण तरूणींचे भावविश्व गुलाबी झाले. प्रेमातील समर्पणाच्या उदात्त भावनेचा जयघोष यात होता. या गीतात नाजूक शृंगार आहे, गुलाबी प्रणय आहे. स्वरात शुध्द चंचलता आहे, गीतात सात्विक भावना आहे तर सूरात लोभस अवीटता आहे.

‘चाफा बोलेना चाफा चालेना’, ‘हरवले ते गवसले का गवसले ते हरवले का?’, ‘कळा ज्या लागल्या जीवा’ वसंत प्रभूंनी स्वरसाज चढवताना कधीही सूरांना शब्दांवर आक्रमण करू दिलं नाही. त्यामुळेच आज इतक्या वर्षानंतरही भावगीतं लख्ख आठवतात! लताजींनी वसंत प्रभूंकडे बरीचशी भक्ती गीतही गायलीत. ‘जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला’, ‘राम हृदयी राम नाही’, ‘श्रीरामा घनश्यामा’, ‘घट डोईवर घट कमरे वर सोडी पदरा नंदलाला नंदलाला रे’, ‘विठ्ठल सम चरण तुझे धरते’, या आणि इतर भक्तीगीतांचे लताजींनी अतिशय मंगलस्वराने त्यांचे सोने केले!

लतादीदी कुटुंबासमवेत

आठवायला गलं तर लताजींची चिक्कार मराठी गाणी मनाचे फेर धरून नाचू लागतात. त्यात ज्ञानदेवांपासून भा. रा. तांबे पर्यंत, कुसुमाग्रज, वसंत बापट पासून थेट सुधीर मोघ्यां पर्यंतची गाणी असतात. या मराठी गीतांनी तमाम मराठी रसिक सुखावला विशेषत: आजच्या संगीताच्या कत्तलीच्या युगातही हिच गाणी पहाटेच्या हळुवार/मंद वायुलहरी सारखी मनाला प्रसन्न करून जातात.

‘या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या’ हे खळयांकडचं गाणं! त्यातील आर्तता व हार्मोनियमच्या सूराने गीताशी जमवलेली समरूपता सारचं अलौकिक दिव्य! बालकवीच्या लेखणीतून उतरलेले ‘माझे गाणे, एकच गाणे, नित्याचे गाणे, अक्षय गाणे अभंग गाणे हे गाणे’ हे गीत ऐकल्यावर ते लताजींच्या स्वराबाबातच लिहीलय की काय असा भास होतो. दैव जाणीले कुणी, धुंद मधुमती रात रे रात रे ही गदीमांची गाणी, जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहीलं कार्य काय, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, कशी काळ नागिणी सखे गं वैरीण झाली नदी ही भा. रा. तांब्यांची गाणी आजही मनाला सुखावून जातात.

भावगीता तील प्रत्येक शब्दाला लताच्या स्वराने चिरंजीव केले. जीवनात ही घडी अशीच राहू दे, राजा सारंगा माझ्या सारंगा, सावर रे सावर रे, गुणी बाळ कसा जागसी कारे, सांग कधी कळणार तुला, श्रावणात घन नीळा बरसला, प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, गगन सदन तेजोमय, वादळ वारं सुटलं गं, मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं, मोगरा फुलला या गीतांवर गेल्या चार पिढया पोसल्या आहेत. लताजींच्या मराठी गीतातून दिसणारी सात्विकता, पारदर्शकता, सारे अमंगल जाळून मनाला परमतत्वाला जवळ नेणारी दिसतात.

परमेश्वराकडे एकच प्रार्थना या स्वराला शतायुषी कर!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Birthday Celebrations Bollywood Music Celebrity Featured lata mangeshkar music
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.