Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Madhuri Dixit हिच्या राजा चित्रपटाला ३० वर्ष पुर्ण!

 Madhuri Dixit हिच्या राजा चित्रपटाला ३० वर्ष पुर्ण!
कलाकृती विशेष

Madhuri Dixit हिच्या राजा चित्रपटाला ३० वर्ष पुर्ण!

by दिलीप ठाकूर 03/06/2025

तुम्हालाही कल्पना आहेच, ‘हिम्मतवाला’ प्रदर्शित होईपर्यंत जितेंद्रच्या फिटनेस, नृत्य अदा, नवीन पिढीतील अभिनेत्रीचा नायक होण्यातील त्याची व्यावसायिकता याचं भारी कौतुक होत होते. पिक्चरचा फर्स्ट शो पाहून बाहेर पडणारे पब्लिक म्हणाले, यह तो ‘हिम्मतवाली’ की पिक्चर है.  श्रीदेवीने आपलं सौंदर्य, बेभान नृत्य अदा, मोकळा ढाकळा स्क्रीन प्रेझेन्स यावर हा चित्रपट आपलासा करुन टाकला…(Bollywood)

इंद्रकुमार दिग्दर्शित ‘राजा’च्या वेळीही हेच झाले. चित्रपटात संजय कपूर ’राजा’ होता, पिक्चर सुरु असतानाच पब्लिकने माधुरी दीक्षितला या पिक्चरची ‘रानी’ म्हणून मनसोक्त मनमुराद दाद दिली. ‘राजा’ मुंबईत २ जून १९९५ रोजी प्रदर्शित झाला. आणि आता तीस वर्ष पूर्ण झाली देखिल. (Raja movie)

‘राजा’ प्रदर्शित व्हायच्या वेळेस माधुरी दीक्षित सुपर स्टार होती. मोहक चेहर्‍यावरील तिचं कायमस्वरुपी झक्कास हास्य, तिचं सौंदर्य, पडदा व्यापून टाकेल असा कॅमेर्‍यासमोरचा वावर (कॅमेर्‍याचा ॲन्गल कसा आहे वगैरे तांत्रिक गोष्टीची तिला उत्तम जाणीव होती. ‘मै माधुरी दीक्षित बनना चाहती हू’ असे स्वप्न वा इच्छा असणाऱ्यांनी माधुरीने चित्रपट माध्यम व व्यवसाय हे दोन्ही व्यवस्थित जाणून घेतले होते हे लक्षात घ्या. इच्छा आहे म्हणून माधुरी दीक्षित बनता येत नाही.)  तिचं नृत्य चापल्य, तिची सर्वकालीन लोकप्रिय गाणी, तिची लोकप्रियता (माधुरीचा निस्सीम चाहता मग कोणाचाही चाहता होत नाही हे सर्वात मोठे विशेष) या सगळ्यातून तिचं पारडं जड होते. बरं, इंद्रकुमार दिग्दर्शित ‘बेटा’ (१९९२) मध्येही तीच अनिल कपूरपेक्षा भारी ठरली (धक धक करने लगा) आणि त्या चित्रपटालाही ‘बेटी’ म्हटले गेले. तिच्याभोवतीच तर गोष्ट होती. (Madhuri dixit movies)

संजय कपूर हा अनिल कपूर व बोनी कपूरचा भाऊ या पुण्याईवर चित्रपटसृष्टीत आला. त्याच पुण्याईवर त्याला मोठ्या वा आघाडीच्या अभिनेत्रींचा नायक बनण्याची संधी मिळाली. पण संधी म्हणजे हुकमी यश नव्हे. त्यात माधुरी दीक्षित नायिका असेल तर विचारुच नका. एन. चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब’ (१९८८) मध्ये ‘एक दो तीन चार’ गाण्यापासून तिने जो झपाटा लावला तो आजही कायम आहे.

गुणवत्ता, मेहनत, आत्मविश्वास व फोकस्ड दृष्टिकोन या गुणांवर माधुरी दीक्षित घडली. त्या काळात आम्हा मुंबईतील सिनेपत्रकारांना नवीन हिंदी चित्रपटांचे मुहूर्त व शूटिंग रिपोर्टींगसाठी सेटवर जायची सोनेरी/ चंदेरी संधी मिळे. तेव्हा तेजाब, त्रिदेव, राजकुमार, प्रहार, याराना, फूल या चित्रपटांच्या सेटवर माधुरी दीक्षित लाईव्ह हा अनुभव घेतलाय. त्यावर भरपूर लिहिलयं. हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओत नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांच्या नृत्य स्टेपनुसार माधुरी दिवसभर घाम गाळत होती हे पाहिलयं. त्या काळात आम्हा सिनेपत्रकारांचे असे दौरे होत असत. आणि बरीच वेगळी माहिती मिळत असे. (Entertainment news update)

================================

हे देखील वाचा: Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं होतं करिअर

=================================

 ‘राजा’त माधुरी दीक्षित ‘छा’ जाऐगी हे सांगायला ज्योतिषाचा गरजच नव्हती आणि ती ‘छा गई’ म्हणून चित्रपट सुपर हिट ठरायला वेळ लागलाच नाही. या चित्रपटात परेश रावलने साकारलेली भूमिका अगोदर नाना पाटेकर करणार होता. पण माधुरीनेच परेश रावलच्या नावाचा आग्रह धरला असे गाॅसिप्स मॅगझिनमधून गाजले. माधुरीच्या शब्दाला वजन होते हेदेखील उल्लेखनीय.  माधुरीने नायकावर मात देणे हे अनेकदा घडले. अयूब खान (मृत्यूदंड), राजन सिप्पी (आवारा बाप), आदित्य पांचोली (सैलाब) अशी आणखीन उदाहरणे आहेतच. अगदी गोविंदावरही ‘पाप का अंत’, ‘इज्जतदार’ या चित्रपटात तिने मात केली. गोविंदा व माधुरी जोडी शोभलीही नाही. (Bollywood classic movies)

‘राजा’तील गीत संगीत व नृत्यात माधुरी एके माधुरी असाच भन्नाट परफॉर्मन्स. पण संजय कपूर हरवल्यासारखा वाटला. अखियां मिलाऊ कही (पार्श्वगायक उदीत नारायण व अलका याज्ञिक), किसी दिन बनूगी (उदीत नारायण व अलका याज्ञिक), फूल मांगू ना बहार मांगू (उदीत नारायण व अलका याज्ञिक) ही समीर लिखित गाण्याना नदीम श्रवणचे संगीत. नजरे मिली दिल धडका या गाण्याला पब्लिककडून टाळ्या नि भरपूर शिट्ट्या. सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहाची ती खासियत. रॉक हडसनच्या ‘कम सप्टेंबर’ (१९६१)चीच चाल. माधुरी दीक्षितच्या रुपेरी पडद्यावरील Top टेन नृत्यातील हे एक. (Raja movie and songs)

================================

हे देखील वाचा: Lata Mangeshkar : ….नाहीतर आज लता दीदी चित्रपट निर्मात्या असत्या!

=================================

इंद्रकुमार व अशोक ठाकरिया निर्मित ‘राजा’ची पटकथा राजीव कौल व प्रफुल्ल पारेख यांची होती. मारुती इंटरनॅशनल या बॅनरखालील हा चित्रपट ‘राजा’ नावाने बनला, ‘रानी’ म्हणून ओळखला जातो. ही सगळीच किमया फक्त आणि फक्त माधुरी दीक्षितची.(Bollywood dancing queen)

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: anil kapoor Bollywood Bollywood Chitchat bonny kapoor classic bollywood movies Entertainment Featured latest bollywood movies madhuri dixit raja movie sanjay kapoor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.