Susheela-Sujeet : बाल्कनीमधून ‘सुशीला-सुजीत’ का ओरडत आहेत हे लवकरच कळणार!

आलिशान आयुष्य जगणाऱ्या अल्लू अर्जुनची प्यारवाली लव्हस्टोरी
अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) समावेश दक्षिणेतील टॉप स्टार्समध्ये होतो आणि त्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अल्लू अर्जुनने गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्येही स्थान मिळवले आहे.
अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) जन्म ८ एप्रिल १९८२ रोजी चेन्नईमध्ये झाला. आपल्या अभिनय आणि शैलीच्या जोरावर लोकांची मने जिंकली आहेत. यासोबतच अल्लू अर्जुन विशेष प्रसिद्ध आहे ते त्याच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठी. आज या लोकप्रिय अभिनेत्याच्या वाढदिवशी, त्याची आणि पत्नी स्नेहा रेड्डीची प्रेमकहाणी कशी आहे ते जाणून घेऊया.
तेलगू अभिनेते चिरंजीवी यांचा आहे पुतण्या
अल्लू अर्जुनने (Allu Arjun) त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर आणि नंदी पुरस्कार जिंकले आहेत. अल्लू अर्जुनचा जन्म चेन्नई येथे झाला. त्याचे वडील अल्लू अरविंद हे तेलुगू चित्रपट दिग्दर्शक आहेत आणि तो सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेते चिरंजीवी यांचा पुतण्या आहे.
मित्राच्या लग्नात झाली पहिली भेट
अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि स्नेहा रेड्डी यांचे लव्ह मॅरेज झाले आहे. दोघांची लव्ह स्टोरी काही कमी रंजक नाही. खरंतर दोघांची पहिली भेट एका मित्राच्या लग्नात झाली होती आणि दोघेही पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर तिथून दोघांचे बोलणे सुरू झाले आणि मैत्रीनंतर हळूहळू हे नाते खूप घट्ट झाले.
====
हे देखील वाचा: ४१ दिवसांचे कठीण अनुष्ठान घेतलेल्या रामचरणचा हटके अंदाज, जाणून घ्या त्याच्या या रूपाचे रहस्य
====
अल्लू अर्जुनबद्दल नव्हतं माहिती काही!
अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा अमेरिकेतून शिक्षण घेऊन परत आली होती आणि तिला कल्पनाही नव्हती की, अल्लू अर्जुन तेलगू चित्रपटातील स्टार आहे. स्नेहा ही हैदराबादच्या एका प्रसिद्ध व्यावसायिकाची मुलगी आहे.
अल्लू अर्जुनचे कुटुंब नव्हते तयार
अल्लू अर्जुन स्नेहावर खूप प्रेम करत होता आणि त्याला तिच्याशीच लग्न करायचे होते, परंतु अल्लूचे वडील या नात्याला विरोध करत होते, मात्र खूप समजावून सांगितल्यानंतर ते स्नेहाच्या वडिलांकडे स्थळ घेऊन गेले. परंतु स्नेहाच्या कुटुंबीयांनी त्यांना नकार दिला. तेव्हा मात्र अल्लू अर्जुन आणि स्नेहा एकमेकांचे होण्यासाठी वाट पाहायचे ठरवले.
अखेर झालं लग्न
अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि स्नेहा दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते, दोघांनीही घरच्यांना लग्नासाठी मनवण्याचा खूप प्रयत्न केला. शेवटी ६ मार्च २०११ रोजी तो सुवर्णक्षण आलाच. आज या जोडप्याला दोन मुले आहेत, मुलगा अयान आणि मुलगी आरा.
====
हे देखील वाचा: हे आहेत भारतामधील विवादित टॉप १० चित्रपट ज्यांच्यावर सेन्सॉरने बंदी घातली…
====
जगतो आलिशान आयुष्य
अल्लू अर्जुनने २००३ मध्ये एलके राघवेंद्र राव यांच्या ‘गंगोत्री’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली. अल्लूने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. तो अतिशय विलासी जीवन जगतो आणि त्याला वाहनांची खूप आवड आहे. अल्लूकडे सुमारे १०० कोटींचा आलिशान बंगला आहे. आणि BMW, Jaguar, Audi, Range Rover सारख्या आलिशान गाड्यांचाही मोठा संग्रहही आहे. २०१६ मध्ये अल्लू हा गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा टॉलिवूड स्टार होता.