
Actress Shivali Parab रिलेशनशीपमध्ये; ‘या’ स्टार सोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण !
अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) ही कायम चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमेडी शोमुळे शिवालीने प्रेक्षकांच्या घराघरांत प्रवेश केला. तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे आणि खट्याळ अंदाजामुळे ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. ‘कल्याणची चुलबुली’ म्हणून तिची एक वेगळी ओळख तयार झाली आहे. केवळ अभिनयच नाही तर शिवाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. कधी तिच्या डान्सचे व्हिडीओ, तर कधी ग्लॅमरस फोटो, तर कधी हटके लुक्स अशा विविध पोस्ट्समुळे ती सातत्याने चर्चेत असते. मात्र सध्या शिवाली एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. “शिवाली परब रिलेशनशिपमध्ये आहे का?” हा प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात निर्माण झालाय. कारण, अलीकडेच गणेशोत्सवानिमित्त शिवालीने अभिनेता आणि डान्सर रुपेश बाने (Rupesh Bane) याच्या घरी भेट दिली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आणि त्यातूनच चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं.(Shivali Parab Boyfriend Rumours )

रुपेश बानेने आपल्या घरातील गणेशोत्सवाचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. यामध्ये शिवाली, रुपेश आणि रुपेशची आई एकत्र दिसत होते. या पोस्टखाली शिवालीची बहीण स्नेहा परब हिने “Cutiess ” अशी खास कमेंट केली. स्नेहाची ही कमेंट पाहून अनेकांचे कान टवकारले गेले. चाहत्यांनी लगेचच शिवाली-रुपेशच्या नात्याबाबत चर्चा सुरू केली. एवढंच नाही तर त्या कमेंटवर शिवाली आणि रुपेशनेही रिप्लाय दिल्यामुळे हा विषय आणखी रंगला.

रुपेश बाने हा स्वतः डान्सर, कोरिओग्राफर आणि अभिनेता आहे. स्टार प्लसवरील ‘डान्स प्लस 5’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा तो विजेता ठरलाय. रुपेशने ‘सिंड्रेला’, ‘सूर सपाटा’, ‘हबड्डी’, ‘रंगीले फंटर’, ‘घरत गणपती’ अशा मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय काही वेबसीरिजमधूनही त्याने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.(Shivali Parab Boyfriend Rumours)
====================================
हे देखील वाचा: Bigg Boss 19 ची स्पर्धक Tanya Mittal घरात घेऊन गेली तब्बल ८००हून जास्त साडया?
====================================
शिवालीकडे पाहिलं तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोव्यतिरिक्त तिने ‘चंद्रमुखी’ (2022), ‘प्रेम प्रथा धुमशान’ (2022), ‘व्हॉट्सअप लव्ह’ (2019), ‘पाणीपुरी’ (2024) अशा चित्रपटांमध्येही काम केले आहे. अलीकडेच आलेल्या ‘मंगला’ (2025) या सत्यकथेवर आधारित सिनेमात शिवालीने प्रमुख भूमिका साकारली असून तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुक होत आहे. सध्या दोघंही सोशल मीडियावर एकत्र डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या केमिस्ट्रीकडे चाहत्यांचं नेहमीच लक्ष असतं. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवातील फोटो व्हायरल होताच “शिवाली आणि रुपेश खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत का?” या चर्चेला आणखी उधाण आलं आहे. खरं तर, या चर्चांना दोघांनी थेट उत्तर दिलेलं नाही. पण त्यांचे हसरे फोटो आणि सोशल मीडियावरील हलकेफुलके संवाद यामुळे नेटकरी मात्र त्यांच्या रिलेशनशिपला दुजोरा देतायत.