Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला

Madhugandha Kulkarni : दिग्दर्शिका मधुगंधा कुलकर्णीने केले अमृता सुभाषच्या नाटकाचे कौतुक
प्रत्येक दिग्गज कलाकारांचे नाटक हे पाहिले प्रेम असते. जेव्हा जेव्हा कलाकारांना वेळ मिळतो तेव्हा प्रत्येक कलाकार आवर्जून नाटक बघतात. आज जर आपण पाहिले तर अनेक दर्जेदार आणि उत्तम नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नाटकाच्याच निमित्ताने अनेक प्रतिभावंत कलाकरांना आपण प्रत्यक्षात अभिनय करताना पाहू शकतो. नाटकांवरील प्रेक्षकांचे प्रेम आजही कायम आहे. त्यामुळेच कदाचित कलाकरांना देखील नेहमीच नवनवीन नाटकं तयार करण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा आणि आनंद मिळत असतो.(Marathi Play)
अशातच नाटकाच्या जगात सध्या एक नाटक कमालीचे गाजताना दिसत आहे, आणि ते म्हणजे ‘असेन मी नसेन मी’ (Asen Mi Nasen Mi). ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष यांच्या बहारदार अभिनयाने सजलेले हे नाटक रंगभूमीवर खूपच लोकप्रिय होत आहे. नुकतेच हे सुंदर नाटक लेखिका, निर्माती, अभिनेत्री असलेल्या मधुगंधा कुलकर्णीने पाहिलं आणि या नाटकाची स्तुती करताना तिने अतिशय सुंदर पोस्ट शेअर केली आहे. मधुगंधाची ही पोस्ट सध्या खूपच गाजत आहे. (Madhugandha Kulkarni)
मधुगंधाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “कधी कधी असं होतं की तुम्ही एखादी कलाकृती बघता आणि ती तुमची पाठ सोडत नाही, रेंगाळत राहते, त्यातले बारकावे आपण मनातल्या मनात घोळवत . ते नाटक तुम्हाला प्रेरित करत राहतं… खोल खोल काहीतरी ढवळून निघत…थोडी भीती, थोडी करुणा…थोडा हळवेपणा… आणि खूप सारा आनंद… असं भावविभोर होणं हल्ली दुर्मिळच ! “असेन मी नसेन मी “ह्या नाटकाने मला अंतर्बाह्य हलवून टाकलं आहे. नाटक बघत असताना अंगावर शहारा येण्याचा अनुभव मी घेतला आणि न राहून मी ही पोस्ट लिहायला घेतली. (Madhugandha Kulkarni Post)
A post shared by Madhugandha Kulkarni (@madhugandhakulkarni)
संदेश आणि अमृता या जोडीने रंगमंचावर आणलेलं हे नाटक अलौकिक आनंद देऊन जातं. संदेशने ज्या संवेदनशीलतेने हे नाटक लिहिलेलं आहे त्याला तोड नाही…स्त्री मनाचे इतके कंगोरे एक पुरुष असून त्याने इतके लीलया उलगडून दाखवले आहेत की आपण स्तिमित होतो . स्त्री मनाचे अनेक पदर एस एल भैरप्पा नंतर संदेशने त्या ताकदीने दर्शविली आहेत. मित्रा लेखक म्हणून केवळ कमाल ! या नाटकाची दिग्दर्शिका…अमृता.. तिचं हे पहिलंच नाटक पण पाहताना ते जाणवत नाही… मातब्बर आणि जाणकार दिगर्शकेसारखं तिने हे नाटकं सहज बसवलं आहे… इतकं की आपण त्या घरात आहोत आणि आपल्या साक्षीने सगळं घडतं आहे असं वाटत राहतं.(Entertainment Marathi News)
गोष्ट साधी सोपी आणि आपल्या घरातली आहे… आई आणि मुलगी… त्यांच्या नात्यातला, आयुष्यातला , मनातला ताण…आणि आईचं वाढत जाणार आजारपण…त्यात दोघींची होणारी…घालमेल… ससेहोलपट..आपण त्या सगळ्याचा प्रेक्षक न राहता भाग बनून जातो हे लेखक दिगर्शकाच श्रेय आहे. समोर स्टेज वर एक नाटक घडत असताना ..तुमच्या मनाच्या अवकाशात तुमचं तुमचं ..तुमच्या पात्रांचं नाटक रंगत जातं…(Marathi Top News)
प्रेक्षक म्हणून आपल्या मनातलं आणि स्टेज वरच नाटक कुठल्या तरी क्षणी तादात्म्य पावत याला अजून एक कारण म्हणजे नाटकात काम करणारे कलाकार…नीना कुलकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष या तिघीही कसलेल्या अभिनेत्रींनी ही पात्र अक्षरशः जिवंत केली आहे…एक अशी अभिनयाची जुगलबंदी सुरू होते … की आपण आवक होत जातो…हे नाटक अभिनयाने उंचावत जाणारी मैफिल वाटत राहते.(Entertainment Mix Masala)
=======
हे देखील वाचा : Varsha Usgaonkar : मराठी मनोरंजनविश्वातील चिरतरुण सौंदर्य वर्षा उसगांवकर
Kiran Mane : ‘नथूरामी नटाच्या दैवतानं’ म्हणत किरण माने यांची शरद पोंक्षेवर टीका
=======
आपण रंगून जातो… डोळे भरून येतात, आत खोल कालवाकालव सुरू होते आणि एक अत्यंत परमोच्च क्षण गाठून ही मैफिल थांबते . आपण ते सगळं घेऊन बाहेर पडतो. सुंदर अनुभव प्रदीप मुळे यांचं नेपथ्य नेटकं,सुरेख, सुटसुटीत . कपडेपट, रंगभूषा , प्रकाश योजना, संगीत… सगळं नाटकाची उंची गाठण्यास अत्यंत समर्पक आणि सुंदर. या नितांत सुंदर अनुभवासाठी खूप खूप आभार आणि प्रेम. हे नाटक a must watch”
दरम्यान मधुगंधाबद्दल सांगायचे झाले तर ती मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रतिभावान लेखिका, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करताना लिखाण देखील केले आहे.