
“…म्हणून Rekha यांनी दिलेली साडी अजून नेसली नाही”; विशाखा सुभेदारने सांगितलं कारण
प्रत्येक स्त्रीच्या मनात साड्यांसाठी एक विशेष कोपरा असतो… स्वत:च्या पैशातून घेतलेली पहिली साडी असो किंवा आजी-पणजी-आई यांच्या आशिर्वादातून मिळालेली साडी असो किंवा मग जवळच्या लोकांनी गिफ्ट केलेली एखादी साडी असतो… तिच्या कपाटात ठेवलेल्या प्रत्येक साडीच्या मागे एका खास स्टोरी असतेच… अशीच एका साडीमागची खास स्टोरी अभिनेत्री विशाखा सुभेदारने सांगितली असून त्याचं कनेक्शन ज्येष्ठ अभिनेत्री ग्लॅमरस क्वीन रेखा (Rekha) यांच्याशी आहे…
अशी क्विचित एखादी व्यक्ती सापडेल जी रेखा यांची फॅन नसेल… विशाखा सुभेदार रेखा यांच्या लाखो चाहत्यांपैकी एक… आपल्या आवडत्या सेलिब्रिटीने दिलेली गिफ्ट खास असतंच पण ते जर का रेखा यांनी दिलेलं असेल तर? हो मराठमोळ्या अभिनेत्री विशाखा सुभेदारला जवळपास १० वर्षांपूर्वी रेखा यांनी एक साडी गिफ्ट केली होती आणि आजही त्यांची त्या साडीची घडी मोडली नाही आहे… (Marathi Entertainment News)

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत विशाखाने त्या गिफ्ट केलेल्या साडीची खास आठवण सांगताना म्हटलं होतं की, “खरं तर ती साडी नेसण्याची माझी खूप इच्छा होते, दरवेळी त्याच्यावर वेगवेगळे ब्लाऊज शिवून घेते. पण तो ब्लाऊज दुसऱ्या साडीवर वापरला जातो. असं अनेकदा झालंय. माहिती नाही, पण तो खास प्रसंग यायचा आहे अजून. ती साडी मला रेखाजींनी २०१४ मध्ये दिली होती. आता त्याला ११ वर्षे झाली. मी ती साडी नेसलीच नाही, तशीच कपाटात आहे.” (Bollywood)

विशाखाने ‘सुपरनानी’ या हिंदी चित्रपटात रेखा यांच्यासोबत काम केलं होतं. हा चित्रपट २०१४ मध्ये रिलीज झाला होता… आणि याच वेळी रेखा यांनी विशाखाला कांजीवरम सिल्कची साडी भेट दिली होती… इतकंच नाही तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील विशाखाला एक नाही तर दोन साड्या भेट म्हणून दिल्या होत्या. त्यांच्या निधनाच्या सहा महिने आधी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहून तिच्या कामाचं कौतुक करण्यासाठी लता दीदींनी दोन पेशवाई सिल्कच्या साड्या पाठवल्या होत्या. त्यातली एक साडी विशाखाने नेसली असून अजून एक साडी तशीच आशिर्वाद म्हणून ठेवली आहे…
================================
================================
दरम्यान, रेखाजींचं मराठी चित्रपट आणि भाषेवरील प्रेम आपण जाणतोच… ‘कुठं कुठं जायाचं हनिमुनला’ या मराठमोळ्या गाण्यात त्या झळकल्या होत्या… शिवाय, बऱ्याच मुलाखतीत त्यांनी मराठी कलाकारांच्या कामाचं देखील कौतुक कायम केलं आहे… आता लवकरच रेखा यांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसावं असं त्यांच्या चाहत्यांना वाटत असून कदाचित येत्या एका चित्रपटात लोकांची ही इच्छा पुर्ण होण्याची चिन्ह दिसणार आहेत… (Movies of Rekha)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi