मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
गीतकार योगेश संगीतकार सचिन देव बर्मन यांच्याशी चक्क भांडायला धावले होते !
हिंदी सिनेमाच्या दुनियेत कधी कधी हाती आलेली संधी अगदी अनपेक्षितपणे जात असते. पाहता पाहता त्या भूमिकेत दुसराच कुणी तरी साईन झालेला दिसतो. फक्त अभिनेत्यांच्या बाबतीतच घडत नाही तर संगीतकार, गीतकार यांच्याबाबत देखील असे घडते. अगदी “हा चित्रपट तू करणार आहेस” असं सांगितल्यानंतर अचानक चक्र फिरतात आणि तो चित्रपट दुसऱ्याच व्यक्तीकडे जातो. असाच काहीसा अनुभव गीतकार योगेश (yogesh) यांना आला होता आणि त्यांनी ते खूप पर्सनली घेतलं होतं. ते प्रचंड नाराज झाले होते, रागावले होते, चिडले होते आणि दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांना खूप काही बोलून दाखवायचं त्यांच्या मनात होतं. पण त्यांना वेळीच सावरल्यानं तो कटू प्रसंग घडला नाही.
हा किस्सा सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीचा काळातला आहे. गीतकार योगेश यांनी संगीतकार सचिन देव बर्मन यांच्यासाठी उसपार (१९७३) या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन बासू चटर्जी यांनी केले होते. याच काळात सचिन देव बर्मनसोबत योगेश यांची चांगली ट्युनिंग झाली. सचिनदा म्हणाले, ”माझ्या पुढच्या चित्रपटाच्या वेळी तुझा नक्की विचार करेन!” सचिनदा असं बोलले पण त्यांचा पुढचा चित्रपट होता ऋषिकेश मुखर्जी यांचा चुपके चुपके! ऋषिकेश मुखर्जीसोबत योगेश यांनी ‘आनंद’ (१९७१) या चित्रपटासाठी काम केले होते. त्यामुळे गीतकार योगेश हा चित्रपट आपल्याला नक्की मिळेल असं त्यांना वाटत होतं कारण ते ऋषीदा आणि सचिनदा या दोघांच्या गुड बुक्समध्ये होते.
पण एक दिवस बासू चटर्जी ऋषिकेश मुखर्जी यांना भेटायला मोहन स्टुडीओमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांना एस डी बर्मन आणि आनंद बक्षी भेटले आणि ते ‘चुपके चुपके’च्या गाण्यावर चर्चा करत होते. तेव्हाच चटर्जी यांच्या लक्षात आले की ‘चुपके चुपके’ची गाणी योगेश (yogesh) नाही तर आनंद बक्षी लिहिणार आहेत. त्यांनी गीतकार योगेशला तशी कल्पना दिली. ती बातमी ऐकून योगेश यांना प्रचंड दुःख झाले त्या रात्री ते शांत झोपू शकले नाही. त्यांना फार मोठा अपेक्षाभंग वाटला.
सकाळी ते खरी खोटी सुनावण्यासाठी ऋषिकेश मुखर्जी यांच्या घरी गेले पण ऋषिकेश मुखर्जी तेव्हा मोहन स्टुडिओमध्ये एका सिनेमाचे एडिटिंग करत होते. दुसऱ्या दिवशी ते बासू चटर्जी यांना भेटले आणि कालचा प्रसंग सांगितला. बासू चटर्जी म्हणाले, ”अरे असं काय करतोस? ही सिनेमा लाईन आहे. इथे कुठल्या ही गोष्टीवर तुमचा हक्क नसतो. कुणी कुणासोबत काम करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्यामुळे असा मूर्खपणा तू पुन्हा करू नकोस. ही सिनेमाची दुनिया आहे हे लक्षात ठेव.” तरीपण ‘चुपके चुपके’ सारखा मोठ्या बॅनरचा चित्रपट आपल्या हातातून गेला याचं दुःख त्यांना होतं. पण काही इलाज नव्हता.
परंतु काही दिवसानंतर सचिन देव बर्मन यांचा योगेश (yogesh) यांना फोन आला आणि त्यांनी बोलावले. योगेश थोडे रागातच होते. ते म्हणाले, ”सचिनदा, तुम्ही प्रेम माझ्यावर करता पण सिनेमाची गाणी लिहायचा प्रसंग आला तर आनंद बक्षीला संधी देता.” सचिनदा म्हणाले, ”अरे, तू ‘चुपके चुपके’ बद्दल बोलतोयस का? मला वाटलं आपण ‘उसपार’मध्ये काम करत असताना तू इमोशनल गाणी चांगली लिहू शकतोस. ‘चुपके चुपके’ या सिनेमाचा जॉनर थोडा वेगळा आहे. तो एक कॉमेडी सिनेमा आहे. म्हणून तिथे आनंद बक्षी यांचा विचार आम्ही केला.
==========
हे देखील वाचा : ..आणि जया भादुरीने तिथल्या तिथे सुपरस्टार राजेश खन्नाला प्रत्युत्तर दिले!
==========
पण आता माझा पुढचा चित्रपट येतो आहे ‘मिली’. तो देखील ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटाची गाणी मात्र तू लिहिणार आहेस!” गीतकार योगेशच्या मनातील संपूर्ण राग क्षणार्धात नाहीसा झाला आणि त्यांनी ‘मिली’ या सिनेमाची तीन गाणी लिहिली. ही तीनही गाणी आज देखील लोकप्रिय आहेत. दुर्दैवाने सचिन देव बर्मन यांचा तो शेवटचा सिनेमा ठरला. यातील योगेश (yogesh) यांनी लिहिलेली गाणी होती ‘आये तुम याद मुझे’, ’बडी सुनी सुनी है’ आणि ‘मैने पूछा फुलो से…’