वादादीत महारानी (Maharani) वेबसिरीजचा दुसरा सिझन प्रदर्शनाच्या वाटेवर
बिहारच्या राजकारणाची झलक छोट्या पडद्यावर आणणाऱ्या महारानी (Maharani) या वेबसिरीजचा दुसरा सिझन लवकरच येत आहे. सोनी लिववर आलेल्या महारानीच्या पहिल्या सिझनला चांगलीच पसंती मिळाली होती. त्याचबरोबर हुमा कुरैशीच्या अभिनयलाही चांगलीच दाद मिळाली होती. आता या वेबसिरिजच्या दुसऱ्या सिझनचे शुटींग पूर्ण झाले असून लवकरच ही राजकीय थ्रीलर सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
महारानी (Maharani) वेबसिरीजच्या दुसऱ्या सिजनचे शुटींग भोपाल, होशंगाबाद आणि जम्मू काश्मिरच्या काही भागात झाले आहे. या दुसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना चकीत करतील असे ट्विस्ट असल्याचे हुमा कुरैशीने सोशल मिडीयावर जाहीर केले आहे.
करण शर्मा दिग्दर्शित आणि सुभाष कपूर लिखीत या राजनिती थ्रिलर वेबसिरीजनं भारतीय राजकारणाचा एक चेहरा समोर आणला. गेल्यावर्षी या सिरीजचा पहिला सिझन रिलीज झाला होता.
महारानी (Maharani) ही सिरीज 1990 च्या सुमारास बिहारमध्ये झालेल्या काही राजकीय घटनांवर आधारित आहे. या सिरिजसाठी हुमा कुरैशीनं खूप मेहनत घेतली असून तिने आणि तिचा सहकलाकार सोहम शाह यांनी त्यांच्या भूमिकांसाठी काही किलो वजन वाढवलंही आहे. जम्मू काश्मिरमध्ये या सिरीजचा महत्त्वपूर्ण भाग चित्रित झाला. त्यात स्थानिक कलाकारांनाही संधी देण्यात आली.
गेल्यावर्षी मे महिन्यात या सिरिजचा पहिला सिजन रिलीज झाल्यावर त्यावरून अनेक वाद – विवाद झाले. सीरिजचे कथानक लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांच्यावर आधारित असल्याचा आरोप करुन सिरीज बंद करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र या सिरीजला प्रेक्षकांनी मोठी प्रसिद्धी दिली. हुमा कुरैशीला तिच्या रानीच्या भूमिकेसाठी पुरस्कारही मिळाला.
मुख्यमंत्री पद सांभाळणारे भीमा भारती यांच्यावर हल्ला होतो. त्यानंतर ते आपल्या पत्नीला, रानी भारतीला मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळायला देतात. कमी शिकलेल्या रानीला घराबाहेर जग कसं आहे, याची जाणीवच नसते. थेट बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर बसल्यावर अचानक सर्व राज्याचीच जबाबदारी तिच्यावर येते. त्यातून तिला राजकारण म्हणजे काय, हे उलगडत जातं.
====
हे देखील वाचा: भारतातील बहुतांश वेबसिरीज नेहमी या 3 ‘स’ वरच आधारित का असतात?
===
याच दरम्यान तिला आपल्या आसपासाच्या भ्रष्ट्राचाराची माहिती मिळते. घात-प्रतिघात म्हणजे काय, विरोधकांचे डावपेच, आपल्याच पक्षातील छुप्प्या शत्रुंचे हल्ले, असे सर्व प्रसंग रानीच्या आयुष्यात येतात. शेवटी या सर्वांवर मात करत ती यशस्वी होते का? आपल्याच पतीच्या राजकारणाविरुद्ध ती कशी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करते? हे सर्व या महारानी वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये पहायला मिळणार आहे.
हुमा कुरैशी सोबत या सिरीजमध्ये सोहम शाह, अमित सियाल, इनामुलहक, विनीत कुमार, मोहम्मद आशिक हुसैन, कनी कुसरुति आणि तनु विद्यार्थी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हुमा कुरैशीला महारानी (Maharani) वेबसिरीजच्या पहिल्या सिजनसाठी फिल्मफेअर ओटीटी सर्वोकृष्ठ कलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे तिच्याकडून दुसऱ्या सिजनमध्येही अपेक्षा वाढल्या आहेत.
====
हे देखील वाचा: विद्या बालन आणि शेफाली शाह अभिनीत, अॅमेझॉन ओरिजिनल ‘जलसा’चा ट्रेलर प्रदर्शित!
====
पहिल्या सिजनला थेट संसदेमध्येही विरोध झाला होता. काही खासदारांनी या सिरिजमधील संवादांबाबत आक्षेप घेतला होता. त्यामुळे निर्मात्यांनी माफी मागून त्यातील काही सीन कमी केले होते. आता या दुसऱ्या सिजनला प्रेक्षकांचा पाठिंबा आणि विरोध कसा होतो हे लवकरच समजणार आहे.