‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात उतरलं !
‘Maharashtrachi Hasyajatra’ फेम अभिनेता गौरव मोरे आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचला आहे. पण आता त्याने आपल्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे, कारण त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. गौरव मोरेला मुंबईतील पवईत हक्काचं घर मिळालं आहे आणि त्याच्याच कष्टांची फळं त्याला मिळाली आहे. याबद्दल त्याने एक भावुक पोस्ट लिहित चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.(Gaurav More)

गौरवने आपल्या इंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर करत सांगितलं, “फिल्टर पाडा ते पवई हा प्रवास छोटा वाटत असला तरी, तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्षे लागली आहेत. लहानपणापासून माझ्या मनात होती की, जिथे राहतो, तिथेच आपलं घर असावं. आणि आज ते स्वप्न वास्तवात उतरलं. काल, २५ सप्टेंबर २०२५ रोजी मला आणि माझ्या कुटुंबाला पवईतील नवीन घराची चावी मिळाली. ताडपत्रीपासून ते फ्लॅटपर्यंतचा हा प्रवास खूप मोठा आणि खूप शिकवण देणारा आहे. घर घेताना घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन आनंदाने भरून आलं आणि असं वाटलं की, मी आपल्यासाठी काहीतरी महत्त्वाचं केलं.”

या पोस्टमध्ये गौरवने म्हाडाला देखील धन्यवाद दिले आहेत. त्याचं म्हणणं आहे की, म्हाडाच्या लॉटरीमधून मिळालेल्या घरामुळे त्याचं एक मोठं स्वप्न साकार झालं आहे. घराच्या चाव्या मिळाल्यानंतर गौरवचे आनंदाचे वातावरण होते, आणि त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर या क्षणाचा फोटो शेअर करत या सगळ्या भावनांचा उलगडा केला आहे. गौरव मोरेनं ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मधून आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. काही दिवसांपूर्वीच त्याने या शोचा निरोप घेतला, आणि सध्या ‘चला हवा येऊ द्या’ च्या दुसऱ्या पर्वात प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (Gaurav More)
==========================
==========================
गौरवच्या या उत्क्रांतीत एक नवा अध्याय सुरू झाला आहे, कारण त्याने नुकताच एक नवी गाडी ही खरेदी केली आणि आता त्याचं हक्काचं घर ही त्याला मिळालं आहे. गौरव मोरेच्या जीवनातील हे कष्ट आणि संघर्षांच्या प्रवासाचे प्रतीक बनलेले क्षण आहेत. त्याच्या या आत्मविश्वासाने भरलेल्या आणि भावनांनी भरलेल्या पोस्टमुळे त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.